चला शब्द चघळूया

चला शब्द चघळू यात


काही शब्द कुठून, कसे आणि केव्हा आले? काही शब्द पूर्वी कसे होते? तेच शब्द आज असे का आहेत? शब्द कसे बदलतात? का  बदलतात? इत्यादी सवाल, बाबी चघळण्यासाठी ही चर्चा.


मी सुरवात पसायदानाने करतो. प्रसाद हा शब्द यादवकालात बदलून पसाय झाला.  अशाचप्रकारे, पैज हा शब्द प्रतिज्ञापासून बनला आणि वेदनापासून वेणा. वेणा वेदनापेक्षा कानाला खूपच सुसह्य आहे आणि पसायदानातला गोडवा प्रसाददानात नाही.

परमेश्वर साहेबांचा दिवस

परमेश्वर साहेबांची कचेरी या लेखावरुन प्रेरणा घेऊन एका रसिक व उत्साही मनोगतीने लिहीलेला हा  दुसरा भाग. खरं म्हटलं तर यातल्या बऱ्याच गोष्टी भाग १ मधेच लिहायला मला जास्त आवडल्या असत्या, पण 'फेरफार करा' ची परवानगी नाही व लेख मोठा होऊन डोळ्यांना व संगणकाच्या सरककळीला (स्क्रॉलबार बरं का!) कष्ट होऊ नयेत म्हणून हा लेखप्रपंच!!  

कच्ची मातृभाषा

नुकतेच माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शालान्त परीक्षांच्या निकालांच्या बातम्या वाचताना ही बातमी महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाली. मराठीच्या अभ्यासक्रमाकडे शासनाचे लक्ष आहे हे पाहून बरे वाटले. मूळ बातमी वाचून येथे चर्चा करता यावी ह्या हेतूने ती बातमी येथे उतरवून ठेवली आहे.

पुण्याची 'खाद्य' श्रद्धास्थानं!

पुणेकर होण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगणं आवश्यक आहे - पु. ल. देशपांडे


पुलंच्या या उक्तीला अनुसरून मला लहानपणापासूनच पुण्याच्या 'खाद्य' श्रद्धास्थानांविषयी कमालीचा, शाश्वत, निरंकुश, अफाट इ इ थोडक्यात जाज्वल्य अभिमान वाटत आला आहे. थांबा. ही टायपिंग मिष्टेक नाही! मला आद्य श्रद्धास्थानं म्हणायचं नसून खाद्य श्रद्धास्थानंच म्हणायचं आहे. आणि खाद्य श्रद्धास्थानं हीच पुण्याची आद्य श्रद्धास्थानं आहेत असा माझा दावाही आहे. कारण वडा, भजी, मिसळ भेळी पासून ते पंजाबी, चायनीज, काँटिनेंटल, थाई पर्यंत अनंत प्रकारची खाद्यं अनंत ठिकाणी जाऊन मटकावणाऱ्या पुणेकरांची आद्य श्रद्धास्थानं ही केवळ खाद्यच असू शकतात!

मदत हवी आहे. फोटो कसे अपलोड करावे

इथे फोटो कसे अपलोड करता येतात हे मला सविस्तर पणे कोणी सांगू शकेल का ?

रोजनिशी -नवा दिवस

नवा दिवस

          लिहून पूर्ण झाल्यावर त्याने रोजनिशीचे ते पान फाडले आणि शांतपणे जाळून टाकले. आज तरी नियम पाळता आला आहे. कोणतेही कार्य करायला सातत्य दे. तीच वर्दळ, तोच रस्ता, त्याच वाटा. त्याच माणसांच्या रांगा, तोच गर्दीतला अबोल क्षण. ऑफिसातली कामे, सहकाऱ्यांच्या गप्पा. सगळे नेहमीसारखे.  भुकेने कसावीस झाल्यावर पुढे आले ते खाल्लेले चार घास. नेहमीप्रमाणे त्याच वळणावर रोज त्याचा प्रवास. त्याच्या आणि लोकांच्या स्वतःची फुशारकी आणि मोठेपणा सांगणाऱ्या गप्पा. सारे या 'मी', 'माझे' या भोवती फिरणारे. या तर वृथा कल्पना. बालकवींच्या ओळी चटकन आठवल्या. कागदावर तो ती कविता लिहू लागला.

अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,
माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत.
कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी!
म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा?
विशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार,
उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी?
फार कशाला दिग्वनिंताची तरी कुणी सांगावी?
अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
तव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,
जातिल का गगनास भेदूनि? अनंत का होतील?
तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील!
ज्ञान तुझे तू म्हणशी 'जाइल', कोठवरी जाईल?
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून.

                 आयुष्यात जगण्यासारखे असते तरी काय?जगायचे कुणासाठी? कशासाठी?स्वतःसाठी?लोकांसाठी? नावासाठी? सुखे मिरवायला का दुःखाची नशा कुरवाळायला?प्रश्न -- असेच अनुत्तरित. त्याने मनोभावे परमेश्वराला प्रार्थना केली. जीवनात दुःखेच जास्त आहेत का माझा चष्माच तसा आहे? जीवघेण्या स्पर्धा आहेत, मागे राहू? पळून जाऊ? आई बाबा घरी आहेत. शेती आहे. शेजारच्या बर्वे काकांनी अनघासाठी तीन चार वेळा  विचारून पाहिले आहे. रत्नागिरीची मुलगी... तिला इथे आवडले नाही तर पुन्हा परत सुद्धा जावे लागेल. नाही. ते शक्य नाही. आता इथेच राहीन. धडपड करेन.  सुख दुःखाचा आलेख किती सजीव होतो आहे. दिवसभर जे वाचले, त्याचा आढावा घ्यायला त्याने सुरुवात केली.

रोजनिशीची सुरुवात

सुरुवात

                 लिहून पूर्ण झाल्यावर त्याने रोजनिशीचे ते पान फाडले आणि लायटरने शांतपणे जाळून टाकले. खूप दिवसांचे मनात होते. रोजनिशी लिहायला हवी. प्रत्येक वेळी एक नवा बहाणा करून त्याने रोजनिशीला टाळले होते.  आज मनातले द्वंद्व संपवून त्याने सुरुवात तरी केली होती. 
               तयार होऊन अमृततूल्य मध्ये चहा घ्यावा आणि दिवसाचा श्रीगणेशा करावा.  मळक्या कपड्यातील पोऱ्याने ग्लासभर पाणी आणून दिले. गरम वाफाळणारे द्र्व्य चहा म्हणून त्याने घशाखाली ओतले. हातातल्या वर्तमानपत्राकडे तो नजर टाकू लागला. चार चित्र दिसताच पोऱ्याने मान वळवून त्यात डोके घालायला सुरुवात केली. शाळा सोडली, इथे काम करतो हे पोऱ्याचे उत्तर ऐकले. त्याने एक सुस्कारा सोडला. बिलातले सुटे पैसे तिथेच ठेवले.  कंपनीची बस येते त्या बसस्टॉपकडे जायला सुरुवात केली.
                  हा दिवस काही वेगळा होता असे नाही. फक्त रोजनिशीच्या पानावर येण्याचे भाग्य त्याला मिळाले होते. मित्रांच्या गप्पा, नेहमीच्या मिटिंग्स सगळे वेळापत्रकात असल्याप्रमाणे. तेच लांबलचक कोडींग,कंटाळवाणे टेस्टिंग आणि चुकांचा छडा लावणे. सारे सुरळीतपणे सुरु होते. दहादा त्याने याहू, हॉटमेल , जीमेल सगळीकडे टिचक्या मारल्या होत्या. सकाळ, म.टा, न्यूयॉर्क टाईम्स,लोकसत्ता... झाडून सगळे इंग्लिश व मराठी पेपर पालथे घातले होते. सगळ्या मराठी साईट्स नजरेखालून घातल्या होत्या. हळुहळू सात वाजत आले .बरेचसे स‌ंसारी सह्कारी घरी जाऊ लागले होते. काय करायचे? नेट सर्फ करायचे, नाटक सिनेमाला जायचे, पुस्तके वाचत बसायचे की एखाद्या हॉटेलात मित्रांच्या टोळक्यात बसून चेष्टामस्करी करायची?आयुष्यात काही नवीन घडत नव्हत आणि एवढ्यात काही बदलण्याची चिन्हे देखील नव्हती. रत्नागिरीला परत जावे असे कितीदा मनात येते. पण त्यात काही साध्य होणार नाही या
अशाच विचारात एक बा.भ. बोरकरांची कविता झरझर रोजनिशीच्या पानावर लिहू लागला.

खूप या वाड्यास दारेः एक याया कैक जाया,
दो घडी येतात तेही लावुनी जातात माया
पाखरांची मुक्त मांदी गात ये आल्हाद-नांदी,
अंगणी तालात डोले एक न्हाती शुभ्र फांदी;
गोठणीसाठी गुरांची सावलीशी गर्द दाटीः
कोण मायेने कुणाशी पाठ घाशी, अंग चाटी;
पंढरीचा पांथ दारी गोड छेडी एकतारी
साधते त्याच्या अभंगे बैसल्या ठायीच वारी;
कावळा सांगून जातो पाहुणा येणार आहे,
त्यामुळे घासात माझ्या अमृताची धार वाहे;
आणखी रात्री ,पहाटे चांदणे शेजेस येते
अन फुली वेढून माते स्वप्निच्या राज्यात नेते;
आप्त सारे भेटती जे इथे वस्तीस गेले
सांगतो मी त्यास किस्से पाहिलेले, ऐकिलेले
मी खरा तेथील वासीः हा न वाडा, ही सराई
पाहुणा येथे जरी मी जायची माते न घाई.

                  मित्रांना काम आहे असे सांगून आज त्याने गर्दीतला मूक प्रेक्षक व्हायचे ठरवले. शिवाजीनगर पासून तो चालू लागला. प्रदूषण, गर्दी, विस्कळीत वाहतुक. सगळे नेहमीचेच. मॉडर्न कॅफे, पांचाली, बालगंधर्व, असे करत जंगलीमहाराज रोडपासून तो चितळ्यांच्या दुकानासमोर डेक्कन पर्यंत चालून गेला. मनात दिवसभरांच्या घटना उलगडत होत्या आणि डोळे गर्दीत जाता येतानाचे अनुभव साठवत होते. जोडीने फिरणारी मुले मुली, त्यांचे ग्रुप्स,त्यांच्या गप्पा, चिडवाचिडवी, मनधरणी तो साक्षीदार होऊन ऐकत होता. सेलफोनवर येणारे एस.एम.एस, मेलमध्ये येणारे चुटके,निनावी कविता, चित्रे आणि आजुबाजुचा कोलाहल....त्याच्या डोक्यात एक तिडीक उठली. "काही बदल नाही, सगळे तसेच आहे माझ्या आयुष्यात." आणि स्वतःवरच्या रागाने मनात विचारांचा ज्वालामुखी भडकला होता. त्या नादात एक सुंदरी शेजारून गेली तिचे ओझरते दर्शन त्याला मिळाले होते. 'वैशालीत' नेहमीच्या जागेवर बसून त्याने जेवण संपवले. किती हॉटेलस, तीच चव, तीच इडली, तोच डोसा आणि चटणी, आणि तशीच जेवणाची थाळी. खाऊन वीट आला होता तरी दुसरा मार्ग नव्हता. लिहीता लिहीता थांबून त्याने मोठा पॉज घेतला. आता आणखी काय राहीले आहे?दिवसभरात वाचलेल्यापैकी जे आठवत होते ते त्याने खरडायला सुरुवात केली.

बर्लिनकडे आगेकूच

बर्लिनचे वेध (भाग १) या लेखाचा पुढचा भाग लिहायचा गेले काही दिवस विचार करत होतो. शेवटी वेळ मिळाला आणि पुढचा भाग लिहायला सुरुवात केली. यावेळेस लिहिलेल्या भागात माझ्या बर्लिन प्रवासातील मधल्या टप्प्यांचे वर्णन करत आहे ..