रोज सकाळी मी न चुकता फिरावयास जातो. का, माहित आहे? हां! स्वतःच्या आरोग्यासाठी, हे तर खरेच! पण त्या ही पेक्षा, किमान २५ जणांना तरी "आजचा दिवस सुखाचा जावो" हे वाक्य ऐकवण्यासाठी!
खरंच त्या सर्वांना दिवस सुखाचा जात असेल? असेल ही कदाचित! पण असे त्यांना ऐकवल्याने माझा दिवस तरी सुखात जातो! कदाचित असे ही असेल की मी ज्यांना ज्यांना हे वाक्य ऐकवतो त्यापैकी अनेक जण " तुम्हाला देखील" असे प्रत्युत्तर देतात. त्या मुळे तर तसे घडत नसेल?