"संदू ऊठ रे, ऊठ नां, सहल ले जाणं नही का? " ऊठ आते.
"उममम".
"ऊठ रे.. बट्ठा पोरे चालना जातीन.. सहलले.. आणि तूच राही जाशी घर. "
मोबाईलच्या गजराने, मला झोपेतून उठवलं, आणि माझ्या स्म्रुतिपटलावर चाललेला, जुन्या आठवणींचा चित्रपट थांबला.
मी त्या दिवशी संध्याकाळी, माझ्या मित्राबरोबर, लॉवेल-बोस्टनला 'फिरायला' जाणार होतो, म्हणून साखरझोपेत मला, माझ्या शालेय जीवनातल्या 'सहली' आठवत होत्या. ही आठवलेली सहल होती, पैठण-जायकवाडी धरण-महाबळेश्वर-पुणे... फी होती २२५/- रु. फक्त. आणि आज मी चाललो होतो एडिसन पासून २५० मैल लांब, म्हणजे लॉवेलला.