वाढणी
तीन जणांसाठी पोटभर
पाककृतीला लागणारा वेळ
60
जिन्नस
- मध्यम आकाराचे कांदे ३
- मध्यम आकाराचे बटाटे ६
- लसूण दीड-दोन गड्डे
- ओले खोबरे दीड वाटी
- फोडणीचे साहित्य, तेल, मीठ
मार्गदर्शन
कांदा मध्यम कापून घ्यावा.
बटाटा बारीक (काचऱ्यांसाठी कापतो तसा) कापून घ्यावा आणि पाण्यात टाकावा.
लसूण सोलून व ठेचून घ्यावी.
ठेचलेली लसूण आणि कापलेला कांदा साधारणपणे समप्रमाणात (एक वाटी प्रत्येकी) असावेत.