गाडी फाटकाबाहेरच्या ट्रॅफिकमध्ये आणि प्रदूषणाच्या ढगामध्ये पोचली आणि तिच्या विचारांची टकळी सुरू झाली.
आता मला कुठला मुलगा आवडतंच नाही हा माझा दोष आहे का? "बघितलेली" सगळी एकजात बावळट तरी वाटतात किंवा "ध्यान" दिसतात. आजूबाजूला दिसणाऱ्यांपैकी जी आवडतात ती अगोदरपासूनच कुठल्यातरी बावळट पोरीच्या प्रेमाततरी असतात नाहीतर "विवाहित". उगाचच "वय वाढतंय" या सबबीखाली कोणाशीही लग्न करायचं का? आणि नाहीच करावसं वाटलं लग्न तर बिघडतं कुठे. हे जेव्हा आई बाबांसमोर बोलले तेव्हा सहा रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंपाचा धक्का बसावा अशी प्रतिक्रिया सर्वांनी दिली होती.
जानेवारीत मी ३ वेळा पुण्याला जाऊन आले होते. पण मला मुळीच थकायला झाले नव्हते. उलट छानच वाटले.
मी हैदराबादला येवून स्थिरस्थावर झाले. पुन्हा प्रशिक्षण जोरात सुरू झाले. मी आता ८ फेब्रुवारीची वाट बघू लागले होते. कारण तेव्हा आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता व केदार हैदराबादला येणार होता. आधी आम्हाला वाटले होते की आम्ही आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस पुण्यात साजरा करू शकू. पण प्रशिक्षण लांबल्यामुळे ते होऊ शकले नाही. म्हणून आम्ही हैदराबादलाच साजरा करण्याचे ठरवले. मी नेहेमीप्रमाणे केदारसाठी खोली आरक्षित करून ठेवली.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.