कथा 'सचिन' ची...

कथा. निश्चित अशी सुरुवात, निश्चित असा अंत. कथाकाराची कल्पना, कधी मर्यादित तर कधी अमर्यादित. कधी सत्यकथा. शेवटी कथा ही कथाच. जसा कथेचा(क्षणिक अंत) तसा कथाकाराचाही अंत ठरलेला. कथाकार काळाच्या गर्तेत खोलवर हरवतो पण कथा मात्र अजरामर होते. कुणा एका त्या 'निर्मिकाच्या' असंख्य कथांमध्ये, असंख्य कलाकार काम करतात आणि त्याला 'जीवन' असं नाव देतात. त्या निर्मिकाने लिहिलेल्या असंख्य कथांमधलीच ही एक, कथा 'सचिन' ची.

मैत्रीण ५ (शेवटचा भाग)

तीही रात्र अशीच गेली. मात्र दुसऱ्या दिवशी मैथिलिने सकाळी सकाळीच त्रास देणे सुरू केले. जशी मांजर बिछान्यात घेउन घुसघुस करते तशी तिही घुसली आणि माझी झोप उडवली.

"लौकर ब्रश कर, आज मी तुला उटणं लावून तुला गोरगोरं करणार आहे" तीची ऑर्डर सुटली. पुढचा तास दिड तास तिच्या मस्तीतच गेला. पण मी तयार झालो तेंव्हा मला चांगलीच भुक लागली होती. किचनमध्ये बघितल तर काय....

आज वसुबारस. दरवर्षी वसुबारसला आई पांढऱ्या ज्वारीची भाकरी आणि वांगे-बटाट्याची रस्स्याची भाजी बनवते. माझ्या तोंडाला पाणी सुटलं. व्वा ! मी लगेच पानं घ्यायला सुरुवात केली. आई मला जेवायला वाढणार इतक्यात बाहेरून मैथिली ओरडतच आली.

मैत्रीण - ४

" बाकी काही म्हणा, विजू आल्यापासून काकु फ्रेश दिसत आहे, नाही का माधुरी ? " नंदुभाऊंनी म्हटले.

" मग काय ? एकुलता एक लेक आहे तो. तसही श्रुती गेल्यापासून काकुंना करमत नव्हतं" वहीनी म्हणाल्या.

" खर आहे ग तुज. लळा लावला पोरिनं ८ दिवसात. फारच गोड पोरगी आहे" आई एकदम तिच्या आठवणींनी भावुक झाली होती.

"पण ही श्रुती आहे तरी कोण ? " माझ्या तोंडून अचानक निघून गेलं.

"घ्या. म्हणजे आता तुला हे ही आठवत नाही ? " बाबा म्हणाले.

"अरे ती तुझी मैत्रीण आहे न ? " आईने घाबरून विचारलं.

"मला नाही माहित. " मला काय बोलाव ते सुचलच नाही.

निमित्त ८ मार्च ..........

( मार्च महिन्यातील ८ तारखेला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे. ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मानला जातो. अर्थात ३ऱ्या जगातील देशातील महिलांना त्याची माहिती आणि महती किती असेल हा एक प्रश्नच आहे. पण आता वर्षातील ३६५ दिवसां मधील एक दिवस महिलांना देण्यात आला आहे.            

मैत्रीण-३

दातात फसलेला आंब्याच्या कोयीचा केस जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मन त्यातच अटकून राहतं तसच माझं झालं होत. मी रात्रभर विचार करत होतो, ही श्रुती जोगळेकर कोण?

साहजिकच रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे सकाळी उशिरा उठलो. चहा-नाश्ता उरकून पुन्हा पहिली डायरी हातात घेतली तर मैथिली आली.

"तू अजून आंघोळ नाही केली? यॅक बापा... मी पहा, पहिला नंबर तु कातीन किडा... " असं म्हणत जोरजोरात हसू लागली. तितक्यात आईने 'पाणी गरम झालय रे, अंघोळ उरकून घे' असं म्हणताच 'माकडाच्या हाती कोलित'च मिळाल. मी स्वैपाकघरात शिरलो तर आई ओवाळायची तयारी करत होती.

बोधकथा २ - भाग २

मग माकड सूत्रसंचालनासाठी उठले. "इथे जमलेल्या सर्व प्राणी पक्ष्यांनो, आपल्या अधिवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आता काहीतरी करायलाच हवे. नाहीतर वेळ निघून गेली असे होईल. त्यासाठी मी आपल्या वनातील एकमेव (इथे त्याने शोधकपणे वाघाकडे पाहिले. सभेला येण्याआधीच एक अख्खे हरीण उडवल्याने वाघ झोपाळला होता. जांभई देतादेता पंज्याने माश्या वारता येतात का याचा तो आळशीपणे शोध घेत होता) सम्राट, अखिलवनहृदयसम्राट सिंहमहाराज यांनी त्यांचे मौलिक विचार मांडावे अशी विनंती करतो. "

बोधकथा २ - भाग १

दिवसेंदिवस ऋतुचक्राची अनियमितता आंधळ्यालाही ऐकू येईल आणि बहिऱ्यालाही दिसेल इतकी ठळक होऊ लागली होती. सर्वच प्राण्या-पक्ष्यांना त्याचा त्रास जाणवू लागला होता.

वसंत ऋतू येण्याची चाहूल लागताच कोकिळेने गायला घ्यावे आणि पावसाची अकाली सर येऊन तिचा सायनस बळावावा, वर्षा ऋतू येण्याची चाहूल लागताच मोराने पिसारा फुलवून नाचायला घ्यावे आणि अचानक करडे ढग पळून जाऊन परत तपत्या झळा (उन्हाच्या) झेलीत त्याचा पार्श्वभाग शेकून निघावा, दिवाळी उरकताच आता थंडी येईल म्हणून गायीने झोपताना गोऱ्ह्याला पोटाशी घ्यावे आणि उबाट्याने वैतागून त्याने तिला शिंगलावे असे फार होऊ लागले होते.