वेगळा जिरेभात

वाढणी
एकाला एकदा किंवा दोनदा

पाककृतीला लागणारा वेळ
१५ मिनिटे

जिन्नस

  • तांदूळ (कुकरचे १/२ भांडे)
  • मिरच्या २
  • दाण्याचे कूट २ चमचे
  • कोथिंबीर सजावटीपुरती
  • उकडलेले बटाटे २ लहान
  • तेल किंवा तूप १ मोठा चमचा (आवड आणि उपलब्धता यावर अवलंबून)

मार्गदर्शन

हि पाककृती नविन नाही. जिरा राईस आणि उपासाची बटाट्याची भाजी यांना जोडून बनवलेला प्रकार आहे

भारतभेटीचा भार

(टीप : ह्या गोष्टीतील सर्व पात्रे, प्रसंग, ठिकाणे, वस्तू, विचार, तत्त्वज्ञान इत्यादी सर्वकाही पूर्णपणे काल्पनिक आहे. कशाचेही कशाशीही काहीही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा, ही विनंती.)


परवा मॉलमध्ये गेलो होतो तेंव्हा समोरून आनूज येताना दिसला. त्याच्या हातात दोन बासमती तांदुळाच्या पिशव्या होत्या. मला दोन दिवसापूर्वीच त्याने दोन पिशव्या बासमती घेतल्याचे म्हणाला होता, म्हणून मला आश्चर्य वाटले.

माझे अमेरीकेतील शेजारी

माझे अमेरीकेतील शेजारी
"कसे आहात? सगळी खुशाली आहे ना? "असे म्हणून मुलाशी बास्केटबॉल खेळत असतांना विल्यम आमच्याशी हस्तांदोलन करतो. उंचपुरा, धिप्पाड, हसतमुख विल्यम, त्याची हसरी आणि कधीही पाहिले तरी टवटवीत दिसणारी पत्नी स्टेसी व त्यांची बागडणारी ३ मुले , हे आहेत आमचे जवळचे शेजारी.

आहारशास्त्र

सर्व मनोगतींनू,


नुकतीच आहारशास्त्रावरील काही पुस्तके वाचली, काही लेख वाचनात आले... माझ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये काम करताना, "Prevention is better than cure" हे माझे ब्रीदवाक्य असते. परंतु ही पुस्तके, हे लेख वाचल्यावर असे लक्षात आले की "आहार" या अतिशय महत्वाच्या बाबतीतच आपण अतिशय निष्काळजीपणा करत आहोत. सर्वसाधारणपणे आपला, जोपर्यंत आजार होत नाही तोपर्यंत विषेश काळजी न करण्याकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याकडे कल असतो. तसेच आजार झाला की आपण "औषधे" घेतो.

मी मराठी !

मी मराठी !


आपल्या सगळ्यांचा अनेक अमराठी भाषिक लोकांशी संबध येतो. त्यातले कितीतरी आपले जीवाभावाचे मित्र बनतात. आयुष्यात आपल्या अनेक सुखात आणि दु:खात सहभागी होतात. पण हे सगळे अमराठी भाषिक, मराठी समाज किंवा मराठी माणुस याबद्दल काय विचार करतात हे जाणून घेण्याची फ़ार दिवसापासून इच्छा होती. आज माझ्या एका मित्राने यासंबधी एक लेख पाठवला.  हा लेख खरोखरच मराठी माणसाला विचार करायला भाग पाडतो. तुम्हीही जरूर वाचा.

दाक्षिणात्य आणि आंग्लभाषा

'हिंदी' ही भारताची राष्ट्रभाषा(कागदोपत्री फक्त!), पण तामिळ,कन्नडा,तेलुगू,मल्याळम ही नकाशाच्या दक्षिण भागातील मंडळी मात्र 'हिंदी' बोलणे आणि 'हिंदी बोलता येणे' हा अक्षम्य अपराध का समजतात हो? १४ प्रांतीय भाषा असलेल्या भारतात सामाईक भाषा म्हणून हिंदी वापरली जावी,पण प्रत्यक्ष आज स्थिती काय आहे? कामात आंग्ल भाषा अपरिहार्य, पण बाहेर भेटल्यावर, अनौपचारीक मेळाव्यातही दाक्षिणात्य मंडळी फक्त आंग्ल भाषा बोलतात. आणि 'मला हिंदी येतच नाही. आंग्ल आणि माझी भाषाच येते फक्त' हे सांगताना त्याना 'देशाची राष्ट्रभाषा येत नाही' याची शरम नसून 'आम्ही आंग्ल भाषा उशापायथ्याशी ठेवून असतो सारखे' याचा अभिमान असतो. याची पराकाष्ठा म्हणजे नवरा बायकोशी आणि मुलांशी चार चौघात आंग्ल भाषेत बोलतो.दाक्षिणात्यांनी आपल्या(यंडूगुंडू)मातृभाषेचा अभिमान जरुर ठेवावा, पण त्यामुळे एका परदेशी माणसाच्या डोळ्यासमोर 'इंग्रज गेले तरी अजूनही आंग्लभाषा भारताची राष्ट्रभाषा आहे आणि इंग्रजाचा पगडा भारतावर आहे' हे चित्र उभे करुन देऊ नये.

आमचाच एक तामिळ बंधू(???'दुर्बंधू' असा एखादा मराठी शब्द तयार करावा का?) बाहेर मित्रांच्या घोळक्यात पण शब्दमात्रही हिंदी का बोलत(आणि ऐकून घेत) नाही, यावर कालच २ हिंदी आणि एका मराठी माणसाची चर्चा ऐकली. आणि त्यातल्या मराठी माणसाचे म्हणणे असे होते कि 'दाक्षिणात्य हिंदीला राष्ट्रभाषाच समजत नाहीत. जवळजवळ हिंदी भाषिक आहेत तितकेच जगात तामिळ भाषिक आहेत. सिंगापूर, थायलंड, श्रीलंका, इंडोनेशिया सगळीकडे तामिळ लोक आहेत. त्यामुळे ते हिंदीला आवश्यक भाषा मानत नाहीत.' (वा!मराठी माणसाच्या पडखाऊपणाचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.तामिळ देशबंधू सगळीकडे फक्त साहेबाची भाषाच बोलतो आणि इतरांनी त्याच्याशी फक्त साहेबाच्याच भाषेत बोलावे ही अपेक्षा करतो, आणि त्याला पदराखाली घेणारा 'सहिष्णू' आणि 'समजूतदार' माणूस हा नेमका माझाच मातृभाषाबंधू मराठी माणूस. हा हंत हंत!!)

कवितांच्या रंगीत आठवणी

लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा.


वेदश्रीने प्रतिसादामधे लिहिलेली 'केळीच्या बागा मामाच्या' वाचली आणि बालपणीच्या रम्य आठवणींमधे मन कधी जाऊन पोहोचलं कळलंही नाही. सोनालीसारखं 'दाटल्याहेत आठवणी' असं झालं. हो, कारण दारकानाथांनी लिहिल्याप्रमाणे 'क्यूं की बचपन कभी रिटायर नही होता'!!!

अशोक, चबुतरा आणि पाणिनी

मी शाळेत असताना १०० गुणांचं संस्कृत घेतलं होतं. घेतलं होतं म्हणण्यापेक्षा घ्यावं लागलं होतं असं म्हणायला हवं. कारण 'अ' तुकडीतल्यांनी पूर्ण संस्कृत, 'ब' आणि 'क' तुकडीतल्यांनी अर्ध हिन्दी अर्ध संस्कृत तर 'ड', 'ई', 'फ' वाल्यांनी पूर्ण हिन्दी घ्यायचं असा शाळेचा नियम होता. अर्थात संस्कृत शिकायला माझी ना नव्हती, मला संस्कृत आवडायचं, अजूनही आवडतं. १० वी नंतरही ११ वी-१२ वी मधेही मी संस्कृत घेतलं होतं. विज्ञानशाखेच्या विद्द्यार्थ्यांनाही एक भाषा विषय घेणं अनिवार्य होतं. मी संस्कृत निवडलं.