एकदा अघटीत घडले.
देवाच्या असंख्य न उमगणार्या लीलांपैकी एक लीला.
माणसांना प्रश्न पडायचेच थांबले.
कोणी कुणाला काहीच विचारेना.
आपणा स्वतःला नाही. आई वडिल मुलांना नाही.
मुले शिक्षकंना नाही. मालक नोकराला नाही.
जनता राजकारण्याला नाही.
कोणाच्या मनांत काहीच प्रश्न उरले नाहीत.
मग विचारणार काय?
सगळे कसे स्वच्छ माहीत आहे.
प्रत्येक जण माहीत असलेल्या ज्ञानाच्या आधारे काम करू लागला.
नवीन आलेला कोणी, प्रश्न विचारत न बसता, इतरांचे पाहून तसेच करू लागला.
नवीन जन्माला आलेल्या बाळासारखा.