सावंताची सुधा - (भाग-१) - क्षितिज येलकर

सावंताची सुधा  - (भाग-१)


सुधा...
सुंदर अशी धारणा
नावातचं सर्व काही लपलयं


सावंताच्या तीन लेकी पैकी एक
सर्वात धाकटी, ती म्हणजे सुधा


सावंताच्या पोरी म्हणजे अगदी सरळ आणि सौम्य


चाळीतल्या गल्लीतून जेव्हा हा पक्षी बाहेर पडतो,
मग नाक्यावरच्या सर्व नजरा ह्या पक्षाकडे.

कचरा एक जिवन : क्षितिज येलकर

                           कचरा एक जिवन


 तुटलेल्या बडमिंटनच वरचं टोक वाकवून मुठीत धरलेल हत्यार व पाठीवर तागाची गोणी टाकून सकाळी ६ वाजता घरातून निघणारी पोरांची माय.. ओळखलात का कोण?


 तुमच्या आमच्या बघन्यात येणारी, बहुतेकदा रस्त्यावर मुन्सिपाल्टीच्या डब्याभोवती आढळणारी किंवा घराच्या मागील दरवाज्याच्या गल्लीतून वावरणारी, दिवसाअखेरी लोकांच्या निरुपयोगी वस्तुंच्या जमलेल्या साठ्यातुन 'कागद' किंवा 'प्लास्टिक' नावाच्या दोन मौल्यवान अलंकारावर जिच्या संसांराच गाडगं भरतं, अशी ती...
        कचरा .. कचरा.. कचरा आणि ती कचरेवाली

युरोपातले अस्पृश्य भारतीय?

मी,तू,आमे,तुमे,अनाव  हे कोणत्याही भारतीय भाषेच्या बोली भाषेचे वाटणारे शब्द एक युरोपीय समुदाय वापरतो ,या समाजाचे नाव 'रोम' आणि त्यांची भाषा रोमानी .रोम हा संस्कृत शब्द असू शकतो हा मला नवाच शोध लागला त्यांच्या विषयी माहिती इंग्लिश विकिपीडियावर माहिती वाचताना. सर्वच युरोपीय समुदायांनी या भारतीय वंशाच्या भटक्या समुदायाला दिलेली वागणूक वाचली की खेद वाटतो. त्यांपुढे  हिटलरच्या नाझी जर्मनीने 'रोमांची' ज्यूप्रमाणेच केलेली अमानुष कत्तल आणि 'पुरोगामी' राष्ट्रांनी त्यांच्या वर झालेल्या अन्याया कडे केलेलं दुर्लक्ष. आणि त्याही पलीकडे भारतातून परागंदा झालेल्या  मूळ भारतीय वंशाच्या माणसांबद्दल भारतीयांचं दुर्लक्ष. अधिक माहितीचे विकिदुवे

अपशब्द

शिव्या देणे अपशब्द उच्चारणे केव्हाही वाईटच. पण या बद्दल कोणी काही ज्ञान देउ लागला की लोक नाकं का मुरडतात? हे नक्कीच मौलिक ज्ञान नाही. पण असे अपशब्द माहीतच नसावे असे का? त्याशिवाय आपल्याल कसे कळणार की आपल्याबद्दल माणसे वाईट बोलतायत ते? किमानपक्षी आपल्याला कसे कळणार की समोरचा माणूस चिडलाय आता आपल्याला गप्प बसायचे आहे? ( हे असे हलक्याप्रकारचे ज्ञान वापरायचे नसतेच.

दलित चळवळ

दलित चळवळीचा पहिला हूंकार म.फूलेंच्या रूपाने १९व्या शतकात उमटला. नंतर विसाव्या शतकाच्या आरंभी डॉ.आंबेडकरांच्या रुपाने या चळवळीला खंदे नेतृत्व मिळाले. बाबासाहेब आंबेडकरांनंतर एकही खंदे नेतृत्व मिळाले नाही. 


नंतर दलित पँथर जन्माला आली . ठोशास ठोसा हे या चळवळीचे ब्रीद.इथेही मतभेद झाले.पँथर फूटली.