इरसाल

हा किस्सा मला ई-मेल मधून आला. मूळ लेखक माहीत असल्यास सांगावे.
हॅम्लेट
-------


काही वेळेला खोडी काढायचे मनात नसते. पण ग्राहकाने अनाठायी शंका विचारून बेजार केले तर 'इरसाल पुणेरी' उत्तराची चपराक बसते. उदा. शिट्‍टीवर सुरेल गाणं सादर करणारा अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बॆंकेत होता.

प्रेम करण्याचे कारण!

एका ई मेल मधुन आलेली गोष्ट, जमला तसा अनुवाद केला. आपल्या सगळ्यांसाठी इथे देत आहे. मोरू यांच्या 'पहीलं प्रेम' चर्चेमुळे हा अनुवाद करावा वाटला पहिल्या प्रेमाशी जरी या कथेचा संबंध नसला तरी 'प्रेमाशी' नक्कीच आहे :) 


------------------------------------------------------------

माझा ब्लॉगप्रवास

माझ्या अनुदिनीवर २-३ महिन्यापूर्वी लिहीलेला हा लेख, वाचकांकरता पुन्हा इथे देत आहे.


आज बयाच दिवसांनी माझे प्रयत्न मला खुपसे समाधान आणि एक उमेद देउन गेले.

किस्सा अभ्यासाचा

मी आणि लेकरु यांच्यात अभ्यासावरून वादंग अगदी ठरलेलेच असतात. त्याला अभ्यास न करण्यासाठी रोज नवी सबब सुचते आणि याला इतक्या शतश: सबबी रोज कशा काय सुचतात याचं मला आश्चर्यच वाटतं. एकदा महाशिवरात्रीचा उपास होता. छानपैकी साबूदाण्याची खिचडी वगैरे खाऊन आम्ही दोघं अभ्यासाला बसलो. अभ्यास का करावा या बद्दल माझी लेक्चरबाजी सुरु झाली. मी त्याला समजावू लागले...

एकश्लोकी भागवत, महाभारत

दिगम्भांच्या लेखावरच्या प्रतिक्रियेतून एकश्लोकी रामायणाचा दुवा मिळाला.  तिथे असं कळलं की एकश्लोकी महाभारताबद्दल ऐकलं नाही. पण आम्ही लहानपणी जे श्लोक म्हणायचो त्यात एकश्लोकी रामायणासोबतच भागवत आणि महाभारत पण असायचं.  उच्चार जसे आठवले तसे लिहितेय.   जाणकार चुका दुरुस्त करतीलच.

माणुसकी - एक अनुभव

(या अनुभवास काय शीर्षक द्यावे कळत नव्हते. तुम्हीच सांगा एखादे.)           

           अडीच वर्षापूर्वीची गोष्ट असेल.आयुष्यातील सर्वात त्रासदायक काळ होता तो.मी वैयक्तिक अडचणींमधून जात होते. अगदी उध्वस्त करून टाकणाऱ्या वादळासारख्या.. मी मुंबईत राहत होते तेंव्हा. मला सोबत म्हणून माझी आईही आली होती थोड्यादिवसांकरता. एके रविवारी आम्ही सिद्धीविनायकाला जायचं ठरवलं.माणूस दु:खात असतानाच देवाच्या जास्त जवळ असतो नाही का? असो.. तर त्यादिवशी दुपारी मी,आई, माझी रूममेट आणि तिचा एक मित्र आम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलो. फारच शांत वाटत होतं तिथे मनाला. थोड्यावेळाने आम्ही परत घरी आलो. त्या दिवशी तसं विशेष काहीच घडलं नाही. कालांतराने माझी ती रूममेट आपल्या गावाला निघून गेली आणि मी सहा महिन्यात अमेरिकेला आले. आणि काळाबरोबरच माझ्या अडचणी पण संपत गेल्या, माझ्या आयुष्याची गाडी रुळावर यायला लागली.पण तो दिवस मला आज चांगलाच लक्षात राहिला कारण... 
           थोड्या दिवसांपूर्वीच माझ्या रूममेटचा तो मित्र मला अमेरिकेत एका ठिकाणी भेटला,एका समारंभात.आता आम्ही काही खास मित्र नव्हतो, फक्त 'हाय-बाय' पुरतेच. प्राथमिक गप्पा झाल्या आणि आम्ही घोळक्यात मिसळून गेलॊ.थोड्यावेळाने आम्ही दोघेच एका ठिकाणी होतो आणि तो मला म्हणाला 'तुला आठवतंय आपण एकदा बरोबर सिद्धिविनायकाला गेलो होतो'. मी म्हणाले हां आठवतंय खरं. तो म्हणाला " मला जास्त काही माहीत नव्हत तुझ्या अडचणी बद्द्ल पण तुझा उदास चेहरा पाहून फार कसंतरी वाटलं होतं. त्यादिवशी मी सिद्धिविनायकाकडे एकच मागितलं. 'देवा, या मुलीची जी काही इच्छा असेल ती पुरी कर'. आज तुला इथे,इतके निवांत, खुशीत पाहून मला खूपच आनंद होतोय. "
           तुम्हीच सांगा मी या मुलाला काय म्हणणार होते? माझे सारे शब्द अपुरे होते. कुणीतरी कुणासाठी निरपेक्ष भावनेने केलेल्या प्रार्थनेला 'माणुसकी' च म्हणता येईल ना? त्यादिवसानंतरही आम्ही फारसे बोललो नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की कळली. अशाच लोकांच्या प्रार्थनेने मला अनेक संकटातून पार पाडलंय.आजही त्याची वाक्यं आठवली की मला देवाचे आभार मानावेसे वाटतात असे लोक माझ्या आजूबाजूला असल्याबद्दल....

रोमन इतिहासाबद्द्दल महितीसाठी पूस्तक?

नमस्कार!!


मला रोमन राजे ह्यच्याविषयी ,रोमन इतिहासाबद्द्दल माहितीपर पुस्तक हवे आहे . कुणी नावे कळवाल का?मी एक एकाकिका लिहित आहे त्यासाठी मला लवकरात लवकर अभिप्राय कळवा.


धन्यवाद in advance

वाचनालय

महाजालावरचे वाचनालय हा लेख मी मनोगतावर वाचला. त्यानंतर लेखकाने 'अनामिका' नावाचे संकेतस्थळ सुरु केले होते. पण गेले काही दिवस ते बंद आहे. पण त्या निमित्ताने माझ्या मनात एक विचार आला. 'अनामिका' हे सुध्दा मराठी साहीत्य सुलभपणे उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आले होते. त्यात इतरांकडे असलेली ई-बुक्स सगळ्यांना सार्वजनिक रीत्या उपलब्ध करून द्यायचा हेतू होता. तसेच मान्यवरांचे साहित्य या प्रकारात (ई बुक) आणायचा हेतू होता. पण माझा विचार थोडा वेगळा आहे.