नुकताच श्याम बेनेगल यांचा "वेलकम टु सज्जनपूर" बघितला. पिक्चर एकदम झक्कास! नकळत मराठीतल्या वळुशी तुलना झाली. आता चित्रपटातल्या (मुख्यत: तथाकथित व्यावसायिक आणि विनोदी) कल्पनांना फारसं तर्कनिष्ठ दृष्टीनं (लॊजिकली) बघू नये असं म्हणतात. म्हणजेच त्यांचं "चित्रपटीय स्वातंत्र्य"(सिनेमॅटीक लिबर्टी) जरी मान्य केलं तरी या दोन विनोदी चित्रपटांच्या विषय व पात्ररचना यांबाबतीत मला काही निरीक्षणं नोंदवावीशी वाटतात.
"वळू" काही अंशी उगीचच "गावच्या लोकांचे व गावातल्या वातावरणाचे थटटास्पद चित्रण" असल्यासारखा वाटतो. आता काहींच्या मते उपहासात्मक विनोद हाच तर अशा विनोदी चित्रपटांचा गाभा असतो.