द उकिम्वी रोडः आफ्रिकेतील सायकलप्रवासाचे स्मरणटिपण

The Ukimwi Road ह्या पुस्तकाविषयी लिहिण्यापूर्वी मनामध्ये विचार येऊन गेला की मराठीत अशा प्रकारचे लेखन कोणी केले आहे. अनिल अवचटांचे 'पूर्णिया' आणि नंतर सामाजिक प्रश्नांबाबत केलेल्या प्रवासांची वर्णने हे ठळकपणे आठवणारे उदाहरण. दि.बा.मोकाशी यांची 'अठरा लक्ष पावले' आणि 'पालखी', मिलिंद बोकील यांचे 'समुद्रापारचे समाज' ही मला आणखी आठवणारी उदाहरणे .

इंडेमाऊ - गाणी आहेत का?

संजय उपाध्ये यांची इंडेमाऊ या संग्रहामधील गाणी कोणाकडे उपलब्ध आहेत का? मी भारतामधून आणलेली कसेट वापरून वापरून निकामी झाली आहे... आंतरजालावर शोधून अजून तरी मिळाली नाहीत..

कुठे बरं वाचलंय हे? - ९

मध्यम शरीरयष्टी. सावळा वर्ण. उजव्या गालावर गोचिडासारखा मस. धारदार नाक. झुबकेदार मिशा. डोक्यावरील वरचेवर कापलेली लॉनसारखी कटिंग. अघळपघळ धोतर. पितळी बटनांचं खमीस. पटका मात्र लोकांनी दोनच ठिकाणी पाहिला. बुलाखराव घरी असले तर बैठकीतल्या खुंटीवर, नाहीतर त्यांच्या बगलेत. तसा माणूस वचक्या. समोरच्या माणसावर खेकसणारा. पण मुळातच फार भाबडा, ढेकळासारखा विरघळणारा.

एकाच माळेचे .....

"सांभाळून. मधली पायरी तुटलीय. "
"जावळ्या, लेका, कुठे घेऊन आलास? "
"पाट्या, आज ड्राय डे. इथे नाही तर कुठेच नाही. "
"आहेस बुवा अस्सल. पुढे बघ.... "
"*****... ***"
"शिव्या.. को.. णाला घालतो? मला.... "
"चला निघा. झेपत नाही तर घ्यायची कशाला? "
"को... णाला झे.. पत... नाय? "
"सोड ना जावळ्या, नसता वांदा नको. उगाच मुड स्पॉईल व्हायचा. "