शेलापागोटे

महाविद्यालयात असताना नाटके, नृत्य, गीते, मिमीक्री शो,पारितोषिके यांची रेलचेल असणारे स्नेहसंमेलन हे सर्व विद्यार्थ्यांचे वार्षिक आकर्षण असते , होय कि नाही ? त्यातल्या त्यात शेलापागोटे हाही एक महत्त्वाचा भाग असतो. आपण सर्वांनी तो महाविद्यालयीन जीवनात अनुभवला असणार याबद्दल माझी खात्री आहे. तेव्हा असेच काही तुम्हाला माहिती असलेले विनोदी, मजेशीर, विरंगुळा देणारे शेलापागोटे लिहुयात का इथे ? पण त्यात कुणाच्याही (म्हणजे मनोगतींच्या, अन्य कुणाचा चालेल... अर्थात नट, नटी वगैरे वगैरे) नावाचा उल्लेख नसावा. सर्व मनोगती यात सक्रीय भाग घेतील अशी मला खात्री आहे. जे घेणार नाहीत त्यांच्यासाठी हा पहिला शेलापागोटा ...
'ओंडक्यावर ओंडके, शंभर ओंडके,
जे शेलापागोटे लिहिणार/सांगणार नाहीत, ते दादा कोंडके'  


पुढील शेलापगोट्यांची वाट पाहणारी आपली,
श्रावणी