१. व्हॉट इज रिलिजन? "वेल, रिलिजन इज डिफरंट वेज पीपल बिलीव्ह इन गॉड."
२. आय डोण्ट लाइक युनिफॉर्म्स. आय लाइक इट व्हेन एव्हरीवन वेअर्स क्लोद्स ऑफ देअर चॉइस. "दॅट्स हाउ वुई कॅन एक्स्प्रेस अवरसेल्व्हज."
३. "ही बिट्रेड."
वरील वाक्यं पहा. विषेशतः अवतरणचिन्हांतली. अमेरिकेत माझ्या मुलीच्या चौथीच्या वर्गात झालेल्या चर्चांमधील ही वाक्यं आहेत. त्यांचं मराठीत भाषांतर करता येइल का? अर्थातच येइल. पण लहान मुलांना सहज समजेल असं? कठीण जाइल नाही? माझ्या मुलीला मराठी अगदी उत्तम येतं.