दैव (भाग ४)

याआधी


सुदैवाने जवळच एका दुकानात सिगारेट मिळाली. आम्ही पुन्हा पहिल्या जागी आलो.


'तुमच्या लग्नाचं सांगत होतात तुम्ही.' मी त्याला आठवण करून दिली.


'हं. लग्नानंतर आम्ही त्याच घरात रहायला लागलो. आम्हाला तीन मुलगे झाले. माझी इच्छा होती तिघांनी शिकून मोठं व्हावं. पण तिघांना ड्राइविंगचेच खूळ होते. मोठ्या मुलाने हट्टच धरला तेव्हा आम्ही दोघांनी घर गहाण ठेवून त्याला एक टॅक्सी घेऊन दिली. तोपर्यंत मधला मुलगाही मोठा झाला आणि मग दोघं आळीपाळीने टॅक्सी चालवायला लागले. पुढे त्यांच्यात टॅक्सीवरून भांडणं व्हायची. मग दुसऱ्यानेही टॅक्सीचा हट्ट धरला. पण दुसरी टॅक्सी घेण्याइतकी माझी काही ऐपत नव्हती. त्यामुळे मी धाकट्याला नकार दिला. मग त्याने एका ट्रान्स्पोर्ट कंपनीची नोकरी धरली. मी त्याला खूप समजावलं पण त्याने एकलं नाही. तितक्यात एक दुर्घटना झाली.'

दैव (भाग ३)

याआधी


मी नकळत त्या व्यक्तीबद्दल विचार करू लागलो. नुसत्या दिव्याच्या प्रकाशावरून लांबवरूनच वाहने ओळखणारा हा माणूस नक्की आहे तरी कोण ?


'तुम्हाला सांगू तो मुलगा कोण होता?' 


'तो मुलगा तुमच्यासमोर बसलाय.' असे म्हणून त्याने त्याच्या गळ्यातला ताईत दाखविला.

दैव (भाग २)

याआधी


'खूप जुनी गोष्ट आहे.' तो एकदम भूतकाळात हरविल्यासारखा वाटला.


'पन्नास-बावन वर्षापूर्वीची गोष्ट असेल. याच मंगळूर-पणजी रस्त्यावर एका बसला भयानक अपघात झाला होता. त्यावेळी कदाचित तुमचा जन्म पण झाला नसेल.' त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, 'तुम्ही याआधी कधी या रस्त्याने प्रवास केला आहे ?'

दैव (भाग १)

कामतानाथ यांच्या कथेचा अनुवाद.


मी सुरथखल च्या रीजनल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विश्रामगृहात उतरलो होतो. एका परिचर्चेसठी इथे आलो होतो. आणि आता इथून गोव्याला जायचे होते. जर मी महाविद्यालयच अधिकाऱ्यांना सांगितले असते तर त्यांनी माझी नक्कीच सोय केली असती. कदाचित इथून गोव्यापर्यंतचे भाडे सुद्धा देऊ केले असते. पण मलाच त्यांना तसे सांगणे जीवावर आले. म्हणून मी स्वतः मंगळूर ला जाऊन बस चे आरक्षण करून आलो. रात्री ९.५० ची पणजीला जाणारी बस होती.

आणि कविता खपल्या... (१)

चिंट्या आणि मिनी दोघांचं एक मेकांवर जबर्‍या प्रेम... जबर्‍या म्हणजे जबर्‍याच... म्हणजे इतकं की चिंट्याला सर्दी झाली की मिनी शिंकणार आणि मिनीच्या पोटात गॅसेस झाले की चिंट्या एरंडेल पिणार... आता येवढं प्रेम म्हणल्यावर कविता आल्याच... दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडल्यापासून कोकाट्यांच्या फाड फाड English सारखे रोज रोज कविता पाडायचे... म्हणजे पुण्याच्या शैलेश रसवंती गृहात दिवसाला जेवढा रस गळत असेल निदान तेवढ्या तरी कविता रोज पाडल्याशिवाय त्यांना झोपच लागायची नाही. अर्थात चिंट्या आणि मिनी दोघांचाही असा पक्का समज होता की आपण जन्मत:च कवी आहोत... आपण दोघंही फार म्हणजे फार म्हणजे फारच छान कविता करतो. आणि त्या इतक्या सुंदर असतात की आपला जर कुठे वशिला असता तर अगदीच Nobel किंवा ज्ञानपीठ नाही तर गेला बाजार एखादं पुण्यभूषण पारितोषिक तरी आपल्या कवितांना मिळालंच असतं... पण हाय राम, आपला वशीला नाही!

कावळ्याचे निवेदन

     कळावे लोभ असावा, नुसते कळावे लोभ असावा नव्हे तर, कळावे लोभ असावा आणि अभिप्राय द्यावा ही विनंती. आपला नम्र, लिखाळ.


     माझे सुमार लिखाण आपल्यापैकी बरेच जण शेवटपर्यंत वाचणार नाहीत ही खात्री असल्याने शेवट आधी केला. कारण,त्यातले अभिप्रायाचे वाक्य फार महत्वाचे आहे हो ! आणि यामध्ये, विचित्र सुरुवात पाहून, लेख दमदार असेल,हळूहळू रंग चढेल वगैरे गैरसमज होऊन काही वाचक तो शेवटपर्यंत वाचतील ही,युक्ती आहे.

वांग्याचे भरीत-(खानदेशी)

वाढणी
४ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • भरताची मोठी हिरवी वांगी- १ किलो (साधारण ३ मध्यम वांगी).
  • कांद्याची पात - २ लहान जुड्या.
  • २ गड्डे लसूण सोललेला. - एक वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली.
  • ८/१० हिरव्या मिरच्या- जाड, लांब व अत्यंत कमी तिखट.
  • तेल- दोन वाट्या.
  • फोडणीसाठी मोहरी, हिंग व थोडा ओवा. - आवडीनुसार मीठ.

मार्गदर्शन

ऐतरेय महिदास(५)

      बारा वर्षे उलटली. आणि एके वर्षी राज्यात घोर दुष्काळ पडला. पाऊस पडेना. पाणी मिळेना. प्रजा अगदी हवालदिल झाली. एक वर्ष उलटले. दोन वर्षे उलटली... पावसाचे नाव नाही. चिंतित राजसभेलाही काही उपाय सापडेना. घरोघरी उपासना,यज्ञयाग झाले. जो सुचेल तो उपाय करून झाला पण पाऊस काही पडेना... तशातच एक दिवस गुप्तचरांनी वार्ता आणली.... नगराबाहेर घोर अरण्याचा प्रदेश आहे. तिथे सगळी हिरवाई आहे. पाऊस नियमित पडतो. वनस्पती तरारलेल्या आहेत. पाण्याचे झरे अखंड वाहतात. पण त्या क्षेत्राची सीमा संपली की ते झरे जमिनीत गुप्त होतात. त्या क्षेत्रात एक आश्रम आहे. तिथे एक तपस्वी तपश्चर्या अंगिकारून आहेत. महाराज जानकीर्ती हे ऐकून अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्यांनी दूताकरवी अत्यंत सन्मानाने तपस्वींना राजसभेत येण्याची प्रार्थना केली.

ऐतरेय महिदास(४)

       महिदासाचा हात धरून इतरा नवीन क्षेत्रावर आली. एक पर्णकुटी उभारण्यापासून सगळी सुरुवात करायला हवी होती, महिदासाचा इवला हात आता तिची शक्ती झाला. लवकरच ती जमीन तिने लागवडीखाली आणली. झाडं तिच्या हातच्या घागरभर पाण्यासाठी आसुसलेली असत. हात अक्षरशः हिरवा होता. बी नुसतं फेकलं तरी रुजून येत होतं. तिची शेते विलक्षण यशस्वी होत होती. दरवर्षी गाड्या भरभरून धान्य आणि इतर वस्तू ती आश्रमात पाठवत असे. पण त्या गाड्यांमधुन एक साधा खुशालीचा निरोप किंवा साधी शौकशीसुद्धा परत यायची नाही. महिदास बिचारा हिरमुसला होऊन जायचा. पण इतरा त्याची समजूत घालायची. आचार्यांबद्दल कुठलीच वाईट भावना नाही येऊ दिली तिने महिदासाच्या मनात. ती म्हणायची, त्यांनी बेघर केले नाही. हक्काचे छप्पर माथ्यावर तर दिलेय ना! आणि ही धरती आई आहे तुझी माझी. ती कधी दूर लोटणार नाही आपल्याला.....

ऐतरेय महिदास(३)

    तशातच एक दिवस तीर्थयात्रेला निघालेला एक ब्राह्मण त्याच्या कन्येसह अतिथी म्हणून आश्रमात आला. अतिथीचे सगळे यथासांगच झाले पाहिजे असा आचार्यांचा कडक नियम होता. हिमालयाकडे प्रस्थान ठेवलेल्या अतिथीची जीवनयात्रा इतरेच्या ओटीवर अचानक समाप्त झाली. जात्या जिवाने आपली कन्या आणि आपली संपत्ती ओटीत घेण्याची केलेली विनंती आचार्य कसे धुडकावणार? सोन्यालंकारांनी मढलेली द्वितीया इतरेला सवत म्हणून घरात आली. त्याच सुमारास महाराजांनी मोठ्या सन्मानाने युवराज जानकीर्तीला आचार्यांच्या आश्रमात पाठवले. त्याबरोबर मिळालेली संपत्ती आणि मान हा आचार्यांना द्वितीयेचाच पायगुण वाटला. आचार्यांना तिच्याविषयी वाटणारे ममत्त्व अधिकच वाढले. इतरेचा कामकाजाचा भार मात्र वाढला....