खुळा जीव झाला, कशाने कळेना
तुझी दूरताही अताशा छळेना
जिथे तू तिथे मी, मना नित्य वाटे
इथे तू तिथे मी, मला हे कळेना
उरी स्पंदनांच्या तुझा प्राण खेळे
अता श्वास माझ्या दिशेला वळेना
कधी बांधली मी तुझी प्रेमपूजा,
कधी वेड आले, मला आकळेना
कशी सांग पाहू तुझी सावली मी?
इथे आरसाही बघाया मिळेना.....