धुळयातले चित्रपट

 धुळे हे उत्तर महाराट्रतिल एक शहर ज्याला खान्देश म्हनुनहि ओळखतात.


तर मी सांगणार आहे मी धुळे येथे पाहिलेल्या चित्रपटाविषयी .


तर धुळ्यात पहाटे सहा वाजतं नवा चित्रपट प्रदर्शित होत असे त्यासाटी आमचे काही होतकरू मित्र पहाटे पाच वाजेपसुन राग्नेत थांबतं असतं. अश्या पाहिल्या शोला मी नाना पाटेकरचा "क्रांतिवीर "बघीतलेला आठवतो. अन् हाहा सकाळच्या प्रासादिक वेळेत नानाचे ते डायलाग,त्यानेतर अनेक चित्रपट बघितले पण त्या शोची मजा काही औरच. ही अनुभवायची गोष्ट आहे मित्रानू.अश्याच पहाटेचा सत्रात "बौडर,तिरंगा ,असे चित्रपट पाहिल्याचे आठवतात.(यावरून माझी बायको{मूळ पुण्यातली } आमची कधीही टिंगल करते.

महाराष्ट्र दालन

इंग्रजी भाषेतील विकिपीडियात भारतीय विकिपेडीयन्सनी भारतीय लेखांकरीता स्वतंत्र भारतीय दालन (पोर्टल)उघडले आहे.  भारतीय विकिपेडीयन्सनी महाजालावर केलेल्या एका चांगल्या यशस्वी सहकार्याचे प्रतीक आहे.

नाथाघरची उलटी खूण

नाथाघरची उलटी खूण म्हणजे नक्की काय? या शब्दप्रयोगाचा उगम काय?


याचा संत एकनाथांशी संबंध आहे का?


हा शब्द अनेकवेळा वाचला पण नक्की अर्थ कळला नाही. जाणकार थोडा प्रकाश टाकतील काय? अशाप्रकारचे मराठी शब्द्प्रयोग महाजालावर कोठे मिळतील?

हे कसे करावे?

काही जुनी तसेच काही शासकीय मराठी संकेतस्थळे डाउनलोड करून वाचण्याचे संगणक टंक वापरून बनवली आहेत.त्यांनी दिलेल्या हेल्पचा वापर करूनही मला ही संकेतस्थळे वाचता आली नाहीत.रुपांतरणाची एक शासकीय आज्ञावलीपण पाहीली पण काही उपयोग झाला नाही.हे कसे करावे?

'प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा'

मी खाली एक 'प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा' साचा सार्वजनिक उपयोगा करिता उपलब्ध करून देत आहे. काही सूचना,उद्घोषणा असतील तर जरूर नोंदवाव्यात.


-विकिकर


प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा,


"मी ( नाव:        ।टोपण नाव: ) अशी उद्घोषणा करतो की ".........."ह्या शीर्षकांचे या ".... दुव्या "(...या स्रोतांत प्रकाशित) वरील संपूर्ण लेखन/छायाचित्र माझे मूळ लेखन आहे.त्याचा प्रताधिकार माझ्याकडे आहे. इथे नमूद केलेले हे लेखन (पर्याय- .....या संकेतस्थळा वरील माझे सर्व लेखन/छायाचित्र) मी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने , बौद्धिक संपत्ती व प्रताधिकारातून मुक्त करत आहे.या नमूद  लेखन/छायाचित्राचा उपयोग कुणीही,माझ्या कोणत्याही बंधना शिवाय,( कायद्यांची इतर बंधने असतीलतर,अशी व्यक्ती, स्व-जबाबदारीवर ) कोणत्याही स्वरूपात वापर सार्वजनिक स्वरूपात करू शकते.

भयोत्सव (भाग - १)

ऑक्टोबरच्या महिन्यापासूनच अमेरिकेत एकेका सणाला सुरुवात होते. ऑक्टोबरमध्ये हॅलोवीन, नोव्हेंबरमध्ये थॅंक्स गिव्हिंग आणि डिसेंबरमध्ये ख्रिसमस. भयकथांच्या विलक्षण आवडीमुळे हॅलोवीनबद्दल फार पूर्वी पासूनच वाचले, ऐकले होते. त्यावेळी हा सण फारच अघोरी असावा व यामुळे समाजात भीती वाढत असावी की काय असे वाटत असे, परंतु अमेरिकेला आल्यावर या विचारांतला फोलपणा मला कळून आला. घाबरण्याचा आणि घाबरवण्याचा हा सण अतिशय लोकप्रिय असल्याचे लक्षात आले. लहान थोरांना आवडणाऱ्या आणि या महिन्यात येणाऱ्या हॅलोवीनच्या सणाचे औचित्य साधून हा लेख लिहायचे मनात आले.