सतीशनं आता आपलं अभ्यासाचं टेबलही पश्चिमेच्या खिडकीलगतच आणून ठेवलं होतं. त्यामुळे अभ्यास करता करताही तो खाली बागेकडे म्हणजे खरं तर रचनाकडे बघू शकत होता. दुसरीकडं रचनाच्याही एव्हाना लक्षात आलं होतं की शेजारच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर कुणी नवीन पेईंग गेस्ट रहायला आलाय आणि तो सतत अभ्यास करत असतो, पण त्याच बरोबर तो आपल्याकडं आणि आपल्या बागेकडं बघत असतो.
दोन व्यक्तींमध्ये विवाहपूर्व शरीरसंबंध असणे वा नसणे हा संपूर्णपणे त्या त्या जोडप्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे, हे मान्य. तरीही खालील प्रश्नांसंबंधी मनोगतच्या सभासदांचे मत अपेक्षित आहे. त्यावरून या विषयाबाबत सर्वसाधाराण सामाजिक मत काय आहे हे समजण्यास मदत होईल. माझ्या शोधप्रबंधाच्या दृष्टीने मला हे जाणून घेण्याची गरज वाटत आहे.
यांचा परस्परसंबंध काय आहे ह्याबाबत आपले कुतूहल जागृत झाले असेल.
कुतूहल या विषयाबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. झाडावरून पडणा-या सफरचंदाचे कुतूहल असल्याने न्युटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तर कोप-यात गुणगुणा-या माशीच्या उडण्याच्या कुतुहलाने रेने देकार्तने भूमितीचा चेहरामोहरा साफ बदलून टाकला.
या तऱ्हेवाईक बागवानानं हातातही जाड काळे रबरी हातमोजे घातले होते. झाडांची वाळलेली पानं किंवा वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या तो कापून टाकत होता आणि त्याचे हातमोजे जणू झाडांपासून त्याचं संरक्षण करत होते. हे गृहस्थ त्यांचं निरीक्षण करत करत मधल्या हौदाला लागून असलेल्या एका डेरेदार झाडाजवळ आले आणि बराच वेळ विचारमग्न अवस्थेत झाडाकडं बघत उभे राहिले. आणि मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं त्यांनी बंगल्याकडे बघून हाक मारली
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.