आम्ही धावत पळतच आमच्या मुंबईच्या विमानाच्या गेट वर जाऊन पोचलो आणि त्या माणसानी आमची चौकशी करायला सुरुवात केली. तुम्ही सुरीनामला कशासाठी गेलात वगैरे प्रश्न होते त्यात. शेवटी त्याची खात्री पटली की आम्ही कसलीही तस्करी करत नाही आहोत. म्हणून मग आम्हाला त्याने विमानात बसायला परवानगी दिली. आम्हाला इतका उशिर झाला होता की स्कॅन झालेले सामान आम्ही पटकन उचलून घेतले. आमच्यासाठी (आणि आणखी दोन लोकांसाठी) विमानाचे दरवाजे उघडले. आम्ही आत गेलो आणि गिरीश आमचे सामान वरच्या कप्प्यात ठेवू लागला. माझ्या हातातील केबीन बॅग मी त्याला दिली. नंतर तो बसायला लागला. तर मी त्याला म्हणाले की तुझा लॅपटॉप पण ठेव ना.