बायको

हे केवळ एक हलकेफुलके प्रकटन आहे. लेखनाचे शीर्षक आणि लेखकाचे नाव यावरून याचे वर्गीकरण स्वानुभव, गंभीर चर्चा, पोरकटपणा वगैरे वादग्रस्त प्रकारात करू नये आणि लेखातल्या प्रकटनावर फ़ारसा विचारही करू(च) नये. (अधिकाधिक वाचकांनी आपले लेखन वाचावे, यासाठी लेखाला असे झणझणीत शीर्षक देण्याची युक्ती आता नवीन राहिलेली नाही. तसेच अशी धोक्याची सूचना सुरुवातीलाच आणि ती सुद्धा ठळक लाल रंगात लिहिली, की लेखन वादग्रस्त होते व जास्तीत जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते)

विज्ञान मराठीतूनच शिकवा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1696791.cms">

डॉ. नारळीकरांचे आग्रही मत

म. टा. प्रतिनिधी

मुलांचा विज्ञानाचा पाया पक्का होण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान मातृभाषेतूनच शिकविणे गरजेचे आहे. तरच ते अधिक प्रभावी ठरू शकेल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.

मराठी अभ्यास परिषदेतफेर् 'विज्ञानाची मराठी किती पुढे? किती मागे?' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन क रण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. नारळीकर यांच्यासोबत डॉ. बाळ फोंडके, डॉ. पंडित विद्यासागर, अशोक पाध्ये सहभागी झाले होते. काळानुरूप प्रत्येक भाषेतच परिवर्तन होत असते. नव्या उपयुक्त शब्दांचा भाषेत समावेश करणे हे भाषेवरील आक्रमण मानता कामा नये. उलट त्यामुळे भाषा अधिक समृद्ध होते. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी भाषा आणि आधुनिकता यांची सांगड घातली पाहिजे, असे मत यावेळी डॉ. नारळीकर यांनी व्यक्त केले. विज्ञानाचा मराठीतून वापर वाढण्यासाठी विज्ञान आणि भाषातज्ज्ञांंनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत डॉ. बाळ फोंडके यांनी व्यक्त केले. नवीन शब्द रुढ करताना त्याचे प्रमाणीकरण व्हायला हवे. तसेच अधिक उत्तम प्रतिशब्द स्वीकारण्याची ठराविक पद्धत निश्चित करायला हवी, असे त्यांनी सांगितले. विज्ञानाच्या परिभाषा आणि संकल्पनांना मराठीत शब्द रूढ होण्याची गरज आहे. सरकारची धोरणेही नवीन शब्द प्रचलित होण्याच्या आड येतात. पाठ्यपुस्तक निमिर्तीच्यावेळीही नवीन शब्द वापरण्यात बरेच अडथळे येत असल्याचे अशोक पाध्ये यांनी सांगितले. मराठीचा वापर वाढविण्यासाठी तिची उपयुक्तता पटवून देणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेने काही मराठी शब्द स्वीकारले असताना आपण इंग्रजी स्वीकारण्यात काय गैर आहे. मराठीतून विज्ञान शिकविण्यासाठी आणि वाचण्यासाठी प्रथम भाषेची आवड निर्माण होणे गरजेचे आहे, असे मत विद्यासागर यांनी व्यक्त केले.

आखाती मुशाफिरी (१०)

माझा धर्म निराळा होता. विदुरा घरी उष्टें वेंचणारा
श्री कृष्ण माझा आदर्श होता.
--------------------------------------------
 
         त्यानंतर लागोपाठ तीन दिवस काम सुखेनेव चालले.  जमीन भुसभुशीत लागली होती ही एक जमेची बाजू होती. शिवाय कांही अपवाद सोडले तर बहुतेक पठाण सरळ वागत होते. मध्येच कधी तरी दोन पठाणांमध्ये एखादी ठिणगी उडे, मग बाचा बाची ही आलीच. पण कादरखान ती समस्या परस्पर हाताळत असें. एक कादरखानच काय पण बाकी बहुतेक पठाण समजदारीने आणि सामंजस्याने वागत होते.  त्यांच्यातील जे वाद कादरखानाला हाताळता येत नाहीत असें त्याला वाटले, त्यांचा निवाडा करणे माझ्यापर्यंत पोहोचले.

वृद्धाश्रम -१

ह्या लेखातला काही भाग काल्पनिक आहे ~ काही वास्तुस्थिती आहे !

"खरं तर त्यांनी इतक्या लवकर व घाईघाईत हा निर्णय घ्यायला नको होता." मी आईला म्हटले.
माझ्या जवळच्या एका नातलगाने मुली चांगल्या कर्त्या सवरत्या असून व सांभाळण्याची जबाबदारी पेलण्यास तयार असूनही सहपत्नी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतलेला होता.
खरं म्हटल्यास नेमक्या कुठल्या परिस्थितीत हा निर्णय त्यांनी घेतला असेल ते मला माहितही नव्हते.....
"अरे तो विचीत्रच आहे स्वभावाने, लहानपणापासूनच !" आईच्या त्या वाक्याने ते संभाषण तेथेच संपले.

पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गिरिभ्रमण : सुधागड

या पौर्णीमेला रात्री चंद्रप्रकाशात गिरिभ्रमण करण्याचा बेत आहे. मुंबई व पुण्याच्या लोकांना येता येईल असे ठिकाण आहे सुधागड. श्रेणी : सोपी.

कार्यक्रम पुढीलप्रमाणे

पुण्याहून सायंकाळी सहा वाजता निघून रात्री दहा वाजेपर्यंत अष्टविनायकासाठी प्रसिद्ध अशा पालीजवळील पाच्छापूर- ठाकूरवाडी येथे पोहोचणे. मुंबईहून कोणी येणार असल्यास त्यांनीही दहा वाजेपर्यंत थेट पोहोचणे.
रात्री दहा ते बारा सुधागडावर चढाई.   छोटीशी होळी, नंतर गडावर फेरफटका आणि मग पंतसचिव वाड्यात अथवा देवळात मुक्काम.
पहाटे उठुन गडप्रदक्षिणा, टकमक टोक, प्रतिध्वनी चाचणी, तेलबैला दर्शन आणि तीन वाजेपर्यंत पायथ्याला उतरणे.
सायंकाळी सात वाजेपर्यंत पुण्याला परत.

समवयस्कं

येसाबाई आमच्या वाडयात कामाला यायला लागली त्याला जवळपास १७-१८ वर्षे झाली. आली तेव्हा पोटुशी होती आणि एक तान्हे मूल कडेवर होते. काम कसं, पगार किती वगैरे ठरवाठरवी करताना "कामावर लागल्यावर एक-दोन महिन्यातच बाळंतपणासाठी सुटी घेणार" या मुद्यावरही चर्चा झाली. बाळंतपण यथासांग पार पडले, फारशी रजा नं घेता येसाबाई आठवडाभरातच पुन्हा कामावर रुजु झाली. दुसराही मुलगाच झाला होता. तेव्हा "येसाबाई, आता पुरे" असा माझा आगंतुक सल्ला तिने मनावर घेतला नाही. "ताई तुमाला काई कळत न्हाई आमच्य लोकात कसं आसतं ते" असं म्हणुन मला गप्पं बसवलं.

ज्योतिषशास्त्र - कांही उत्तरे

 ज्योतिष हे अनुभवसिद्ध शास्त्र असले तरी तो एक वादाच्या विषय असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवणारे, त्याचे अभ्यासक तथा व्यासंगी त्यावर जाहीर चर्चा करण्याच्या भरीस पडत नाहीत. या शास्त्रावर  विश्वास ठेवणारे व त्याचा समाधानकारक अनुभव घेणारे घेणारे केवळ भारतांतच नव्हे तर संपूर्ण जगांत फार मोठ्या संख्येने आहेतच.
 
 मनोगतवरील एक जिज्ञासू के. सौरभ यांनी त्यांच्या ’ ज्योतिषशास्त्र - कांही प्रश्न’ या लेखांत कांही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांना यथाशक्ति उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहे.

आखाती मुशाफिरी (९)

वास्तवाला तोंड देण्यासाठी दुस-या दिवशीची सकाळ उजाडे पर्यंत.
-------------------------------------------------------

        दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे कार्यस्थळावर पोहोचलो. माझ्या पठोपाठ कामगारांची गाडी येऊन ठेपली. आज कामगार बिनबोभाट कामाला लागलेले. काल हुस्नीने त्याचे काम चोख केलेले होते. त्याने काय केले ते समजलेले नव्हते. पण परवा ज्या ठिकाणी तो हाडांचा सापळा होता ती जागा स्वच्छ झालेली होती. पठाण त्या जागी जाऊन पाहून आले आणि फारशी चर्चा न करता कामाला लागले. मी एकदा पाहणी करावी म्हणून कामाच्या जागेवरून चक्कर मारीत होतो. तोंच प्यून, मुख्यालयाचा फोन आला आहे म्हणून सांगत आला. मी झालेल्या कामाचा धांवता आढावा घेतला आणि फोन घेण्यासाठी केबीनवर गेलो.  आस्थापनेचे जनरल मॅनेजर मि. बरनार्ड मार्स्टर्न यांचा होता. त्यांनी मला ताबडतोब मुख्यालयात बोलावले होते. इतक्या वरिष्ठ दर्जाच्या अधिका़-याने मला कां बोलावले असावे याचा अंदाज लागेना. मनांत जरा धडकीच भरली. कारण ज्या असामीचे एरवी
दर्शनही दुर्लभ असायचे त्याने चक्क भेटीला बोलावले होते. मी पळतच साईटवर गेलो आणि कादरखानला ती हकीकत सांगितली आणि मी परतेपर्यंत काम व्यवस्थित चालू राहील असे पहा असे बजावले. कादरखान ती जबाबदारी नीट पार पाडू शकेल आणि बाकी कामगारही त्याचे ऐकतील असा विश्वास एव्हाना वाटायला लागला होता. साहेब कदाचित कामासंबंधी कांही विचारतील म्हणून
एका कागदावर कांही नोंदी करुन कागद बरोबर घेतला आणि निघालो.

ज्योतिषशास्त्र- काही प्रश्न

आपल्यापैकी बरेचजण आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. आपल्याला फारसा रस नसला तरी आप्तांच्या सांगण्यावरून आपण एखाद्या ज्योतीष्याकडे जाऊन त्यांचे मार्गदर्शन घेतो. माझ्यासारखे काही जातक ज्योतिष्यावर पुस्तके वाचून ते समजून घेऊन आपल्या प्रश्नांची उत्तरे स्वत:च शोधण्याचा प्रयत्न करतात. मी आतापर्यंत काही पुस्तके वाचली आहेत, पण बऱ्याच पुस्तकांत काही प्राथमिक गोष्टिंची ओळख करुन देऊन सरळ कोणता ग्रह कोणत्या ठिकाणी असता कसे फळ मिळते याचे विवेचन दिले जाते. माझे काहि प्रश्न अनुत्तरीत वा अर्ध-उत्तरीत आहेत. मनोगतींनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे देऊन माझ्या ज्योतिष विषयक ज्ञानात यथाशक्ति भर घालावी हि विनंती.तसेच आपल्याला काही प्रश्न असतील तर जरूर उपस्थित करावेत.

शब्द साधना - ११.

कृपया मराठी शब्द सुचवा, वापरा आणि इतरांनाही मराठी शब्द वापरण्यासाठी प्रोत्साहीत करा.

  1. एकदा इंटेरियर डेकोरेटर्सला बोलावले पाहिजे.
  2. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत.
  3. वेटिंगलिस्ट कोठपर्यंत आली आहे?
  4. एखादा चांगला पॅकर्स आणि मुव्हर्स माहित आहे का?
  5. टोकन नंबर कोठे मिळतील? तुमचा टोकन नं. काय आहे?
  6. कमोड ची व्यवस्था आहे काय?
  7. येथे जवळपास स्टेशनरीचे दुकान आहे काय?
  8. येथे ऍडमिशन साठी किती डोनेशन द्यावे लागेल?
  9. त्याची कन्सलटन्सी सर्व्हिस आहे.
  10. तेथे अनेक बोगस कागदपत्रे मिळाली. ( आकाशवाणी वार्तापत्रातील ऐकलेले वाक्य).

द्वारकानाथ कलंत्री