असे का?

एकाही जुन्या प्रश्नाचे उत्तर न देता काही नवीन प्रश्न टाकून दीपोत्सव निघून गेला. लक्ष्मीरोडवर दुचाकीच्या पायात सुतळी बाँब फुटला आणि खाली पडतापडता वाचलो. सूतिकागृहात कान गच्च बांधूनही आवाजाने किंचाळणारी आणि थकून केविलवाणेपणाने पडून रहाणारी मुले आणि आधीच निद्रानाशाने छळलेले असताना रात्रीबेरात्रीच्या स्फोटाने अधिक भेदरलेले वृद्ध पाहिले. उडून गेलेल्या लडीत न उडालेले सुट्टे फटाके शोधणारी झोपडपट्टीतली मुले पाहिली, दिवाळीच्या दिवसांतला वाढलेला दारुचा (दोन्ही प्रकारची) खप पाहिला...
ते जाऊ द्या. या वर्षी खरे अस्वस्थ केले ते 'हॅपी दिवाली' ने. मला आलेल्या पन्नासेक दूरध्वनींपैकी फक्त एक मुलगी "सर,तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.." असे म्हणाली. बाकीचे एकोणपन्नास 'हॅपी दिवाली' वाले. मी प्रतिसाद म्हणून 'तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा' असे म्हणालो तरी कुणाच्या काही लक्षात आलेसे वाटले नाही.  
पुढच्या दिवाळीत याची शिस्तशीर वर्गवारी करून 'हॅपी नरकचतुर्दशी, हॅपी बलिप्रतिपदा, हॅपी भाऊबीज, हॅपी भाकड दिवस' अशा शुभेच्छा स्वीकारण्याची तयारी ठेवली आहे.
आजकाल घरच्या घरी सकाळी उठल्याउठल्या आईबापांनी मुलांना, नवराबायकोने एकमेकाला 'गुडमॉर्निंग' असे म्हणायचे असते म्हणे. घरात कुणी आजारी असले की  घरच्याच लोकांनी 'गेट वेल सून' असे एक कार्ड हळूच आजारी माणसाच्या उशाशी आणून ठेवायचे असते म्हणे, मुलांनी आईला आई आणि बापाला बाबा म्हणणे हे तर केंव्हाच मागासलेपणाचे झाले आहे. (पहा: कोणत्याही वृत्तपत्रातील वाढदिवसाच्या शुभेच्छा - वीसातले अठरा पप्पा, मम्मी किंवा मम्मी डॅडी!), लग्नानंतर पोटुशी राहिलेल्या मुलीकडे 'नवे जुने' नव्हे, तर 'गुड न्यूज' आहे, असे म्हणायचे असते म्हणे!
बरे, एवढेच जर इंग्रजीचे प्रेम आहे, तर पुढे संभाषण इंग्रजीत वाढवून पहा. मंडळी धाडकन देशी भाषेवर येतात. आणि ही देशी भाषा आपलीच असल्याने ती शुद्ध वगैरे असली पाहिजे असे बंधन नाही. आतल्या चड्ड्या-गंजिफ्राक कळकट आणि भोके पडलेले चालतील, वरच्या शर्टची इस्त्री कडक पाहिजे!
मुद्दा इंग्रजी-मराठीचा नाही. संस्कृती-परंपरेचा तर नाहीच नाही. सवाल आहे तो गोंधळलेल्या मनस्थितीचा. प्रश्न आहे डोळ्यावर झापड ओढण्याचा.
आपले काही चुकते आहे, असे या लोकांना वाटत नाही का?
की खरेच यात चुकीचे असे काही नाही?

आगळावेगळा पक्षी- २

अंटाक्टिका भागातील पेंग्विन्स


अंटार्क्टिका भागात पेंग्विनच्या एम्परर, जेंटू, ऍडली व चिनस्ट्रॅप ह्या जाती आढळतात .







antmap2

"ऑनलाईन अंताक्षरी " सूत्रधार आणि प्रबंधक हवे आहेत

"ऑनलाईन अंताक्षरी " सूत्रधार आणि प्रबंधक हवे आहेत. मनोगतावरची अंताक्षरी तांत्रिक मर्यादांमुळे बंद आहे असे दिसते. चॅट मध्ये कुणी चालू करण्यात यशस्वी झाल्याचे ऐकण्यात नाही.तेव्हा  याहू ग्रुप देवनागरी  तर्फे अंताक्षरी चालू करावी असा प्रस्ताव आहे . परंतु मला स्वतःला पुरेसा वेळ नसल्या मुळे सूत्रधार किंवा प्रबंधक होवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी याहू ग्रुप देवनागरी  चे सभासदत्व घेऊन याहू आयडी या चर्चेत द्यावा/व्यनि पाठवावा हि विनंती.

जुने ते सोने! भाग -२

अंजूने सुरवात केलेला चर्चाप्रस्ताव ह्या आधी जुने ते सोने! भाग-१

जाहिरातीवरून अजून एक जाहिरात कायम लक्षात राहिलेली म्हणजे रीन वडीची आसावरी जोशीची  दाग! "ढूंढते रहे जाओगे"


 


 

जुने ते सोने!

मंडळी,
आज आपण काही जुन्या गोष्टींना उजाळा देऊयात का? एखादी पूर्वी आवडणारी कोणतीही गोष्ट किंवा वस्तू जी आता उपलब्ध नाही/सहजासहजी मिळत नाही, काळाच्या ओघात मागे गेल्या अशा गोष्टींची चर्चा करूयात का?
जसे आपल्याला आवडत असणारी पूर्वीची उत्पादने, पुस्तके, गाणी, मालिका, वापरातून गेलेले काही शब्द (तुमचे, तुमच्या आजी-आजोबांचे वगैरे), पदार्थ इ. इ.
मग करायची का सुरुवात?
अंजू

आगळावेगळा पक्षी- १

 आगळावेगळा पक्षी- १              


        रंगीबेरंगी पिसारा फुलवणारा मोर, झाडावर टकटक आवाज करत लाकूड तोडणारा सुतार पक्षी, एका पायावर झोपणारा हेरॉन, आपल्या चोचीलगतच्या पिशवीत एक मोठा मासा ठेवू शकणारा पेलिकन, वेगाने पंख हालवणारा हमिंगबर्ड ही काही वैविध्यपूर्ण पक्षांची उदाहरणे आहेत. या सर्वाहून अधिक लक्ष वेधणारा पक्षी म्हणजे पेंग्विन असे आम्हाला वाटते.

आमच्या नशीबात प्रेमंच नाही - क्षितिज

        ....    आमच्या नशीबात प्रेमंच नाही   .....



का कळत नाही पण,
हल्ली मन थोड कठोर झालंय


"प्रेम" ह्या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालांय


प्रेम... प्रेम... प्रेम... बसं झालं आता


अरे, एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणारच नाही
तर मग त्या गोष्टीचा विचार वारंवांर का?

आप्पा कुलकर्णी - एक हजरजबाबी (इरसाल) व चतुरस्र व्यक्तिमत्व

 

आजच मनोगत वाचनांत आप्पा कुलकर्णीचा 'पुणेरी इरसालपणा' वाचनांत आला. पुढे ह्याचे मूळ लेखन लोकप्रभेमध्ये श्री. सुधीर गाडगीळांनी 'वैशाली-रुपाली' या सदरांत केले हे समजले. माझ्या आठवणीत 'आप्पा कुलकर्णी' या व्यक्तिमत्त्वाची ओळख श्री. गाडगीळांनी प्रथम 'मुलखावेगळी माणसं' (किंवा जगावेगळी) या आपल्या दै. सकाळच्या लेखमालिकेतून करून दिली होती. आप्पा या बहुरंगी, बहुढंगी, बहुश्रुत अशा अक्षरशः: चुतुरस्र व्यक्तिमत्त्वाशी माझा प्रत्यक्ष स्नेह आहे. त्यामुळेच 'इरसालपणा'व्यतिरिक्त त्याचे काही रंग मनोगत वाचकांसाठी मांडावेत असे वाटले. अर्थातच श्री. सुधीर गाडगीळ यांनी आपल्या समर्थ खुमासदार शैलीत केलेले त्यांचे व्यक्तिचित्रण वाचलेल्यांसाठी काही गोष्टींची पुनरुक्ती होईल, पण त्यांना 'आप्पा' या व्यक्तिमत्त्वाच्या वाचनाच्या आठवणींना सुखद उजाळाच मिळेल.