हा प्रसंग माझ्यावरच बेतलेला आहे.
सप्टेंबर महिन्याची अखेर होती.
रात्रीचा साधारण पाऊणे आठचा सुमार!
स्थळ: पुण्यातला गर्दीचा समजला जाणारा रस्ता, जंगली महाराज रस्ता.
मी आणि माझे भावी पती (मागच्याच महिन्यात आमचा साखरपुडा पार पडला होता, डिसेंबर मध्ये लग्नाची तारीख होती) दुचाकी वाहनावरून शिवाजीनगर रेल्वेस्थानकाकडे चाललो होतो. मी रोज नोकरीच्या निमित्ताने आकुर्डी - पुणे प्रवास लोकलने करत असे. त्या दिवशीही ते नेहमीप्रमाणे मला सोडायला येत होते.