जपानवरील अणुहल्ले
या घटनेनंतर ६० वर्षाने तटस्थपणे बघण्याची आणि योग्य विश्लेषण करण्याची भूमिका घेतली पाहिजे. खालील घटना(क्रम) लक्षात घेतल्या पाहिजेत.
दुसऱ्या महायुद्धात पश्चिम आघाडी (जर्मनी आणि अनुयायी) ७ मे १९४५ ला जर्मनीच्या बिनशर्त आणि संपूर्ण शरणागतीने संपली. या आघाडीवर मुख्य ब्रिटन आणि अमेरिका होते. फ्रान्स त्यावेळेला जर्मन आधिपत्याखाली आले होते त्यामुळे त्यांचे भूमिगत सैन्य प्रामुख्याने मातृभूमीची मुक्तता करण्यात अडकले होते. या महायुद्धात सोव्हिएत युनियन -त्यांच्याविरुद्ध जर्मनांनी हल्ला/आक्रमण केले म्हणूनच- उतरले. या युद्धाचा फायदा घेऊन पूर्व युरोपमध्ये त्यांना आपले वर्चस्व स्थापण्यास मोठी मदत झाली. तोपर्यंत त्यांनी जपान विरूद्ध युद्ध सुद्धा पुकारले नव्हते. यावेळेस चीन ही नगण्य सत्ता होती.