वन फॉर द.........

ह्या कथेतील सर्व प्रसंग, पात्रे व स्थळे पूर्णता काल्पनिक आहेत.



विवेक हा एक अतिशय गरीब घरचा मुलगा होता.अगदी लहानपणीच वडिलांचे पितृछत्र हरवले. वडिलांच्या पश्चात घरोघरी जाऊन स्वयंपाक करणाऱ्या आपल्या स्वाभिमानी आईला संसार चालवण्यास मदत व्हावी म्हणून विवेक लहानपणीच घरोघरी देवपूजेची कामें करायला लागला. सकाळी ७ च्या सुमारास जिवाची कामे आटपून तो ३/४ घरी जाऊन देवपूजा करायचा. वेळ वाया जाऊ नये म्हणून मधल्या वेळेत अभ्यास करी. हे करीत असतानाच हळू हळू त्याचे शालेय शिक्षण सुरू होते. स्वत:च्या शाळेची फी, वह्या पुस्तकांचा व गणवेशाचा वगैरे खर्च ह्यातून भागायचा व आईला संसाराचा गाडा हाकायला तेव्हढीच मदत व्हायची. त्याच्या ह्या प्रयत्नांचे सर्वांनाच कौतुक वाटायचे.

साबुदाणा वडा

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • साबुदाणा १ वाटी
  • बटाटा १, अर्धे छोटे लिंबू
  • हिरव्या तिखट मिरच्या ५-६
  • कोथिंबीर
  • दाण्याचे कूट ४-५ चमचे
  • तेल, मीठ, साखर

मार्गदर्शन

१ वाटी साबुदाणा ४ तास भिजत घालावा. भिजवताना पाणी निथळून घ्यावे. नंतर तो साबुदाणा हाताने मोकळा करुन त्यात३-४ चमचे दाण्याचे कूट, मिरच्या वाटून, व कच्चा बटाटा साल न काढता किसुन घालणे. नंतर चविप्रमाणे मीठ, साखर  व लिंबू पिळणे. कोथिंबीर चिरुन घालणे. हे सर्व मिश्रण हाताने कालवणे.

कोशिंबीर

वाढणी
ज्या प्रमाणात खाल त्याप्रमाणात

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • गुलबक्षी रंगाचा कोबी, लेट्यूस
  • दही, मीठ, साखर

मार्गदर्शन

गुलबक्षी रंगाचा कोबी किसून घेणे. लेट्युस खूप बारीक चिरणे. यात दही मिसळणे. चविप्रमाणे मीठ व साखर घालून ढवळणे. कोबीचा गुलबक्षी रंग, लेट्युसचा हिरवा रंग आणि दह्याचा पांढरा रंग अशी ही रंगीबेरंगी दिसणारी कोशिंबीर चवीला चांगली लागते आणि करायलाही सोपी.

रोहिणी

टीपा
नाहीत.

माहितीचा स्रोत
स्वानुभव

समस्यापूर्ती (५)

आज इंद्रवज्रा हे वृत्त बघू.

उदा.-
दुःखी जगा देखुनिया द्रवे ते
सच्चित्त माते नवनीत वाटे
अन्याय कोठे दिसता परी ते
त्या इंद्रवज्रासहि लाजवीते






टीप- 
याची चाल थोडीफार भुजंगप्रयातच्या जवळची आहे...
जगी सर्वसुखी असा कोण आहे...

वर्षा सहल

मागील महिन्यात मनोगती शिवाजी पार्क वरील कट्ट्यावर भेटले होते  तेंव्हा वर्षा सहल काढायची असें "मनोगत" बऱ्यांच जणांनी व्यक्त केले होते.


श्री. सर्वसाक्षी, श्री. प्रभाकर पेठकर, डॉ. मिलिंद फणसे व डॉ. दंतकर्मी ह्या जेष्ठ तसेच निलहंस व मयुरेश वैद्य ह्या उत्साही  मनोगतींशी संपर्क साधून वर्षा सहलीचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.    श्री. अगस्ती व नवीन सदस्य श्री तात्या अभ्यंकरांचेही मत आजमवण्यात आले ! सर्वानुमते एक दिवसाची (रविवार २४/०७/०५) आसपासच कुठेतरी सहल काढणे सोयीस्कर होईल.

या शब्दाचा अर्थ काय?

मराठीतल्या न समजणाऱ्या शब्दांचा अर्थ विचारण्यासाठी हा धागा वापरावा.



  • अडलेला शब्द विचारताना शक्य झाल्यास शब्दाचा संदर्भ द्यावा.

  • उत्तर देतानाही शक्यतो वाक्यात उपयोग करून द्यावा.

  • उत्तराचा संदर्भ देता आल्यास उत्

इंग्रज नसते तर...

आपल्या माननीय पंतप्रधानांचे लांगूलचालन बऱ्याच चर्चांना, विचारांना चालना देऊन गेले. माझेही मत.


इंग्रजांमुळे हे फायदे झाले ते फायदे झाले हे म्हणणे माझ्यामते अयोग्य आहे. इंग्रज हे तात्कालिक कारण होते.


सगळ्याच देशांमधे पूर्वी राजेशाही होती. त्यांना लोकशाही पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा विकास साधण्यासाठी गुलामगिरीत राहावे लागले नाही. क्रांती ही अटळ असते आणि तिला कुणीच रोखू शकत नाही. आणि ती वाऱ्यासारखी पसरते तिला छोट्या छोट्या प्रांतांच्या सीमा नक्कीच अडवू शकत नाहीत. त्यामुळे भारताच्या एकसंधतेचे (??) पण श्रेय इंग्रजांना देण्याचे कारण नाही.

मेतकूट

वाढणी
कसे व किती खाल त्यावर अवलंबून

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • हरभरा डाळ ४ वाट्या
  • मूग डाळ १ वाटी
  • उडीद डाळ दीड वाटी
  • मसूर डाळ अर्धी वाटी
  • जिरे व धणे प्रत्येकी २ चमचे (चहाचा चमचा)
  • मेथी १ चमचा
  • लाल तिखट ६ चमचे (आवडीनुसार प्रमाण कमी-जास्त करावे)
  • लवंगा व काळी मिरी २०-२५ प्रत्येकी
  • दालचिनी ८ ते १० तुकडे
  • हिंगाचा खडा
  • हळकुंड २ तुकडे (किंव हळद)
  • मीठ चवीपुरते

मार्गदर्शन

भरंवशाची म्हैस

(टीप : ह्या गोष्टीतील सर्व पात्रे, प्रसंग, ठिकाणे, वस्तू, विचार, तत्त्वज्ञान इत्यादी सर्वकाही पूर्णपणे काल्पनिक आहे. कशाचेही कशाशीही काहीही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा, ही विनंती.)


अमेरिकेत आनूज कडे म्हैस नाही हे पाहून मला त्या दिवशी धक्काच बसला.