वे‌. शा. सं. दिवेकर शास्त्रींचा सहभोजनात सहभाग

अनेक नमवंत विद्वानांबरोबर वे‌. शा. सं. दिवेकर शास्त्री पतित पावन मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा समारंभास हजर होते. वेद शास्त्र संपन्न होते तरी त्यांचे विचार प्रगल्भ व पुरोगामी वृत्तीचे होते.सहभोजनात सहभागी व्हावं म्हणून त्याना पाचारण करण्यात आलं.त्यानी आपला उपवास असल्याने सहभोजनात सहभागी होता येत नाही असं सांगितलं. कार्यकर्त्याना वाटलं, हे सनातनी कर्मठ आहेत.म्हणुन काहीतरी सबब सांगून हा प्रसंग टाळत आहेत.पण माणसांची पारख असलेल्या सावरकरांना ते पटलं नाही. ते स्वतः त्याना बोलवायला येले.तात्याराव म्हणाले,"शास्त्रीजी,आपल्यासाठी खास फ़राळाचे जिन्नस तयार केले आहेत.कृपा करुन आपण अखिल हिंदु सह भोजनाच्या पंक्तीत बसून ते खावेत."  स्वतः सावरकर आलेले. शास्त्रीबुवा तात्यांबरोबर आले. पंक्तीत बसले.एका बाजूस महार तर दुसऱ्या बाजूस भंगी अशी पंगत होती. शास्त्रीबुवानी शांतपणे फ़लाहार केला. लोकाना या विद्वानाचं कौतुक वाटलं.शास्त्रीबुवांनी तात्यांच्या कार्याचं कौतुक केलं‌. समाधान व्यक्त केलं.एका विद्वानाला दुसऱ्या


विद्वानाने दिलेला प्रतिसाद.


 


स्त्रोत < आठवणींची बकुळफ़ुले<डॉ वि म शिंदे