'गांधीगिरी'

सध्या 'गांधीगिरी' भलतीच गाजते आहे. दररोज वेगवेगळ्या शहरातील गांधीगिरीच्या बातम्या वाचायला/पहायला मिळत आहेत. त्यातून काल तर गांधीजयंती होती म्हटल्यावर काय बघायलाच नको. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर जिकडे तिकडे गांधी टोप्या घालून गांधीगिरी करणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. आजच सकाळ मधे इथे ही बातमी वाचली आणि हसायला आले.


अशा गांधीगिरीवर मनोगतींचे काय मत आहे ?
१. यातून खरोखरच समाजसुधारणा होईल की हा केवळ एक प्रसिद्ध होण्याचा सर्वात सोपा उपाय (पब्लिसिटी स्टंट) आहे?

२. फुले घेणाऱ्यांमधे आणि देणाऱ्यांमधेही खरेच बदल होताना दिसतात का ? 

३. राजकारण्यांना किंवा फुकटात प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्यांना अजूनही गांधींच्याच किंवा इतिहासाच्या पुस्तकातील इतर प्रसिद्ध व्यक्तींच्या काठीचा आधार घ्यावा लागत आहे असे आपल्याला वाटते का ?

४. सध्याचा एकही राजकारणी/समाजसुधारक कोणाचाही अनुकरण न करता स्वतःचे असे वेगळे स्थान का निर्माण करू शकत नाही? सगळेचजण आपला मेंदू कुठल्यातरी चौकटीत बंदिस्त करून ठेवत आहेत असे वाटते का ? 


५. क्र. ३ व ४ मधील परिस्थिती कशी बदलता येईल ?    


इथे गांधींच्या आचार/विचारांविषयी चर्चा अपेक्षित नाही, त्यामुळे गांधींविषयीचे मुद्दे घुसवून चर्चा भरकटवू नये ही विनंती