मला माहीत असलेल्या बहुतेक सगळ्या भावना माझ्या मनात भरून राहिल्या आहेत... डोळ्यात येऊ पाहणारं पाणी नक्की सुखाचं आहे का वेदनेचं? चेहऱ्यावर उमटलेली स्मितरेषा नक्की कुठून आली आणि कशी? या विचारांनी माझं डोकं फुटेल का काय अस वाटत आहे, माझं हृदय आता कोणत्याही क्षणी बंद पडेल...
आज ती खूप आनंदी आहे... आणि मी?
माझ्याबद्दल मलाच खात्री नाही, मी खरंच सुखी आणि समाधानी आहे, का तसं वाटून घेण्याची सवय लागली आहे, माहीत नाही.