मराठीत ॲनग्रॅम हा प्रकार आहे का?

इंग्रजीत ॲनग्रॅम हा प्रकार अस्तित्वात आहे. ॲनग्रॅम म्हणजे काय हे मला वाटतं, इथं सांगायची अथवा विशद करण्याची गरज नसावी.

हाच प्रकार मराठीत अथवा अन्य तत्सम लिपींमध्ये आहे का? असल्यास तो बनवण्याचे काही विशिष्ट नियम आहेत का? (मूळ शब्द आणि त्याचा/त्याचे ॲनग्रॅम / ॲनग्रॅम्स अर्थपूर्ण हवा/हवेत, ह्या नियमाव्यतिरिक्त)

इंग्रजीत ॲनग्रॅम बनवताना मूळ शब्दातील अक्षरे सहजपणे उचलता येतात. पण, मराठी अथवा अन्य लिपींमध्ये असे करणे सहज शक्य नाही. उदा. इंग्रजीतल्या रोझ (अर्थात् गुलाब) ह्या शब्दात आर ओ एस आणि ई ही चार अक्षरे आहेत ती थेट आहेत तशी वापरून सोअर (एस ओ आर ई) ओअर्स (ओ आर ई एस) असे ॲनग्रॅम्स बनवता येतात. पण, तोच जर मराठीतला एखादा शब्द घेतला तर त्यातली अक्षरे कश्या प्रकारे सुट्टी केली जातील, ॲनग्रॅम बनवण्यासाठी?