हवी आहेत:मनोगतींकडून भूते

जाहीरात:
एका भूतकथाप्रेमी वाचकाला मनोगतींकडून हवी आहेत घाबरवणारी भूतकथांतील अथवा लोककथातील अथवा अनुभवातील भूते.
पात्रता: उलटे पाय, ३६० अंश फिरणारी मान, लाल/पांढरे/अतीफिकट हिरवे डोळे आणि गडगडाटी हास्य.(इतर पात्रता चांगल्या असल्यास यापैकी काही/सर्व बाबींत सवलत देण्यात येईल.)
संपर्क: अनु, ८८७, 'मनोगत'.

चिरंजीव चर्चा

मनोगतींनो,
भास्कर केंडेंची कविता आवडलि. पण मनात एक प्रश्न आला कि आपल्याला चिरंजीव लोकांबद्दल काहि माहित आहे का? अगदि मनापासुन सांगायच तर जे काहि माहित आहे ते खुप त्रोटक. मला वाटत इथे चर्चा करुन आपण हे ज्ञान नक्किच वाढवु शकतो. जर वाढले ते त्याचे श्रेय पुर्णपणे भास्कर केंडेना. तर व्हा सुरु. थोडे इतिहासात डोकवु अन आपले ज्ञान वाढवु.

सुनामी : ईश्वराचा कोप

सुनामीचे तांडव आपण सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या स्वरुपात पाहिले वा वाचले असेलच. मलाही ते बघून खूप वाईट वाटले. मी माझ्या परीने मदत करीनच. पण एक बातमी वाचण्यात आली की काही शंकराचार्यांचे भक्त असा दावा करत आहेत की जयललिताच्या सरकारने शंकराचार्याला अटक केली म्हणून देव रागावला आणि त्याने हा संहार घडवून आणला. असला माथेफिरु डोक्याचा देव असेल तर त्याला देव कशाला म्हणायचे? राक्षसच तो. नाहीतर त्या घटनेशी दुरान्वयाने संबंध नसणारे लाखो लोक का मेले? मेलेल्या निष्पाप बालकांचे काय? त्यांची काय चूक?