केतकरांवरील हल्ला आणि शासन

     लोकसत्ताचे संपादक श्री कुमार केतकर याच्या घरावरील हल्ला झाल्यावर हल्लेखोरांना योग्य तो धडा न शिकवता शासनातील दोन पक्ष एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यातच मग्न आहेत. मुख्य सूत्रधारास तर जणू अभयच देण्यात आले आहे आणि त्यांनी हल्ला नव्हे तर आंदोलन करण्यास सांगितले होते असा त्यांचा बचाव केला जातो‍य. ज्या अग्रलेखाबद्दल हा हल्ला झाला त्यात आंदोलन करण्यासारखे तरी काय होते? असेच असेल तर आता इतरेजनांना शिवाजी हा शब्दही उच्चारणे अवघड होईल.