सलाम!

स्वर्गात अतिमहत्त्वाची सभा भरली होती. विषय होता, वाढती गुन्हेगारी आणि दहशतवाद. विष्णूचे दशावतार पूर्ण झाल्यानंतर राक्षसांचा दहशतवाद पुन्हा वाढला होता. अतिमहत्त्वाच्या ठिकाणांसाठी, सर्वसामान्य ठिकाणांसाठी, असे वेगवेगळे दहशतवादी गट राक्षसांनी स्थापन केले होते. त्यांनी सगळीकडे उच्छाद मांडला होता. स्वर्गातल्या कुणालाच पहिल्यासारखे सुरक्षित वातावरण जाणवत नव्हते. अप्सरांचे अपहरण, देव-देवतांचा छळ, शुभकार्यात बाधा, काय वाटेल तसा धुमाकूळ राक्षस घालत होते.

खोट्याची दुनिया

खोट्याची दुनिया राहिली नाही.... सगळीकडे खऱ्याचाच जमाना आला आहे.

पूर्वी असं नव्हतं...

आमचे गुरू पु. ल. देशपांडे यांनी आयुष्यभर अनेक व्यक्ती, वल्ली बनून इतरांना बनवलं. अनेक खोटी आत्मचरित्रं लिहिली. (शेवटी खरं चरित्र सुनीताबाईंना लिहावं लागलं). त्यांचे गुरू वुडहाऊसचं पण तेच.

आमचे दुसरे एक गुरू चि. वि. जोशीं यांनी 'चिमणराव' बनून लोकांना हसवलं. (दिलीप प्रभावळकरांची उमेदवारीच्या काळात पोटा-पाण्याची सोय केली.)

.....आणि मी त्यांना स्विकारलं - २

दुवा क्र. १

मी माझ्या मागच्या लेखात संस्थेचं नाव सांगितलं नव्हतं.

संस्थेचं नाब - ममता फाउंडेशन.

संपर्क - श्री. अमर - ९९२२९२३६५६

२रा लेख लिहायला वेळेआभावी उशीर झाला त्या बद्दल क्षमस्वः. आज आठवणीने लिहितोय कारण १ डिसेंबर, जागतीक एडस दिवस.

आज एडस्ग्रस्त लोकांना समाज सहजा-सहजी स्विकारत नाही. त्यांची व्यथा मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्यंना देणग्या, कपडे, खाउ द्यायला कदाचित अनेक हात पुढे येत असतिल. पण जो पर्यंत त्या हातंना मायेचा ओलावा नसेल तर ती मदत व्यर्थच.