जावे त्यांच्या वंशा....

           पुणे-मुंबईत रोज गाडीवरून, लोकलमधून प्रवास करणाऱ्या,नोकरी करून, घर संसार सांभाळूनही नीटनेटके राहण्यार्या सर्व स्त्रियांना माझा साष्टांग नमस्कार! मी मुंबईला २ वर्षे राहिले आणि हे सर्व पाहिलेही आहे.मग आता अचानक हा विषय कसा काय?तर त्याचं असं झालं.....
           गेले काही दिवस माझ्या शेजारणी मला म्हणत होत्या 'अगं, किती साधी आहे तुझी हेअरस्टाईल? कधीही आपले बांधलेले असतात. जरा बदल कर आता.' ही गोष्ट काही मी पहील्य़ांदा ऎकली नव्हती. गेले २५ वर्षे मी बरीच बदलले असले तरी केस कापण्याची माझी हिंमत झाली नव्हती. घरात आईबाबांचे 'मुलींचे केस मोठेच असले पाहिजेत' हे विचार पक्के असल्यामुळे आणि आनुवंशिक देणगीमुळे माझे केस 'खूप लांब, दाट आणि काळे' या प्रकारात मोडत. मोठे झाल्यावर, हट्ट करून पाहिला की मला केस कापायचे आहेत. यावर 'नवऱ्याच्या घरी गेल्यावर काय करायचे ते कर' असे उत्तर मिळे. आणि आमचे नशीब असे की २२ वर्षे हे उत्तर ऎकल्यावर, नवराही असा मिळाला की त्याने आधीच सांगितले की मला तुझे केस खूप आवडतात त्यामुळे कापण्याचा प्रश्न कायमचाच मिटला. आता दोष तरी कुणाला देणार? आमचा प्रेम-विवाह. आता एव्हढी प्रस्तावना जरा जास्तच आहे.पण जित्याची खोड....              

पुस्तक प्रकाशना/हक्का बद्दल माहीती

नमस्कार,


आपल्यातले बरेचजण चांगले लेख/कविता लिहीत असतात. त्याचे हक्क टिकण्याच्या दृष्टिने आणि प्रकाशन करण्यासाठी म्हणून  एक ठिकाण मिळाले आहे,  (याच्याशी माझा कुठलाही व्यावहारीक संबंध नाही!) ते फक्त माहीती म्हणून देत आहे. त्याचे नाव आहे: लुलु.कॉम

पौष्टीक भेळ

वाढणी
२ जणांसठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • मोड आलेले मुग , चणे किंव्हा आवडत असलेले कडधान्य -प्रत्येकी १/२ वाटी
  • १ कांदा (बारीक चिरलेला- सधारण १/२ वाटी)
  • १/२ टॅमाटो (बारिक चिरलेला)
  • चाट मसला (आवडी नुसार)
  • चिंच-गुळ चटणी आणि हिरवी चटणी सधारण २ चमचे (दोंन्ही चटण्या नेहमीच्या भेळीसाठी करतो तश्या कराव्या)
  • बारीक शेव, बरिक चिरलेली कोथिंबीर

मार्गदर्शन

पैले दोन म्हैने

निघालो


भारतात येऊन उणेपुरे दोन महिने झाले. त्याचा हा संक्षिप्त आणि वाकडा तिकडा बखरनामा, जसा सुचेल तसा:


मुंबई विमानतळावर आम्ही उतरलो खरे, पण आमच्या सहा बॆगांपैकी एकही उतरली नाही. त्यामुळे भारतातल्या पहिल्या सकाळी आंतर्वस्त्र खरेदी करण्यात आली ...

गंमतग्यान

गंमतग्यान


आयुष्यात यशस्वी होण्याची सात गुपिते कोणती?


ती तुमच्या घरातच तुम्हाला सापडतील... नीट पाहा, नीट ऐका.


पंखा सांगतो, थंड राहा... उगाच गरम होत जाऊ नका.


छत सांगतं, ध्येय उंच ठेवा.


खिडकी सांगते, चौफेर जग पाहा.


घड्याळ सांगतं, प्रत्येक मिनिट मौल्यवान आहे.

कॅशियर

कॅशियर बंडू बावळे कॅशबुकात एन्ट्री करीत असतानाच 'हँड्स अप' असा आवाज आला, कानाखाली गारगार बंदुकीच्या नळीचा स्पर्श झाला. त्याच्या तोंडात बोळा कोंबून दरोडेखोरांनी त्याच्या डोळ्यांदेखत तिजोरी रिकामी केली. गोण्यांमध्ये नोटा भरल्या. कॅश काउंटर पूर्णपणे साफ केला.