याआधीः नाकाखालीच!(आरंभ)
मेरीने आतापर्यंत त्याची खूप चांगली सेवा केली होती आणि म्हणूनच हे सर्व बोलताना त्याला अपराध्यासारखं वाटत होतं.
मेरीच्या कानात शिरुनही शब्द डोक्यापर्यंत गेलेच नाहीत. ती सावकाश उठली आणि म्हणाली, 'ठिक आहे. मी जेवण बनवायला घेते. आपण जेऊन घेऊ.' आणि ती स्वयंपाकघरात गेली. फ्रिजमधे बर्फाच्या कप्प्यात चिकनचा मोठा तुकडा होता. तिने तो बाहेर काढला. पण जॉनला भूक कितपत होती, शंकाच होती. म्हणून ती किती चिकन बनवू ते त्याला विचारायला बाहेर आली.