शब्द साधना - १०.

कृपया मराठी शब्द सुचवा, वापरा आणि इतरांनाही मराठी शब्द वापरण्यासाठी प्रोत्साहीत करा.

  1. उन्हाळ्याच्या दिवसात गावोगावी टॅकर्सनी पाणी पुरवठा करावा लागतो.
  2. त्या सिनेमाचे फ्लॅशबॅक पद्धतीचे तंत्र मला खरेच फार आवडले.
  3. या हॉलमध्ये इंडियन सिटिंगच्या व्यवस्था करायला हवी.
  4. लहान मुलांच्या पॉटीसाठी काय व्यवस्था आहे?
  5. येथे जवळपास पेट्रोल पंप आहे काय?
  6. त्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे?
  7. सेन्सेक्स धोक्याच्या पातळीजवळ आहे, सांभाळुन बरे.
  8. त्याचे नेटवर्क खुपच चांगले आहे.
  9. स्टॅंप ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती बरे आला?
  10. शट अप्. काही बोलु नका.

द्वारकानाथ कलंत्री

२४ बाय ७

              मी जर प्रश्न विचारला की तुम्हाला एक आख्खा दिवस दिलाय फक्त तुमच्यासाठी. बाकी घरी एकटच राहायचं आहे, भेटायला, बोलायला जवळ कोणीही नाहीये पण त्याचबरोबर कसले काम,चिंता किंवा कसली घाईही नाहीये. अशा एखादा दिवस तुम्हाला मिळाला तर काय कराल? मला जर असा एखादा दिवस मिळाला तर काय करू आणि काय नको असे होईल. झोप तर काय माझी आवडती गोष्ट. सकाळी आरामात १० वाजता उठून,निवांत गाणी ऎकत आवरून, गरम गरम चहा हातात घ्यावा आणि खूप दिवसांपासून अर्धवट राहिलेली एखादी कादंबरी वाचत बसावं. किंवा खूप दिवस झाले पाव-भाजी किंवा गरम-गरम पिठले-भात( वरतून तूप पण) घेऊन खाल्लेच नाहीये असे वाटल्यावर सामान आणण्यापासून तयारी असली तरी मग मी सामान आणून का होईना पण बनवून खाईनच.त्यात एकटीसाठी कुठे बनवणार असा विचारही करणार नाही.
             पण माझ्या आईला जर मी हाच प्रश्न विचारला तर ती मला किती तरी गोष्टी सांगेल, अगं ती वरची माळ्यावरची भांडी बरेच दिवस पडली आहेत, ती साफ करावी म्हणते. ताईच्या चं बारसं आहे काहीतरी आणीन म्हणते....आणि अशी बरीच....पण त्यातलं एक तरी तिचं स्वत:साठी असेल का? मला नाही वाटत. हवी ती गाणी ऎकणे, चित्र काढणे, पुस्तक वाचणे, खाणे,मनसोक्त लोळत पडणे, आणि अश्याच कितीतरी छोट्यामोठ्या गोष्टी आपल्या आवडीच्या होत्या, त्यातली एखादी आज करावी वगैरे असले विचार त्यांच्या ध्यानीमनी पण येत नाहीत. का? आता आई आपल्यासाठी सर्व त्याग करते, आपल्याला वाढवते, आजारपणे काढते आणि बरंच काही करते. आपणही मग तिला थोर, महान असल्या उपाध्या लावून आपले कर्तव्य करतो. पण आपण बाहेर पडल्यावर त्यांचं इतके दिवस कष्टात जाणारं आयुष्य थांबून जातं, मग देवधर्म, शेजारी, नातेवाईक यामध्ये ती स्वत:ला गुंतवू लागते. असो. मला आईवर काही लिहायचं नाहीये आज.
           मी परदेशात आल्यापासून बरीच भारतीय कुटुंबे पाहिली. एखाद्या पार्टीमध्ये किंवा सणावाराला भेटिगाठी होतं तेव्हा कुणी ओळख करून देताना विचारलं की तुम्ही काय करता की कुठल्याही ग्रुहिणीचे उत्तर काय? "काही नाही!' बस्स?? काही नाही?? म्हणजे दिवसातून ८-१० तास काम करणारी स्त्री 'नोकरी' करते हे अभिमानाने सांगते आणि २४ तास काही ना काही काम करत राहणारी स्त्री कसंनुसं 'काही नाही' हे उत्तर देते. त्यातही बरीचशी कामं करणं हा नाईलाज म्हणून, शिवाय़ नवरा नोकरी करत असताना घरी एकटं राहणं, नाहीतर मुलांचं एकट्यानेच सर्व करणं आणि कधी-कधी का होईना, 'तू काय दिवसभर घरीच असतेस की तरी कामं कशी संपत नाही', हे ऎकणं.मला फार अस्वस्थ वाटलं. पण या गोष्टी मी अधिक जवळून पाहताना वाटलं की एक नुकतंच लग्न झालेली मुलगी ते अशी एक गृहिणी यामध्ये होणाया बदलास बाकी लोकांइतकीच ती स्वत: पण जबाबदार असते. हे कसं?

आखाती मुशाफिरी (४)

तो नक्की काय म्हणाला ते मला उद्या कळणार होते.
--------------------------------------------
तो पठाण जे कांही काल म्हणाला होता त्यात एक        ’ साबूत ’ असा शब्द होता त्याचा अर्थ मात्र सकाळी माझ्या चांगलाच लक्षात आला. साबूत म्हणजे शाबूत असें असावे. आज मी खरोखरच शाबूत नव्हतो. काल दिवसभर भर उन्हांत धावपळ केली त्याचा जबरदस्त शीण आलेला होता. अंगात थोडी कणकण तर होतीच पण माझे दोन्ही खांदे, दंड,बाहू आणि मान-पाठ कमालीची ठणकत होती. ते अवजड वाहन चालविण्याचा सराव असण्याचे कांही कारण नव्हते त्यामुळे पहिल्यांदाच जोर-बैठका काढणाऱ्याची जशी व्हावी तशी अवस्था झाली होती. चेराही उन्हाने किंचित रापला होत हे आरसा सांगत होता. मी न्याहरी बरोबर दोन वेदना शामक गोळ्या घेतल्या अन् कामावर गेलो. पांच मिनिटे उशीरच झाला होता.

ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स(५)

मायक्रॉफ्ट आणि लेस्ट्रेड दोघंही आधी कळवल्याप्रमाणे ब्रेकफास्टनंतर लगेचच हजर झाले. होम्सने त्यांना आधल्या दिवशीच्या सगळ्या घटना तपशीलवारपणे सांगितल्या. घरफोडीचा वृत्तांत ऐकून लेस्ट्रेडने खिन्नपणे मान हलवली.
"पोलिसांना असं काही करता येत नाही. आत्ता मला कळलं की तुम्हाला एवढं यश कसं मिळतं ते. पण एखाद्या दिवशी तुम्ही तुमच्या सीमा ओलांडाल आणि फार मोठ्या अडचणीत याल. फक्त तुम्हीच नाही. तुमचा मित्रदेखील "
"इंग्लंडसाठी, घरासाठी किंवा कुर्बान होण्यासारख्या सौंदर्यासाठी आम्ही आनंदाने हौतात्म्य पत्करू. हो की नाही वॉटसन! पण मायक्रॉफ्ट, या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं ते तू सांगितलं नाहीस..."
"फारच छान. कौतुकास्पद आहे. पण या सगळ्याचा उपयोग  तू कसा काय करून घेणार हे मला कळत नाहीये"
टेबलावरचा डेली टेलिग्राफ उचलीत होम्स म्हणाला, " तू पिएरॉटची आजची जाहिरात पाहिलीस का?"
"आजची जाहिरात? त्याने पुन्हा जाहिरात दिली आहे?"
"हो ही बघ."

आज रात्री. नेहेमीच्याच वेळी. दोन थापांची खूण. अतिशय महत्त्वाची मसलत. तुमची सुरक्षितता धोक्यात आहे.
    पिएरॉट

आखाती मुशाफिरी (३)

आजवरचे संस्कार मनाला फटकारीत होते. मी उद्याही असाच वागणार होतो का?
------------------------------------
 दुसऱ्या दिवशी कामाची जुपी झाली तेंव्हा कांही पठाण आपसूक कामाला लागले.कांही मात्र अजूनही घोळका करून आपसात बोलत होते. नुरुलही त्यांच्यातच होता. मी नुरुलला हांक मारली. ती काठी माझ्या हातातच होती.आज माझा आवाज जरा करडा झलेला आहे हे माझा ध्यानात आलं. पण मला त्याचा विचार करावासा वाटला नाही. केवळ काम व्यवस्थित झालेले मला पाहायचे होते.
             नुरुल समोर येऊन उभा राहिला. मी गरजलो, " हो क्या हो रहा है नुरुल ? तामिली क्यूं हो नही रही ? " नुरुल अधोवदनाने म्हणाला, 
           " पठान कलकी फसात अफसोस कर रहा है साब." मी म्हणालो,
" कोई ज़रूरी नही! फसातकी वज़ह काम मुश्तमाम (बिघडले) हो गया. उसका अफसोस करो. जाव, सबको बोलो कामकी फिकर करो. रेहमत-उल्लाही रहीम !" (जग दयाळू देवाची दया आहे).
नुरुल त्या घोळक्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच घोळका कामाच्या ठिकाणाकडे सरकू लागला होता. त्यांना समजले होते की नाही देव जाणे, पण त्यांनी माझे बोलणे बोलणे ऐकले होते. त्याचा मतलबही समजला असावा असें मला वाटले. निदान शेवटचे शब्द तरी समजले असावेत.

छून च्ये!

छून च्ये म्हणजे वसंतोत्सव. चीनी नववर्षाचा उत्सव.

चीनी लोक आपल्याच सारखे उत्सवप्रिय. शरदात चंद्रोत्सव असाच महत्त्वाचा. अर्थात वसंतोत्सवाचा थाट काही वेगळाच. आपल्याकडे दिवाळीला वा युरोप अमेरिकेत नाताळला जे महत्व ते चीनमध्ये नववर्षोत्सवाला. बंगालमध्ये दुर्गापूजेच्या आठवडा-पंधरादिवस आधीपासूनच जसे लोक मनाने पूजेत पोचतात तसे चीनी लोक या सणाच्या चाहुलीने हरखून गेलेले असतात.

केशवसुमारांची 'चिमण्या-२'-एक समीक्षा

गझल: चिमण्या-२ कवी: केशवसुमार

त्या प्रेमिकाच माझ्या मजला कुटून गेल्या
आधी तश्या चुका ही माझ्या घडून गेल्या

समजायला मला ही झाला उशीर होता
माझ्या उचापती पण त्यांना कळून गेल्या

धरल्या मनात होत्या चिमण्या गृहीत साऱ्या
एका क्षणात मजला दुर्गा दिसून गेल्या

माझा पिवळेपणाकडे प्रवास - ५

यापूर्वी: माझा पिवळेपणाकडे प्रवास - ४
आता इस्पितळात चांगलाच जम बसला होता. मिळणारं लक्ष माझ्या 'स्वयं' ला चांगलंच सुखावत होतं.

आज रविवार रात्र. बघायला कचेरीतील लोक आले नाहीत. पण नातेवाईक मात्र येऊन गेले. त्यामुळे आजारपणाला अगदी चार नाही तरी निदान सव्वादोन अडिच चांद लागले.

ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स(४)

अपेक्षेप्रमाणे बेकर स्ट्रीटवरच्या घरात एक सरकारी शिपाई एक चिठ्ठी घेऊन आमची वाट पहात होता. होम्सने त्यावरून नजर फिरवली आणि तो कागद माझ्याकडे दिला.

'सध्या चिलटांची संख्या तशी भरपूर आहे पण इतकं मोठं प्रकरण हाताळू शकणारे मोठे किडे त्या मानाने थोडे आहेत. यातले सध्या विचारात घेण्याजोगे लोक म्हणजे
ऍडॉल्फ मेयर : १३ ग्रेट जॉर्ज स्ट्रीट, वेस्टमिन्स्टर,
लुईस ल रोथिअर : कॅंपडेन मॅन्शन, नॉटिंग हिल आणि
ह्यूगो ऑबरस्टिन : १३ कोल्फिल्ड गार्डन्स, केंझिंग्टन.
यातला ह्यूगो सोमवारी शहरातच होता आणि आता देशाबाहेर आहे अशी खबर आहे. तुला आशेचा काही किरण दिसतो आहे हे ऐकून आनंद झाला. तुझ्या रिपोर्टची वाट सगळं मंत्रीमंडळ बघतंय. वरपासून लोकांचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. तुला गरज पडली तर देशातली सगळी संरक्षक फळी तुझ्या पाठीशी उभी रहायला सज्ज आहे.
--मायक्रॉफ्ट.'

"दुर्दैवाने राणीचे सगळे घोडे आणि राणीचे सगळे सैनिक सुद्धा मला मदत करू शकणार नाहीत." हम्प्टी डम्प्टी कवितेतली ती प्रसिद्ध ओळ उद्धृत करत तो म्हणाला. त्याने लंडन शहराचा नकाशा टेबलावर पसरला आणि त्याच्यावर ओणव्याने वाकून तो उभा राहिला.
"वा. क्या बात है!" समाधानाचा एक सुस्कारा सोडत तो म्हणाला. "परिस्थिती एकदाची आपल्या दिशेने वळायला लागलेली आहे. वॉटसन, बहुतेक आपण योग्य ते सूत्र पकडून ते ओढू शकू. "
अचानक हर्षवायूचा झटका आल्यासारखं हसत माझ्या पाठीवर त्याने एक जोराची थाप मारली.
"मी जरा बाहेर जाऊन येतो. घाबरू नकोस तुला घेतल्याशिवाय मी कुठलंही काम करणार नाही. शेवटी तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आणि चरित्रकार आहेस. मला यायला तासाभरापेक्षा जास्त वेळ लागला तर तुझी वही उघड आणि तू देशाला कसं वाचवलंस ते लिहून काढायला सुरुवात कर. तवर मी येतोच..."
या त्याच्या उत्साहाचा परिणाम माझ्यावर झाल्यावाचून कसा राहील? एरवीच्या गंभीर होम्सकडे बघता त्याच्यात झालेला एवढा बदल हे खरंच कुठल्यातरी चांगल्या गोष्टीचं लक्षण होतं. नोव्हेंबर महिन्यातली ती संध्याकाळ इतकी कंटाळवाणी आणि न संपणारी होती तरीही मी अतिशय उत्सुकतेने त्याची वाट पहात होतो. शेवटी नऊ वाजता एक माणूस त्याचा निरोप घेऊन आला. त्यात असं लिहिलं होतं:

'मी गोल्डिनि रेस्टॉरन्ट, ग्लुसेस्टर रोड, केन्झिन्गटन इथे जेवायला तुझी वाट पाहातो आहे. तू लौकरात लौकर इकडे ये. आंणि येताना एक जेमी, एक कंदील, एक चिझेल  आणि एक रिव्हॉल्व्हर घेऊन ये.
एस. एच.'

बाहेर साठलेलं धुकं आणि विचित्र अंधारी हवा यामुळे एखादा सभ्य निरुपद्रवी माणूस जर या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन गेला तर त्यात कोणालाच काही वावगं वाटलं नसतं. मी काळजीपूर्वक माझ्या ओव्हरकोटाच्या आतल्या खिशांमधे या वस्तू ठेवल्या आणि सरळ सांगितलेल्या ठिकाणाची वाट धरली. तिथे एका जुनाट इटालिअयन रेस्टॉरंटमधे दाराजवळच एका लहान गोल टेबलापाशी माझा मित्र माझी वाटच पहात बसला होता.
"तुझं खाणं झालंय म्हणतोस? मग आपण कॉफी घेऊ. इथल्या सिगार्स चांगल्या आहेत. कमी विषारी. बरं तू हत्यारं आणलीयेस ना?"
"ही काय. माझ्या ओव्हरकोटाच्या खिशात"
"छान. आता मी तुला आत्तापर्यंत मी काय काय केलंय आणि यापुढे काय करायचंय हे सांगतो.
वॉटसन, तुला मी मागेच म्हणालो होतो की कडोगन वेस्टचा मृतदेह गाडीच्या टपावरून खाली पडला. ज्या क्षणी ही गोष्ट माझ्या लक्षात आली की तो मृतदेह गाडीतून नव्हे तर टपावरून खाली पडला होता त्याच क्षणी हेही माझ्या लक्षात आलं की तो तिथे ठेवण्यात आला होता."
"तो पुलावरून खाली टाकला गेलेला असू शकतो का?"
"नाही. तशी शक्यता आजिबात नाही. तू जर एखाद्या डब्याचं टप नीट पाहिलंस तर तुझ्या असं लक्षात येईल की ते किंचित वर्तुळाकार आहे आणि त्याच्या आजूबाजूल रेलिंगसारखं काही नाही. त्यामुळे आपण असं खात्रीपूर्वक म्हणू शकतो की तो मृतदेह तिथे ठेवण्यात आला होता."
"पण कसा?"
"याच प्रश्नाचं उत्तर मला शोधायचं होतं. तुला माहीतच आहे की भुयारी रेल्वेमार्गावर वेस्ट एन्डजवळच्या काही भागात बोगदा नाहीये. या मार्गाने प्रवास करत असताना गाडीच्या टपाला वरच्या बाजूने जवळजवळ लागूनच काही खिडक्या पाहिल्याचं मला अंधुकसं आठवत होतं. आता अशी कल्पना कर की अशा एखाद्या खिडकीच्या खाली गाडी उभी असताना, तो मृतदेह टपावर ठेवणं हे कितपत अवघड जाईल?"
"पण हे किती अतर्क्य वाटतं आहे..."
"वॉटसन, जेंव्हा आपल्याकडे असलेल्या सर्व शक्यता संपतात तेंव्हा मागे राहिलेला पर्याय कितीही अशक्य कोटीतला वाटला तरीही तोच खरा असला पाहिजे हे तुला माहीत आहे. इथे आपल्याकडच्या सगळ्या शक्यता संपल्या आहेत. आपल्या प्रमुख संशयित हेरांपैकी एक, जो नुकताच लंडन शहराबाहेर गेला आहे तो भुयारी मार्गालगतच्या एका वसाहतीतच रहात होता हे मला कळल्यावर मला किती हर्षवायू झाला होता हे पाहून तू आश्चर्यचकित झालास. "
"अच्छा. असा प्रकार होता तर तो..."
"होय. १३ कॉलफिल्ड रोड इथे राहणारा ह्युगो ऑबर्स्टिन हा माझ्या हालचालींचं केंद्र बनला. मी ग्लुसेस्टर रोड स्टेशनवर येऊन माझ्या कामाला सुरुवात केली. स्टेशनवरच्या एका अतिशय तत्पर अधिकाऱ्याने माझ्या बरोबर येऊन कॉलफिल्ड गार्डन्स वसाहतीतल्या घरांच्या मागच्या बाजूच्या खिडक्या मला प्रत्यक्ष दाखवल्या. एवढंच नाही तर, त्यापुढे जाऊन त्याने मला एक मोलाची बातमी दिली, ती अशी की भुयारी मार्ग आणि साधा रेल्वेमार्ग हे एकमेकांना छेदून जात असल्यामुळे त्याच विवक्षित ठिकाणी भुयारी गाड्या बरेचदा बराच वेळ तिथे उभ्या असतात."
"अ प्र ति म! होम्स तू बाजी मारलीस की!"
"इथपर्यंत ठीक आहे वॉटसन. आपण प्रगती करतोय. पण आपलं ध्येय अजून खूप लांब आहे. असो. तर कॉलफिल्ड गार्डन्सच्या मागच्या भागाची पाहणी करून झाल्यावर मी पुढूनही जाऊन या गोष्टीची खातरजमा केली की आपलं पाखरू घरट्यात नाही. ते घर तसं वैशिष्ट्यपूर्ण आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे तिथलं फर्निचर फक्त घराच्या वरच्या मजल्यावर ठेवलेलं आहे. ऑबरस्टिन त्याच्या एकाच हरकाम्या नोकराबरोबर तिथे रहात होता. बहुधा हा नोकर त्याचाच विश्वासू हस्तक असेल. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ऑबरस्टिन त्याचं डबोलं  पोचवण्यासाठी देशाबाहेर गेलेला आहे. पण त्याला अटक होईल अशी साधी शंकाही त्याच्या मनात नसणार. त्याच्या घरी एखादी लहानशी घरफोडी घडून येईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नसेल....
आत्ता आपण तेच करणार आहोत!"
"आपण एखादं वॉरंट मिळवून कायदेशीर झडती घेऊ शकणार नाही का?"
"आपल्याकडे काहीच पुरावा नाही."
"नक्की काय करायचंय आपल्याला?"
"तिथे संपर्काची कुठली माध्यमं असू शकतील आपल्याला माहीत नाही..."
"होम्स मला हे पसंत नाही..."
"अरे बाबा, तू फक्त रस्त्यावर उभं राहून नजर ठेवायचीस. घरफोडीचं काम मी करणार आहे. ही वेळ नैतिक गोष्टींबद्दल विचार करत बसण्याची नाही. मायक्रॉफ्ट, कॅबिनेट, नौदलाचं ऑफिस आणि इतर कितीतरी लोक आपल्याकडे आशेने डोळे  लावून बसले आहेत. आपल्याला गेलंच पाहिजे."
यावर उत्तरादाखल मी खुर्चीतून उठून उभा राहिलो.
"खरंय तुझं म्हणणं होम्स. आपल्याला गेलंच पाहिजे..."
तो एकदम उठून उभा राहिला. त्याने माझा हात हातात घेतला.
"वॉटसन,मला माहीत होतं तू या गोष्टीला नक्की तयार होशील." एक क्षणभर त्याच्या डोळ्यात त्याच्या स्नेहार्द्र मनाचं प्रतिबिंब थरथरताना मला दिसलं. आजवर मला मिळालेली त्याच्या स्नेहाची ही सगळ्यात मोठी पावती होती. पण क्षणभरातच त्याच्यातला तो कार्यशील माणूस पुन्हा जागा झालेला मला दिसला.
"ते ठिकाण इथून अर्ध्या मैलावर आहे. पण घाई करण्यासारखं काही नाहीये. आपण चालतच जाऊ. चुकूनसुद्धा हत्यारं खाली पडू देऊ नकोस. आत्ता या वेळी संशयास्पद परिस्थितीमधे तुला जर अटक झाली तर भलतीच आफत ओढवेल..."
कॉल्फिल्ड गार्डन्स म्हणजे लंडनच्या वेस्ट एन्ड भागातल्या मध्य विक्टोरियन युगाचं ठळक प्रतीक असणाऱ्या मोठे मोठे खांब असलेल्या वैषिष्ट्यपूर्ण वास्तुशैलीतल्या घरांच्या ओळीतली आणि परिसराला शोभेश्या सर्व वस्तुवैशिष्ट्यांनी नटलेली एक इमारत होती.त्याच्या शेजारच्या घरातून मुलांच्या हसण्या खिदळण्याचे आणि पियानोवर वाजवल्या जाणाऱ्या संगीताचे आवाज येत होते. तिथे बहुधा एखादी लहान मुलांची पार्टी चाललेली असावी.धुकं अजूनही रेंगाळत होतं.  त्याच्या पडद्यातून होम्सने आपल्या हातातला कंदील त्या घराच्या प्रचंड दरवाज्यावर उजेड पडेल असा धरला.
"हम्म ही जरा अडचणीची गोष्ट आहे. या दाराला कुलूप लावलेलं आहे आणि कड्याही घातलेल्या आहेत. मला वाटतं, आपल्याला एरियामधे*२ जावं लागेल. शिवाय एखाद्या अतिउत्साही हवालदाराने आपल्या कामात अडथळा आणू नये म्हणून खाली जायला एक छान बंदिस्त वाट आहे तिथे आपल्याला लपता येईल. चल मला खाली जायला मदत कर आणि मी तुला खाली ओढून घेतो.
मिनिटभरातच आम्ही एरियामधे होतो आणि तेंव्हाच एका पोलीस हवालदाराच्या पावलांचा आवाज आमच्या डोक्यावरून दूर गेला.होम्सने खालच्या दाराचे स्क्रू काढायला सुरुवात केली त्याला बरीच ताकद लावायला लागत होती पण अखेरीस एक जोरदार आवाज करत ते उघडलं गेलं. आम्ही आत गेलो आणि ते दार आतून लावून घेतलं. होम्सने हातात धरलेल्या कंदिलाच्या प्रकाशात आम्ही एका गोल जिन्यावरून वर जायला सुरुवात केली. कंदिलाच्या प्रकाशात आम्हाला एक जमिनीलगतची खिडकी दिसली.
"ही बघ वॉटसन, हीच ती खिडकी असणार..." त्याने ती खिडकी उघडली आणि त्याच क्षणी बाहेरून एक हलकासा आवाज यायला लागला आणि काही क्षणातच कानठळ्या बसतील इतका वाढला. धडधड आवाज करत एक भुयारी गाडी अंधारातच आमच्या समोरून निघून गेली. होम्सने खिडकीच्या तावदानावर प्रकाश पडेल अशा बेताने कंदील पुढे नेला. ते तावदान गाड्यांच्या चिमण्यांमधून उडणाऱ्या धुराच्या काजळीने भरलं होतं पण त्या काळ्या पृष्ठभागावर मधून मधून काजळी पुसली गेल्याच्या खुणा होत्या.
"त्यांनी ते प्रेत कुठे ठेवलं होतं त्याच्या खुणा दिसतायत बघ... अरेच्या! हे बघ काय आहे.खात्रीने  हा रक्ताचा डाग आहे. " खिडकीच्या लाकडी चौकटीला पडलेल्या एका फिक्या डागाकडे त्याने निर्देश केला. "आणि  जिन्याच्या दगडावरही डाग आहे !  आपली तपासणी झाली. आपण एखादी ट्रेन इथे थांबेपर्यंत वाट पाहू या.."
आम्हाला फार वेळ वाट पहावी लागली नाही. पुढचीच गाडी रोरावत बोगद्यातून बाहेर आली पण तिचा वेग कमी कमी झाला आणि आमच्या समोरच ती थांबली. खिडकीची चौकट आणि गाडीचं टप यांच्यात चार फुटाचंदेखील अंतर नव्हतं. होम्सने हळूच ती खिडकी बंद केली.
"आत्तापर्यंतच्या गोष्टी तर सगळ्या पटण्याजोग्या दिसताहेत. वॉटसन, तुझं काय म्हणणं आहे यावर?"
"बिनतोड! ही तुझी आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे! "
"नाही मला तुझं म्हणणं मान्य नाही. मृतदेह गाडीच्या टपावरून खाली पडला असावा ही शक्यता माझ्या लक्षात येणं ही काही फार मोठी गोष्ट नव्हती आणि ज्या क्षणी ती माझ्या डोक्यात आली त्या क्षणापासून हे पुढचं सगळं अपरिहार्यच होतं. जर हे प्रकरण इतकं गंभीर नसतं तर आपला इथवरचा प्रवास फारच क्षुल्लक ठरला असता. आपले प्रश्न अजून संपलेले नाहीत पण आपल्याला इथे काहीतरी महत्त्वाची वस्तू सापडेल अशी शक्यता आहे."
स्वयंपाकघराकडे जाणारा जिना चढून आम्ही पहिल्या मजल्यावरच्या खोल्यांजवळ आलो.एका खोलीत जेवणघर होतं. फारच वाईट पद्धतीने दुर्लक्षित आणि महत्त्वाचं असं काहीच नसणारं. मग एक झोपयची खोली होती पण तीही रिकामी होती. उरलेली एकमेव खोली मात्र बरीच उपकारक ठरली. होम्सने तिची काळजीपूर्वक आणि तपशीलवारपणे तपासणी केली. तिचा उपयोग स्टडी म्हणून केला जात असणार कारण जिकडेतिकडे पुस्तकं आणि कागद पसरलेले होते. पद्धतशीरपणे तरीही भराभर होम्सने सगळे ड्रॉवर्स आणि कपाटं मोकळी केली पण त्यात महत्त्वाचं असं काही सापडलं नाही. त्याच्या गंभीर चेहऱ्यावरचं चिंतेचं सावट हटलं नाही. एक तासानंतरही तो तसाच चिंतित दिसत होता.
"त्याने त्याचा माग पुसून टाकलाय. त्याला अडचणीत आणू शकणारा पत्रव्यवहार नष्ट केलाय. ही आपली शेवटची संधी होती."
लिहिण्याच्या टेबलावर एक पत्र्याची पैशांची पेटी होती. आपल्या कानशीच्या मदतीने होम्सने ती उघडली. आत अनेक कागदपत्रांच्या सुरनळ्या होत्या. त्यांच्यावर चित्रविचित्र संख्या, हिशेब अणि आकडेमोडी होत्या पण हे सगळं कशासंदर्भात होतं हे कळायला काहीच मार्ग नव्हता. पण जिथे तिथे दिसणाऱ्या 'पाण्याचा दाब' आणि 'प्रति चौरस इंच दाब' या शब्दांवरून असं वाटत होतं की त्यांचा पाणबुडीशी काहीतरी संबंध असावा. होम्सने वैतागाने ते कागद बाजूला सारले. त्यांच्या खाली फक्त एका पाकिटात काही जाहिराती कापून ठेवलेल्या होत्या. होम्सने ती सगळी कात्रणं बाहेर काढून समोर पसरली. त्याच्या चेहऱ्यावर प्रकटलेली उत्सुकता पाहून त्याला काहीतरी मिळालंय हे मी ओळखलं.
"वॉटसन, हे काय असेल? हा? याच्या टाईपावरून आणि आकारावरून असं वाटतंय की डेली टेलिग्राफ वर्तमानपत्राच्या ऍगनी कॉलमची कात्रणं असावीत ही.पानाचा उजव्या हाताचा वरचा कोपरा. तारखा नाहीयेत. पण हे संदेश ओळीनेच ठेवलेले दिसताहेत. हा बघ. हा पहिला असणार "