संगणकासंबंधी मदत हवी आहे !!

नमस्कार,


माझ्या संगणकावर सद्ध्या एक्स्पी आणि PCQlinux 2005 आहे. काही कारणाने मला दुसरे एक्सपीचे टाकायचे होते, म्हणुन मी बुटेबल सीडी टाकली आणि संगणक परत चालू केला, परंतु नेहेमीचे डॉस न उघडता DR-DOS नावाचे काहीतरी चालू झाले, आणि त्यामधे ती सीडी चालू शकत नव्हती. 


( setup.exe ला चुकीची कमांड अशी एरर येत होती. बहुधा ते लिनक्सचे डॉस असावे असे मला सांगण्यात आले!मला असे काही असते हे माहीत नाही. लिनक्सची माहीती मला अगदी थोडीच आहे, आणि ईंजिनिअरींगला असताना प्रोग्रॅम्स करण्यापुरतीच त्याची ओळख!) मला आता लिनक्स लागत नाही, म्हणुन मी ते काढुन टाकावे अस विचार केला.. ज्या ड्राईव्ह वर लिनक्स आहे ते फ़ॉर्मॅट करावे म्हणुन partition magic नावाचे सॉफ्टवेअर उतरवून घेतले आणि लोड केले. परंतु तिथेच काहीतरी प्रॉब्लेम झाला. ते जेव्हा मी रन करायला गेले तेव्हा एरर आली, संगणक परत चालु केला, तर तो आता GRUB मधे जातो!!  आणि तिथुन मला काहीही करता येत नाही. एक्सपी नाही आणि लिनक्स पण नाही. जाळावर शोध घेतला असता, ग्रब हे मल्टीपल बूटींग्साठी वापरतात असे कळले. परंतू त्याच्या कमांडस कशा वापरायच्या हे मला माहीत नाही आहे.


कृपया मनोगतवरील जाणकार मला मदत करा.. मला शक्यतो जमलं तर ही अडचण माझी मलाच सोडवायची आहे, अगदीच नाईलाज झाला तर तंत्रज्ञाची मदत घ्यावी लागेल. यावर काही उपाय आहे का?


(ई̱ग्रजी शब्दांसाठी क्षमस्व.. घाईत असल्यामुळे मराठी प्रतिशब्द आठवले नाहीत.. )


- भाग्यश्री.