मला मनोगतवर एक अडचण येतेय. मी मनोगतवर येण्याची नोंद केली. काही चर्चा वाचल्या. त्यापैकी एका चर्चेला प्रतीसाद दिला. त्यावेळी मला जाब द्यावा लागला. (काही अक्षरे मला उध्रुत करावी लागली). पण त्यानंतर आपोआपच माझी जाण्याची नोंद झाली (LogOut).
आज २१ जून म्हणजे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस. ओघाने दक्षिण गोलार्धातील सर्वात लहान दिवस. या निमित्ताने इंग्रजीतील शेवटच्या अक्षराचा अमेरिकन उच्चार असणा-या एका हिंदी वृत्तवाहिनीने खास कार्यक्रम ठेवला होता. दरवर्षी घडणा-या या भौगोलिक घटनेला एवढे महत्व दिल्याबद्दल आधी थोडे कौतुक वाटले पण नंतर भ्रमनिरास झाला. कारण .....
यंदा लवकर आला आला म्हणतांना अजूनही पाऊस हुलकावणीच देत आहे, पण सह्याद्रीत थोडा फार तरी असेल या आशेने रविवारी दिवसभराच्या ट्रेकसाठी शनिवारी १७ जुनला रात्री दहा वाजता कूल, आरती, मिहिर आणि मी असे चौघे पुणे रेल्वे स्थानकावर जमलो. अकराच्या पुणे मुंबई पॅसेंजरने छान झोपून नेरळला पोहोचायचे होते, आणि सकाळी ताजेतवाने होऊन चढाई सुरू करायची होती.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.