गं प्रियतमे ...

गं प्रियतमे - गं प्रियतमे
हृदयाजवळ तुझ्याऽ वाटे - मज ऱ्हावेसे
तू न उपस्थित ज्यात असा - मेळा न दिसे ।ध्रु।

तू नाराज कशावरी? - दुःख तुला कसले?
चिंता तुज कसलीऽ? मिलन होईल ग अपुले ।१।

गं प्रियतमे ...

जातो मी इकडून वा - जातो मी तिकडून
मिळते जी ती वाऽट परी - तव दारा जाऊन ।२।
गं प्रियतमे ...

मम बाहूंचे हार पहा - घालीन तुला मी
बघत बसो जग घेऽउनी जाईन तुला मी ।३।
गं प्रियतमे ...

टीपा :

३. धृवपदाचे पर्याय आणि पाठभेद खाली प्रतिसादात पाहावे.

१. पर्याय : पाहत जग राहील जसे नेईन तुला मी
२. तिकडून जाऊन मिलन हार ह्या शब्दांचे उच्चार तिकडून् जाऊन् मिलन् हार् असे करावे.

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा.