खरंच! हे जग काय फक्त कुरघोडी करून 'गूण' कमावण्यासाठीच असतं? नसतंच मुळी. ते त्याहून खूप मोठ्ठं असतं. परंतु या जगात सन्मानानं जीवन जगायचं असेल तर इतरांवर आपला मान सांभाळून कुरघोडी करायच्या असतात, 'गूण' कमावायचे असतात. - हे मराठी माणसाला केव्हा समजणार?
प्रत्येक राजकीय नेता हा त्याच्या समाजातील, प्रांतांतील जनतेच्या मानसिकतेचे प्रतिबिंब असतो. समजा, लालूप्रसाद यादव हा बिहारी समाजाच्या ठरावीक जनतेच्या मानसिकतेचे प्रतिबिंब मानले तर पडद्यावरच्या हीरोलाही वाकवणारे 'अँग्रीयंग मॅन' राज ठाकरे हे महाराष्ट्रातील ठरावीक जनतेच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहेत.