टिचकीसरशी शब्दकोडे ४२

टिचकीसरशी शब्दकोडे ४२

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
उगारत जन्मणाऱ्याभोवती खालची बाजू वर आण. (४)
१२ दुग्धव्यावसायिका गर्वभावना झाल्यानंतर दिशा बदलायला लावते. (४)
२१ डोक्यातला किडा आरोपांच्या भडिमारात सापडतो तेथे परमेश्वराचे अधिष्ठान असते. (३)
२४ आपले खीर करण्यामध्ये अनुभवास आलेले असे लिहिले जावे. (२)
३१ उंचीने जास्त असणाऱ्या ठिकाणी केलेली कृती ही केवळ दृश्यमानच. (५)
४२ पवार गोंधळले नाहीत तर  अनुज्ञा मिळेल. (४)
चैतन्यहीनतेतली अस्वच्छता गेल्यावर उरणारा ताठा. (२)
ह्याला हाक मारणे म्हणजे जवळजवळ कृतीत आण म्हणणे! (५)
पातळ लेप देण्यामध्ये उकळत्या तेलात बुडवून काढले. (३)
याहून अधिक शपथेनंतर केलेली किंचित हास्याभिव्यक्ती. (३)
११ गाण्यांच्या चाली  काम नसलेल्या काळात राजा स्पष्ट करील. (४)
२२ छाती असेल तर शिल्लक राहा. (२)
३४ थंड हवेत कुणी गायला सांगणार नसेल तेव्हा ह्याची खीर बनवू! (२)