एका सेकंदात थाड थाड मराठी!
येथे सगळीकडे संगणकाचा नेहमीचा (रोमन - इंग्रजी) कीबोर्ड वापरून देवनागरी मराठी लिहिता येते. त्यासाठी लिप्यंतर नावाचे तंत्र वापरण्यात आले आहे. ह्यात आपण जसजशी इंग्रजी अक्षरे टाईप करीत जाऊ तसतसे तोवर झालेल्या शब्दाचे लिप्यंतर लगोलग करून ते आपल्याला देवनागरीमध्ये तेथल्या तेथे मिळते.
असे टाईप केले, | की असे उमटते. |
---|---|
m | म |
ma | म |
mah | मह |
maha | मह |
mahaa | महा |
mahaar | महार |
mahaara | महार |
mahaaraa | महारा |
mahaaraaS | महारा |
mahaaraaSh | महाराष |
mahaaraaShT | महाराष्ट |
mahaaraaShTr | महाराष्ट्र |
mahaaraaShTra | महाराष्ट्र |
mahaaraaShTraa | महाराष्ट्रा |
mahaaraaShTraat | महाराष्ट्रात |
सहसा मराठी शब्द इंग्रजीत लिहायची वेळ आल्यावर आपण जसे स्पेलिंग करू, जवळजवळ तसेच इथे करावे लागते. काही अक्षरांच्या आणि जोडक्षरांचा जरा वेगळा विचार करावा लागतो. ह्या चित्रावर टिचकी मारली तर कुठल्या अक्षरासाठी काय टाईप करायचे त्याचा तक्ता दिसतो, त्यात पाहायचे (आताच टिचकी मारून पाहा!) पुढे सवय झाल्यावर त्याची गरज पडत नाही. ह्या सगळ्यामुळे मराठी देवनागरी टाईप करणे इतके सोपे झाले आहे, की सारखे टाईप करीत राहावेसे वाटते!.
जेंव्हा इंग्रजी शब्द लिहिणे अनिवार्यच असेल तेंव्हा Ctrl-t (म्हणजे Ctrl आणि t ह्या दोन्ही की एकदम) दाबून लिहिण्याची पद्धत मराठीतून इंग्रजीत किंवा इंग्रजीतून मराठीत अशी बदलता येते.
मराठीत नांव काढा!
इतर लाखो संकेतस्थळांहून हे संकेतस्थळ एका बाबतीत वेगळे आहे. इथे आपल्याला आपले वापरायचे नांव मराठीत निवडता येते. शिवाय लांब नांव असले तरी चालते त्यामुळे आपले नांव जसेच्या तसे लिहिता येते. cuteamit2003 वगैरे चमत्कारिक आंग्लबंबाळ नांवे घेण्याची गरज पडत नाही. खुणेच्या शब्दाबाबत मात्र ही सुविधा सध्या उपलब्ध नाही. खुणेचे शब्द साठवताना आणि पाठवताना सांकेतिक परिभाषेत बदलून पाठवले जातात. तरीही व्यवस्थितपणे चाचण्या घेऊन नंतर खुणेचे शब्द मराठीत निवडण्याची सुविधा करण्यात येईल.
सदस्य होण्याचे फायदे
सदस्य झाल्यावर आपल्याला येथे लिहिलेल्या साहित्यावर मते नोंदता येतात, टीका टिप्पणी करता येते, इतकेच नव्हे तर आपले साहित्य पाठवता येते, आपले विचार मांडता येतात, एखाद्या नव्या विषयावर चर्चा सुरू करता येते. सदस्य झाल्यावर आपण ह्या ठिकाणी येण्याची नोंद एकदा केली, की आपण काय काय वाचले त्याची नोंद राहते आणि वाचून झालेल्या आणि न झालेल्या लेखांवर, साहित्यावर तसतशी खूण उमटते, त्यामुळे नवीन आलेले साहित्य आपल्याला चटकन ओळखू येते आणि आपला वेळ वाचतो.