चीनचा दौरा संपत आलाय. उद्या घरी परतणार. या दौऱ्यात नेहमीप्रमाणे चावज्झौ होतेच. चावज्झाउ गेस्ट हॉटेल म्हणजेच ईंग बिंगवान ला उतरलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडे आठ ला नाश्त्याला मी आणि हुंग यान भेटणार होतो. सकाळी लवकरच जाग आली. आवरले आणि आवारात फिरायला निघालो. अचानक चार वर्षांपूर्वीच्या प्रसंगाची आठवण झाली.
मी असाच कामानिमित्त आलो होतो. बरोबर माझा एक दाक्षिणात्य सहकारी होता, आपण त्याला रामू म्हणूया. दिवसभराचे काम संपले. साडेसातच्या सुमारास हॉटेलवर परत आलो. सोडायला आलेल्या मंडळींनी विचारणा केली की आता इथेच जेवून झोपणार की जरा फिरायला जाऊया? वा! आणखी काये हवे?