पुनर्जन्म खरा की खोटा, बघा तर्क पटतो का?

खालिल लेखात लिहिल्या गेलेल्या इंग्रजी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द न आठवल्यामुळे ते लिहिल्या गेले आहेत, तरी आगाउ क्षमायाचना.

ईव्होल्युशन, हेरिडीटी [ अनुवंशिकता ], उर्जा <---> पदार्थ
[ एनर्जी <---> मॅटर ]

Evolution is the process of change in all forms of life over generations. ------- इति विकी....

कोणताही पदार्थ = हार्डवेअर + सॉफ्टवेअर [मूर्त + अमूर्त या अर्थाने ]

गृहितक: जिवीत मनुष्य हा एक पदार्थ आहे. [ उर्जा नाही. ]

याचे अर्थ / अनुमान:
१. जिवीत मनुष्य हा पुर्वी म्हणजे या अवतारात [ फॉर्म ] येण्यापुर्वी व या अवतारा नंतर " उर्जा होता व उर्जा असणार"

२. या अवतारा नंतर ---> उर्जा व परत ही उर्जा ----> पदार्थ [ सजीव किंवा निर्जीव ]

३. म्हणजे उर्जा---->पदार्थ [ सजीव वा निर्जीव]---->उर्जा----->पदार्थ [सजीव वा निर्जाव] ही साखळी अविरत, अव्याहत इथे तीथे सगळीकडे चालू आहे.
४. म्हणजे उर्जा व पदार्थ कोणत्या ना कोणत्या अवतारात [फॉर्म] परत परत प्रकट होत असतात, याला आपण तात्पुरते पदार्थाचे वा उर्जेचे पुनर्पकटीकरण म्हणू, पुनर्जन्म नव्हे. ठीक?

आता अनुवंशीकते कडे वळू, म्हणजे पर्यायाने इव्होल्युशन कडे.
ग्रेगर मेंडल काय सांगतात की,

"एव्हरी जनरेशन, ऍन ऑर्गॅनिझम इनहेरीटस फिचर्स [कॉल्ड ट्रेट्स] फ्रॉम इटस पॅरेंटस थ्रू जिन्स"

म्हणजे असे:
जर सजीव मनुष्य [सजीव पदार्थ] = मूर्त भाग + अमूर्त भाग [ हार्ड + सॉफ्ट]

तर अनुवंशीकतेनुसार, वारसांमध्ये, समान मूर्त भाग AND OR समान अमूर्त भाग कायम जन्म घेत असतो. [समान मूर्त भाग = नाकी, डोळी समान, स्मरणशक्ती( इलेक्ट्रॉनीक तंत्रज्ञानानुसार मेमरी = फ्लिपफ्लॉप्स / गेटसचा समूह. )]
[समान अमूर्त भाग = गुणवैशिष्ट्ये समान, जसे: रागीष्ट, कोपीष्ट, विनोदी, बुद्धीमान, राजकारणी, सैनिकी कौशल्ये]

म्हणजे आता माझ्यापासून सुरुवात केली तर
मी = मूर्त + अमूर्त = 'क्ष'

माझ्या नंतरची पिढी [ क्ष१] = क्ष चा अनुवंशीक [मूर्त + अमूर्त] + क्ष१ चा अननुवंशीक [मूर्त + अमूर्त]

समजा,

क्ष चा अनुवंशीक [मूर्त + अमूर्त] = ड
म्हणजेच क्ष१ ने क्ष कडून घेतलेला भाग = ड }-------> A
क्ष१ ने क्ष कडून "न घेतलेला" भाग = न -----------> B
तर मी = क्ष= ड + न

ठीक?

त्या नंतरची पिढी [क्ष२] = क्ष चा अनुवंशीक [मूर्त + अमूर्त] + क्ष१ चा अनुवंशीक [मूर्त + अमूर्त] + क्ष२ चा अननुवंशीक [मूर्त + अमूर्त]

त्यानंतरची पिढी [क्ष३] = क्ष चा अनुवंशीक [मूर्त + अमूर्त] + क्ष१ चा अनुवंशीक [मूर्त + अमूर्त] + क्ष२ चा अनुवंशीक [मूर्त + अमूर्त] +क्ष३ चा अननुवंशीक [मूर्त + अमूर्त]

याप्रमाणेच नंतरच्या पिढ्या ठरतील.
ठीक?

आता, एवढे नक्की की प्रत्येक वारसा मध्ये दोन मुख्य भाग आहेत.
१. ड
व २. ड एतर भाग

ठीक?

आता जेंव्हा केंव्हा, जिथे कुठे

'ड' एतर भाग = न -------> उपरोक्त B बघावे.

असे घडेल, [ हे परम्युटेशन व कॉंबिनेशन ऑफ जिन्स ऑर DNA, RNA ने शक्य आहे, त्यासाठी जिनोम मॅपींग चा उपयोग करता येईल, कदाचीत सध्याची उपलब्ध संगणकीय क्षमता अपूरी पडेल. ]

तेंव्हा, तिथे मी, या जन्मात जन्मतः {जन्मलो त्या क्षणाला जे रंग, रूप कौशल्ये घेउन जन्मलो, [ मूर्त + अमूर्त ] }
अगदी तस्साच परत " तयार" झालेला असेन.

आणि अशी १००% [मुर्त + अमूर्त] "हुबेहुब" सुद्धा बनण्याची शक्यता आहे, तेंव्हा पुर्वीच्या भाषा, पुर्वीची ठिकाणे यास्मरण शक्ती पुन्हा निर्माण होणे म्हणजे अगदीच किरकोळ आहे नाही का?

हुश्श!!!!!!!!!

सर्वांची संशोधक मते अपेक्षीत.

धन्यवाद !