आखाती मुशाफिरी (१२)

मी खिशातून माझा बटवा काढून त्यांत होत्या नव्हत्या तितक्या नोटा काढून महंमदखानाकडे भिरकावल्या.
___________________________________________________________

वीजवाहिनी टाकण्याचे काम जसे अखेरच्या टप्प्यांत आले तशी पठाणांची कामाची लगलबग वाढूं लागली. काहीं पठाण उरलेले काम संपवण्याच्या मागे लागले तर कांहीनी आवरासावरीला सुरुवात केली. मी या कामावर तसा बराच उशीरा दाखल झालो असलो तरी पठाण या कामाच्या सुरुवातीपासून होते. त्यामुळे आवरासावर कशी करावयाची हें माझ्यापेक्षा त्यांना अधिक चांगले ठाउक होते. खरं म्हणजे या कामावरची माझी नेमणूक अगदी अंशकालीन असावयाला हवी होती. पण माझ्या देखरेखी खाली काम जरा सुरळीत चालली आहे म्हणतांच त्यात बदल झाला नाही आणि मीही असा कांही रमत गेलो की मलाही बदल व्हावासा वाटला नाही.

आठवणीतल खाणं

माणसाला जगायला काय लागतय? दोन वेळेला गोळाभर अन्न! म्हणताना आपण भले असे म्हणत असलो तरी प्रत्यक्षात मात्र आपण चवी-परीने खात असतो. आता प्रत्येकाच्या आवडीचे असे खास पदार्थ असतात, घरी केलेले वा बाहेर मिळणारे. एखादा पदार्थ म्हणजे कधी कुणाची खासियत असते तर कधी कुठल्या ठेल्याचे वा उपहारगृहाचे वैशिष्ठ्य असते. प्रत्येकाची अशी काही ना काही चविष्ट ठिकाणे असतातच. मात्र याही पलिकडचे असतं ते आठवणीतलं खाणं. तो पदार्थ कायम आठवत राहतो, त्याच्या चविपेक्षा त्याची आठवण आयुष्यभर साथ देते. अशाच काही आठवणी - खाण्याच्या आणि न खाण्याच्याही! 

आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )

राम राम हो मनोगतवाले,

आशे काय पाहून राह्यले माह्याकडे बाप्पाहो तुमी? काय पेहचान नै लागून राह्यली माह्यी तुम्हाले?
नाचीज़को वसंत गडकरी......! छोडो बाश्शाहो ! थे भोट्या ऐकंन तं माह्या कानाखाली जाय काढाले धावंन.
एक तं याले उर्दू काई हजम होत नाही आन्‌ कोनी बोल्लं तं याहीचा भेजा सरकते.

मुलुंड

सहज विकीमॅपीयातून मुलुंड शहराचे दर्शन घेत होतो. चांगल शहर आहे, सुशिक्षित-सुसंस्कृत, संमजस आणि मोठ्या मनाची माणसं राहतात.

'खोसला का घोसला' आणि 'हनिमून ट्रॅव्हल्स प्रा̮. लि.'

निखळ मनोरंजक विनोदी चित्रपटांचा जमाना निघून गेला आहे असे ‘चष्म-ए-बद्दूर’ या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना मी म्हटले होते. क्रिकेटमध्ये जसा ‘कॉमेंट्रेटर्स कर्स’ नावाचा एक प्रकार आहे, की कॉमेंट्रेटरने म्हणावे, की काय फालतू बोलिंग आहे, आणि बोलरने दुसऱ्याच चेंडूवर अफलातून स्विंगने त्रिफळा उडवावा, तसे काहीसे माझ्या बाबतीत झाले आहे.  ’खोसला का घोसला’ आणि ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा̮. लि.’ हे दोन चित्रपट माझ्या पहाण्यात आले आणि ‘चित्रपट हे संपूर्णत: दिग्दर्शकाचे माध्यम आहे’ हे जणू सिद्ध करणाऱ्या या नव्या पिढीच्या दिग्दर्शकांकडून आता नव्या अपेक्षा ठेवता येतील, असे मला वाटू लागले आहे.
‘खोसला का घोसला’ ही दिल्लीत रहाणाऱ्या कमल किशोर खोसला या पापभिरु, मध्यमवर्गीय माणसाची कथा. आयुष्याची पुंजी एकत्र करून त्याने कुठेतरी एक प्लॉट विकत घेतला आहे. खुराणा नावाचा एक बिल्डर तो प्लॉट बळकावतो.तो प्लॉट परत पाहिजे असेल तर तो खोसलाला विकत घ्यावा लागेल, असे खुराणा आणि त्याचे बगलबच्चे खोसलाला सांगतात. हैराण झालेला खोसला पोलिस, कोर्टकचेरी एवढेच काय तर काही गुंडांचीही मदत घेऊन तो प्लॉट परत मिळवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यात त्याचे पैसे तर जातातच, पण त्याला स्वतःलाच तुरुंगात जायची वेळ येते. मग हताश होऊन तो प्लॉटचा नाद सोडून देतो. पण आता त्याची मुले जिद्दीला पेटलेली आहेत. त्यातला थोरला खुशालचेंडू आणि बऱ्यापैकी नाकर्ता, तर धाकटा एकतर ‘चिरोंजीलाल’ या आपल्या चमत्कारिक नावाने वैतागलेला, आणि भारतातल्या या सगळ्या कटकटींना वैतागून अमेरिकेत जायला निघालेला. आसिफ इक्बाल हा व्हिसा एजंट, चिरोंजीलालची मैत्रिण आणि तिचा नाट्यकंपू आता खुराणाकडून पैसे वसूल करण्याचा प्लॅन तयार करतात. असले बेकायदेशीर काहीही करायला खोसलाचा विरोध असतो, पण कशीबशी त्याची समजूत घालून ही टोळी एक भन्नाट प्लॅन तयार करते. मग तो प्लॅन प्रत्यक्षात आणताना झालेल्या गमतीजमती आणि शेवटी खुराणासारख्या पेशेवर बिल्डरला पाणी पाजून त्याच्याच पैशाने त्याचाच प्लॉट परत विकत घेणे - ही आहे ‘खोसला का घोसला’ ची कथा.
‘खोसला का घोसला’ हा संपूर्णपणे अनुपम खेर आणि बोमन इराणी या दोन खांबांवर पेललेला तंबू आहे. या दोघाही नैसर्गिक अभिनेत्यांना कोणताही भूमिका  द्या, ते तिच्यात एकसंध मिसळून जातात. ‘सारांश’ ची पातळी अनुपम खेरला नंतर फारशी कधी गाठता आली नाही हे खरे, पण तो तिच्या फार खालीही कधी घसरला नाही. दिल्लीतही अशी मध्यमवर्गीय, ‘गॉडफिअरिंग’ माणसे आहेत हे पटवून घ्यायचे असेल तर अनुपमचा हा रोल बघावा. गुंडांकडून फसवले गेल्याबद्दल त्याच्या मनात चीड आहे, पण त्याची वसुली म्हणून आपणही बेकायदेशीर वागावे, हे त्याला पटण्यासारखे नाही. घरात खुराणाकडून पैसे वसूल करण्यासाठी चाललेले ‘प्लॅनिंग’ तर त्याला बिलकुल पसंत नाही. पण यामागे केवळ भाबडा आदर्शवाद नाही. आपली मुले कशात तरी अडकतील अशी काळजी आहे. हा अवघड रोल अनुपमने बहारदार केला आहे. घराच्या बांधकामाची योजना करतानाचा त्याचा स्वप्नाळूपणा, खुराणासमोरची त्याची हतबलता, आपल्या मुलांविषयी त्याची काळजी, त्यातूनच अस्पष्टपणे प्रगट होणारा त्याचा अभिमान हे सगळे अनुपमने सुरेख दाखविले आहे.
बोमन इराणीबाबत सांगायचे तर हा माणूस आता ‘टाईपकास्ट’ होतो की काय, अशी भीती बाळगणे चुकीचे आहे, हेच जणू तो वारंवार सिद्ध करून देतो, असे वाटते. ’लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘खोसला का घोसला’ या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याच्या भूमिका सारख्या आहेत, पण त्या अगदी वेगळ्या माणसाने केल्या असाव्या असे रंग त्यांत बोमनने भरले आहेत. ‘खोसला का घोसला’ मधील खुराणा दिल्लीतला ‘टिपिकल’ बिल्डर आहे. त्याची गुर्मी, मस्ती, माज, ‘कायदा माझ्या खिशात’ ही वल्गना… हे मुळातून बघावे असे आहे. अशा व्यक्तींचे एक कुणीतरी गुरुजी, बाबाजी किंवा माताजी वगैरे असतात. मग त्यांच्या समोर ते नतमस्तक वगैरे होतात. पण त्यांची ही श्रद्धाही उथळ, बटबटीत असते. हे अचूक निरीक्षण अर्थात दिग्दर्शकाचे, पण ते तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर उतरवले आहे ते बोमन इराणीने. ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ मध्ये बोमन त्याच्या देहबोलीतून तंतोतंत एका मेडिकल कॉलेजचा डीन आणि एक यशस्वी सर्जन वाटतो आणि इथे एक हावरा, लंपट बदमाष. दिल्लीची पंजाबी लहेज्याची हिंदी त्याने सहजपणाने पकडली आहे. ‘ मल्टीप्लैक्स, शॉपिंग कॉंप्लैक्स…’ असे शब्द तो असे उच्चारतो की डोळ्यासमोर त्याचे ‘सौथ एक्स्टैंसन’ मधले संपन्न पण भडक, अंगावर येणारे अभिरुचीहीन घर उभे रहाते! 
‘खोसला का घोसला’ मध्ये इतर सहकलाकारांच्या भूमिकाही छान आहेत. त्यात मुद्दाम उल्लेख करावा तो म्हणजे नवीन निश्चलचा. नायकाच्या भूमिका करताना त्याने कधी अभिनयाच्या प्रयत्नाचाही आळ स्वतःवर येऊ दिला नाही. पण इथे एका नाटक कंपनीच्या प्रमुखाची - बापूची- भूमिका त्याने मजेत केली आहे. त्याला दुबईस्थित एका एन. आर. आय. चे सोंग आणावे लागते आणि ते करत असताना ‘यार मेरी फट रही है’ हे त्याचे विधान अगदी पटावे, अशी त्याने धमाल केली आहे.  

बलात्कारी तहसिलदार फ़रार-- पोलिसांचे संरक्षण

बलात्कारी तहसिलदार फ़रार-- पोलिसांचे संरक्षण

नागपूर जिल्ह्यातील काटोलचे तहसिलदार श्री मनोहर रघुनाथ चव्हाण हे आपल्याच हाताखाली काम करणाऱ्या एका दलित महिला पटवाऱ्याचे लैंगिक शोषण करुन सध्या फ़रार असून त्यांना जिल्हा पोलिसांचे चांगले संरक्षण मिळत आहे. या बलात्कारी तहसिलदाराने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दाखल केलेला अर्ज २३.०२.२००७ रोजीच फ़ेटाळला गेला असून नागपूर जिल्ह्यातच खूलेआम फ़िरणारा हा आरोपी पोलिसांना कसा दिसत नाही असा प्रश्न उत्पन्न झाला आहे.

पब्लिक की एन्क्रिप्शन

काही दिवसापुर्वी माझ्या मामाला मी पब्लिक की एन्क्रिप्शन म्हणजे काय ते समजावून सांगत होतो. माझा मामा 'संगणक अशिक्षीत' असल्याने दैनंदिन वापरातल्या इतर गोष्टींची उदाहरणे देऊन मी तो विषय समजावायचा प्रयत्न केला. एकंदर माझ्या प्रयत्नांना चांगले यश आले. त्यामुळे मला मनोगतावरही ह्या विषयावर एखादा छोटा लेख लिहावा असं वाटू लागलं. पण गाडी अडलीय ती मराठी शब्दांसाठी. मला मराठी शब्द हवे आहेत. ते मिळाले की लेख येइलच लगेच.

आखाती मुशाफिरी (११)

 मात्र हा खेळ संपू नये असं आता वाटत होतं.
--------------------------------------

 मुदीरचे किंवा आमच्या शेखचे दर्शन घडणे हेंच पठाणांसाठीं मोठे अप्रूप होते. आणि इथें तर मुदीर चक्क पठाणांशी गप्पा मारून गेला होता त्यामुळे तर आनंदाला पारावार नव्हता. मुदीर पठाणांशी काय बोलला तें मला मोईनखानाकडून कळले. पठाणांनी मला दावत दिली हे मुदीरला आवडले होते. तो त्यांना म्हणाला होता,

शेजारी

भाषांबद्दलची एक चर्चा वाचताना मनात विचार आला, हिंदी-उर्दूशी माझी ओळख कधी झाली? उत्तर आले जेव्हा मराठी शिकलो त्याच काळात. आणि याला कारणीभूत होते आमचे शेजारी. मेंदूचे मला नेहमी आश्चर्य वाटते. कुठल्यातरी विचाराने काही न्यूरॉन्स उत्तेजित होतात, मेंदूत झटपट रासायनिक प्रक्रिया होतात, विद्युतप्रवाह वेगाने इकडून तिकडे वाहतात आणि माझे लहानपण झर्रकन माझ्या डोळ्यासमोरून जाते.