न ओळख तू मजला

न ओळख तू मजला
न ओळखतो तुज मी
तरी वाटे - जणू भेटे - जिवा माझ्या - जीव हा ।ध्रु।

ऋतू ना, न रात बोले
अधरही अबोल झाले
निरवताच लागे सांगू - ही कथा
हृदय गूज बोले - नयनांतुनी ।१।

प्रीतिच्या पथावरी ह्या
जगाला त्यजून साऱ्या
निघालो उरांनी दोघे - स्पंदत्या
कळेना परी की - जावे कुठे ।२।

चाल : मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.

३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )