मनोगती व मराठी ब्लॉगविश्व

मराठीब्लॉगविश्व या मराठी अनुदिनींच्या (सौजन्यः शैलेश खांडेकरांचा हा सविस्तर लेख.) सुनियंत्रित संकलनामुळे मराठी अनुदिनीकारांवर बारीक नजर ठेवणे सहज शक्य झाले आहे.


इथे आपले बरेच मनोगती ही अनुदिनीकार असल्याचे, होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच मनोगतालाही बरेच नवे मनोगती मिळत आहेत. तेंव्हा या संकेतस्थळाची आपल्याला माहिती व्हावी, मनोगतींच्या व इतरही रोचक मराठी अनुदिनींचा आपल्याला परिचय व्हावा यासाठी ही चर्चा.