मराठी-मोबाईल-वेड्यांसाठी उपयुक्त माहिती!

नोकिया ५२२० - एक्स्प्रेस म्यूझिक... या फोनवर 320 x 240 ची स्क्रीन, संगीत, इंटरनेट, पुश ईमेल, ब्लू टूथ या बऱ्याच विशेषांसोबत आपल्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे देवनागरी इनपुट आहे! एसेमेस, ईमेल वा या फोनच्या कुठल्याही मेन्यूमध्ये मला वाटलं तर देवनागरीत मी लिहू शकतो.

 

वारी २१

हिडन व्हॅलीच्या आमच्या वास्तव्यातच सदनिकांची तपासणी करण्यात येणार आहे असे समजले. त्या काळात संकुलाचे कार्यकारी सभासद शिवाय फायर ब्रिगेड वीजमंडळ इत्यादींचे काही सभासद यांची एक समिती प्रत्येक सदनिकेची पाहणी करून आगीच्या, विद्युतजोडणीच्या दृष्टीने सदनिकेच्या सुरक्षिततेची पाहणी करतात. याशिवाय सदनिका व्यवस्थित ठेवली आहे अथवा नाही, अडगळ कोठेही साठवत नाहीत याची कसोशीने पाहणी करतात. सदनिकेच्या बांधकामात लाकडाचा वापर जास्त असल्याने आगीचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो त्यामुळे इतकी कडक तपासणी केली जाते. तरीही आगीची जराही शक्यता असेल तर धूर दर्शक (स्मोक डिटेक्टर ) लगेच शिट्टी वाजवतात.

नकटीच्या लग्नाला...

बरेच दिवस झाले तरी नकटीचं लग्न ठरत नव्हतं. वधूपित्यानं संभाव्य वर शोधून ठेवले होते. आपणच मुलीचा सांभाळ केलाय, असं म्हणविणारे काके-मामेही प्रयत्न करून थकले होते. पण "कुलस्वामिनी' कौल देत नव्हती. काही ना काही अडचण सतत येत होती.

गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ८

आधी सांगितल्याप्रमाणे माझी परतीची तारीख ८ एप्रिल पक्की झाली. मला आता परतीचे वेध लागले होते. तृप्ती ला पण आता परत यायची इच्छा होत होती पण संदिप चे तिकडचे काम संपल्याशिवाय त्यांच्या परतीची तारीख पक्की होत नव्हती.

जिलेब्याच जिलेब्या चोहीकडे....

जिलेब्याच जिलेब्या चोहीकडे.... हे शिर्षक वाचून बरयाच जणांना आनंदाचं भरतं येऊन तोडाला पाणी सुटेल. पण थांबा... कारण जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. खरच सांगतो आतापर्यत जिलेबी ला मी दुय्यम दर्जा देत इतका गांभिर्याने कधिच विचार केलेला नव्हता. पण माझ्या अवती भवती इतक्या प्रकारच्या जिलेब्या आहेतना त्यांनी मला चक्राऊन टाकलं आणि काही शोध माझ्या हातून लागले. अजून पण मी कुठल्या जिलेबी बद्दल सांगतो आहे याची उकल नक्कीच झाली नसणार.