चला! आता पर्यंतच्या लेखात 'आपण नक्की किती वेगाने जात आहोत' हे कसं पाहायचं (किंबहुना कसं पाहायचं नाही!) हे पाहिलं. आता तुम्हाला आपण प्रवास करतो, जातो, हालत आहोत म्हणजे काय याचा थोडासा खुलासा मला करायचा आहे. मी जेंव्हा 'प्रवास करणं' म्हणतो याचा अर्थ वेगात बदल न करता. वेग न वाढवता, न कमी करता. आणि हो! दिशेतही बदल न करता. तुम्ही प्रवास करता म्हणजे तुम्ही त्याच दिशेत, त्याच वेगाने जात राहता. याचा अर्थ तुम्ही कुठल्याही 'ओढी' (पुल) खाली हा प्रवास करत नाही. तुम्ही म्हणाल, "याचा इतका बाऊ करण्याची गरज काय?" मी हेच तर सांगणार आहे आज.