परतफेड

डॉक्टर सुधा. तिच्या वडिलांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना कणाकणाने मरताना पहायची तिच्यावर वेळ आली आहे. इतरांवर तशी वेळ येऊ नये या आदर्शवादी विचाराने कोळशाच्या खाणीतल्या दवाखान्यात रुग्णांवर उपचार करण्यासाठी ती आली आहे. कोळशाच्या खाणीत अपघात अगदी नेहमीचेच. एका अपघातात सापडलेला एक तरुण तिच्याकडे उपचारासाठी येतो. त्याच्या पायावरची जखम खोल आहे. ती साफ करताना त्याला वेदना होतील म्हणून डॉक्टर सुधा त्याला भुलेचे इंजेक्शन देऊ लागते. तो तरुण ते घ्यायला नकार देतो. "जखम फार खोल आहे, तुला फार वेदना होतील..." डॉक्टर सुधा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तो तरीही ऐकत नाही. "व्हाय डोंट यू अंडरस्टँड?" ती चिडून विचारते. आपण कुठे, कोणा अडाण्यांच्या वस्तीत आहोत हे क्षणभर विसरुन...
"व्हाय डोंट यू अंडरस्टँड डॉक्टर?" भेदक नजरेचा तो तरुण खोल खर्जातल्या आवाजात विचारतो. "पेन इज माय डेस्टिनी अँड आय कॅनॉट एस्केप इट..."

डॉलर, रुपया आणि मी

खरे तर खुप लोकांना रुपयाच्या अवमुल्यनाचा, विनीमय दराचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो हे समजत नाही. कित्येक जण ते जाणुन पण घेवु इच्छित नाहीत. अर्थव्यवस्था, व्यापार, चलन वगैरे शब्द ऐकल्यावर ते घाबरतात किंवा आपली शिक्षणव्यवस्थाच इतकी भुक्कड आहे कि या गोष्टींचा कुणी विचारच करु नये अशी तजवीज करण्यात आलेली दिसते.

वारी ---२

       अमेरिकेचा प्रवेशपरवाना अर्थात व्हिसा विनासायास मिळाला आणि तोही दहा वर्षाचा ही आमच्या दृष्टीने फारच मोठी उपलब्धी होती‌. सुजितने म्हणजे -माझ्या मुलाने एअर इंडियाच्या विमानप्रवासाची तिकिटे पाठवलीच होती.तरी त्याच्याकडून तिकिटे मिळण्यापूर्वी विमानप्रवासाची तिकिटे मिळवण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला होताच.कारण आमच्या पूर्वानुभवी मित्रानी निरनिराळ्या विमानकंपन्या एकाच प्रवासासाठी वेगवेगळी भाडी आकारतात येवढेच काय पण निरनिराळ्या प्रवासी कंपन्या पण त्यात आणखी काही सवलती देतात आणि त्यात किफायतशीर भावात तिकिट खरेदी करून बरेच पैसे वाचवता येतात असा मोलाचा सल्ला दिला.आमचा यापूर्वीचा प्रवासाचा अनुभव मराठवाड्यात अधिक काळ कंठल्यामुळे म.रा.मा.प.मं (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ)  पुरताच मर्यादित असल्यामुळे विमानप्रवासास निघणे हे आमच्या दृष्टीने बिगरीतल्या मुलाला एकदम एस. एस. सी च्या परीक्षेला बसविण्याचाच प्रकार होता त्यामुळे निरनिराळ्या प्रवासी कंपन्यांकडून ऐकलेली माहिती फक्त ऐकून घेणेच आमच्या आवाक्यात होते,त्यातही एअर इंडियाने आमच्या प्रवासाची तारीख मे महिन्यातील असल्यामुळे आणि आम्ही चौकशी मार्चमध्ये करत असल्यामुळे एक एप्रिलपासून दर बदलणार आहेत असे सांगून आम्हास लोंबकाळत ठेवले आणि इतर कंपन्यांविषयी आम्ही साशंक होतो. आश्चर्य म्हणजे एअर इंडियाचे दर हे नेहमीच बदलत असतात आणि त्याची पक्की माहिती कोणत्याच प्रवासी कंपनीकडे नसते असे पुढे अनुभवास आले.अलितालियाने ज्येष्ठ नागरिकासाठी काही सवलत देण्याची तयारी दाखवली होती. टाइम्स ऑफ इंडियात मात्र निरनिराळ्या प्रवासी कंपन्या अगदी कमी भाड्यात अमेरिकेला अथवा जगात कुठेही नेण्याची तयारी दाखवणाऱ्या जाहिराती देत होत्या.आमच्या साडूंना मी फोन करून विचारले कारण त्यांचा एक पाय नेहमी विमानातच असतो तर त्यानी एअर फ्रान्स ची तिकिटे ब्लॉकच करून टाकली. एअर फ्रान्सचे भाडे बरेच जास्त म्हणजे इतर काही कंपन्यांपेक्षा माणशी वीस हजार रुपये अधिक होते अर्थात ब्लॉक करताना पैसे द्यावे लागत नसल्यामुळे मला फारसा धक्का बसला नाही.आमच्यासारख्या परत येणाऱ्या व्यक्तींसाठी तिकिट परतीचेच असते आणि एकेरी प्रवासाच्या भाड्याशी तुलना करता ते बरेच कमी पडते.तसेच तुम्ही चार महिने रहाणार की सहा महिने यावरही तिकिटाचे  दर अवलंबून असतात. परतीची तारीख निश्चित नसल्यास घेतलेल्या तिकिटास खुले किंवा ओपन तिकिट म्हणतात,पण काही विमानकंपन्या अशी तिकिटे देत नाहीत आणि दिल्यास जास्त भाडे लावतात सुदैवाने या सर्व माहितीच्या गोंधळातून सुजितने एअर इंडियाचे ओपन तिकिट पाठवून आमची सुटका केली अर्थात त्याने पाठवले नसते तर मी शेवटी एअर इंडियाचेच तिकिट घेतले असते याला दोन कारणे होती.एक म्हणजे एअर इंडियाचे विमान त्यावेळी सहार (मुंबई) विमानतळावरून निघून लंडन मार्गे जे.एफ.के.(न्यूयार्क) विमानतळावर उतरे आणि या प्रवासात लंडनला एक थांबा असला तरी विमान आणि विमानतळ बदलावा लागत नव्हता ( आताही तीच परिस्थिती आहे) आणि दुसरे एअर इंडियातील खानपान सुविधा आमच्यासारख्या शाकाहारी मंडळींना योग्य होती.

मला भावलेला लेख ...

प्रकाशपेरणी - (07 OCTOBER 2007)
"ती' खूप समजूतदार, शहाणी अन्‌ संयमी. मला नेहमी म्हणायची, ""हे आयुष्य खूप छान आहे; ते तितक्‍याच छानपणे जगण्यासाठी देवानं जन्माला घातलंय. तितकंच सुंदर "मन' आपल्याला परमेश्‍वरानं दिलंय. रंग, गंध, रूप, नाद, स्पर्श साऱ्या संवेदना जागृत ठेवून त्याचा आस्वाद घ्यावा. देवानं तुमच्यासाठी किती निसर्गाची विविध रूपं बहाल केली आहेत; त्याकडे डोळे उघडे ठेवून पाहा ना जरा....'' असं "ती' बोलत राहायची... आमच्या मैत्रिणींच्या गटातील "ती' म्हणजे "सुधा'.

परवा परवाची गोष्ट. मीना तिच्या सुनेबद्दल सांगत होती. किती चपखल- हुशार आणि धूर्त आहे म्हणून.. खरं तर मीना शिक्षिका. कित्येक मुलांना तिनं उत्तमपणे घडवलेलं मी पाह्यलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी सून तिचा "इगो' दुखावतेय. सासूचा पैसा तिला हवा, कष्ट हवेत; पण सासूची कुठेही सत्ता नको. मीनाला ती सत्ताही दाखवायची हौस नाही. तिला हवेत दोन "प्रेमाचे शब्द' -

या सासू-सुना एकत्र राहत नाहीत. प्रसंगाने मेच्या सुटीत एखादा महिनाच एकत्र येतात. पण त्या वेळी सगळा पुढाकार सूनच घेते. छोट्या छोट्या गोष्टीत खसकन्‌ बोलायचं- हृदयावर चरे उमटावेत असं. मीनाला हा एकुलता एक मुलगा. त्याच्यात तिचा जीव गुंतलेला असे. आणि आता तो मुलगासुद्धा, "आई तू थांब- तिला विचारून कर' असं म्हणतो. अगदी सहज सहज मीना त्याला म्हणाली- ""तू कसा राहतोस रे हिच्या विचित्र स्वभावात?'' - त्यानं शांतपणे सांगितले - ""तुझे संस्कार आहेत ना माझ्यापाशी; नाही तर आमचं नातं कधीच तुटलं असतं...'' मीनाला ते ऐकून हुंदका आला. तेही खरंच होतं. एकूण काय, चार घरांत सासू-सून हा संघर्ष जसा, तसा मीनाकडे. दोघीही सुशिक्षित असल्यानं उंबऱ्याच्या बाहेर त्याचे पडसाद नाही, इतकंच. आणि मीना सोशीक- हळवी. ती सुनेला एक शब्दही बोलत नव्हती, त्याचं कारण नवरा. अति शांत. तो प्रत्येक गोष्टीत मीनाला शांत करे. अशा या मीनाला, आता कुठल्याच गोष्टीत रस वाटत नव्हता. तेव्हा "ती' आली. ती म्हणजे आमची सुधा...

सुधा तिला म्हणत होती- ""अगं त्याच्या पायात सामर्थ्य आलंय, पंखात बळ आलंय आणि हुशार जोडीदारीण आहे. तुझ्या कुशीत किती दिवस त्याला ठेवणार आहेस? घरट्यातून उडायला शिकवल्यावर पक्षीणसुद्धा निर्धास्त होते. आणि तू... तू निर्धास्त हो. तुझं वाचन कर. अगं तुझ्याकडे कथा सांगण्याची केवढी सुंदर कला आहे! ती विकसित कर. पूर्वी जसं पौरोहित्य शिकायला जात होतीस, तसं शिकायला जा- आम्हा मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये पूर्वीसारखी ये. आता आपणच आपलं विश्‍व व्यापक करायचं असतं. मूल-सून-नातवंड यापेक्षा अजून दुसऱ्या गोष्टींत आनंद लुटायला शीक.''

सुधाचं सारं तंत्र मीनानं ऐकलं आणि एक समृद्ध जीवन आता ती जगतेय... मुलाला आणि सुनेलाही तिच्या वागण्याचं आश्‍चर्य वाटावं असं. तिच्या मनातली निराशेची मरगळ कधीच गेली आणि तिथं लख्ख प्रकाशाचा झोत आला- तिला उजळून टाकणारा. या प्रकाशाच्या कवेत अशा दुःखी सासवांना घेऊन ती प्रकाश पेरीत जाईल, हे नक्कीच.

एक सहल 'ज्येष्ठांची'!

                                       
एक दिवस असेच नेहमीसारखे मी आणि आजी गप्पा मारत होतो.एकदम ती मला म्हणाली या मंगळवारी येतेस आमच्या चर्चाच्या सहलीला? आम्ही बाड कांबेर्ग ला जाणार आहोत.मी काय तयारच होते नवा अनुभव घ्यायला. सहल होती ज्येष्ठांची, सगळे किमान सत्तरीच्या पुढचे आजीआजोबा.सांक्ट मार्कुस किर्श म्हणजे सेंट मार्क्स चर्च तर्फे ज्येष्ठ मंडळींसाठी सहल,ऑपेरा,नाटके असे अनेक कार्यक्रम आयोजले जातात. आकिम आजोबा काही चर्चच्या कार्यक्रमांना जात नाहीत.ते "कोन जातो रे चर्चात?मी तर क्रिसमस नाय तर लग्नाबिग्नाला जातो चर्चात." या फटार्डोच्या पंथातले! तर त्सेंटा आजी मात्र दर शनिवार रविवार 'गॉटेस डीन्स्ट' अर्थात 'मास'ला जाणारी असल्याने ती या इतर कार्यक्रमांना सुद्धा उत्साहाने जात असे. तर तिच्याबरोबर मी ही ट्रीपला जायचे ठरले. बाड कांबेर्ग हे ताऊनुस टेकड्यांमधील लिंबुर्ग-वाईलबुर्ग जिल्ह्यातील एक छोटेसे गाव.फ्रांकफुर्ट पासून साधारण ४४ किमी अंतरावर असलेले हे १००० वर्षाचे प्राचीन गाव पाहायची उत्सुकता अर्थात होतीच.बाड म्हणजे बाथ.बाड ने सुरू होणारी अनेक गावे जर्मनीत आहेत,इथे गरम पाण्याचे झरे,कुंडे असे काही पूर्वी होते आणि त्यामुळे त्यांची नावे बाड पासून सुरू होणारी आहेत.उदा. बाड होंबुर्ग,बाड सोडन,बाडेन बाडेन इ. बाड कांबेर्ग मधील झरे हे हेसन राज्यातील सर्वात जुने झरे असल्याचे सांगतात. अर्थात आता सर्वच ठिकाणी असे झरे,कुंडे आहेतच असे नाही पण नावे मात्र तशीच राहिली आहेत. आपल्याकडे नाही का धोबीतलावावरील तलाव,चर्चगेटमधील चर्च,घोडबंदर वरील घोडे गायब झालेत तसेच!
ज्येष्ठांची सहल त्यांना झेपेल अशीच अर्ध्या दिवसाची. दुपारी १ वाजता जेवून खाऊन मंडळी निघणार आणि रात्री आठाच्या सुमाराला परत! मी आणि आजी १२.३० च्या सुमाराला घरातून चर्चात जायला निघालो. पावसाची किंचित भुरभूर सुरू झाली म्हणून आजी थोडी वैतागली पण चर्चच्या आवारातील मित्र मैत्रिणी पाहून परत उत्साहित झाली.एकेक जण जमायला लागले. सगळे ७०,७२,७६ अशा चढत्या वयांचे 'तरुण' कोणी काठी घेऊन तर कोणी वॉकर घेऊन येऊ लागले.एक आजी तर चक्क व्हील चेअर वरून आली.पण उत्साह मात्र शाळेला ट्रीपला जाणाऱ्या मुलांच्या वरताण होता.पाऊण च्या सुमाराला बस आली,थोमासने (थॉमसचा जर्मन उच्चार! हे लोक जॉनला यॉन,पिटरला पेटर,मायकेल ला मिशाईल म्हणतात.)आजीआजोबांचे वॉकर्स बसच्या पोटात ठेवायला सुरुवात केली आणि एकेक आजीला हात देऊन बसमध्ये बसवायला लागला.आमची आजी आणि मी त्याला मदत करू लागलो. बरोब्बर एक वाजता "हुर्रा.." असे ओरडून बस सुटली.टायर पुढे नारळ फोडून 'गणपतीबाप्पा मोरया'ऐवजीचा हा किरकोळ बदल होता.बस हाय वेला लागली आणि आज्या जणू आपली वयं चर्चात ठेवून आल्यासारख्या गाणी म्हणायला लागल्या. एकाहून एक जर्मन लोकगीतांनी जोर धरला.आपल्या सारखे हे लोक भेंड्या नाही खेळत तर हातात हात गुंफून कडे करतात आणि जागेवर बसले असले तरी गाणी म्हणत डोलतात. आजी आजोबा सगळे एकमेकांचे हात गुंफून घेऊन डोलायला लागले.हाय वे संपून गाडी आता छोट्या रस्त्याला लागली.ताऊनुसच्या टेकड्या जवळ यायला लागला,वळणावळणाच्या रस्त्यावर दोबाजूला मयूरपंखी आणि मेपल्स चवऱ्या ढाळत होते. सगळीकडे हिरवाई आणि फुलांचे रंगीत मखमालीचे गालिचे पसरले होते.थोमासने गाडीचा वेग कमी करून रसिकता दाखवली.आजीआजोबांनीही आपापली छबीयंत्रं बाहेर काढली.या तासाभराच्या प्रवासादरम्यान सर्व आजी आजोबांशी आमच्या आजीने अगदी कौतुकाने माझी ओळख करून दिली.त्यात एक ८० च्या पुढचे चित्रकार आजोबाही होते.आफ्रिकेत राहिलेले, ६ भाषा येणाऱ्या या आजोबांनी हिंदीत नमस्ते करून धन्यवाद देऊन मला एक धक्काच दिला.
         
कुर हाउस रेस्टोरांक्ट पाशी आमची बस थांबली आणि सारे आजीआजोबा पायउतार झाले.आपापल्या काठ्या,वॉकर्स घेऊन कुर हाउस च्या शेजारील प्रसिद्ध स्पा गार्डन मध्ये फिरत फिरत मला एकेका हर्बची ओळख करून देऊ लागले. साधारण तासभर फिरल्यावर कुर हाउस मधील 'काफे उंड कुकन' चा स्वाद घेणे अत्यावश्यक होते.या जर्मन मंडळींचे एक कप कॉफीवर समाधान नाही होत.ते किमान २,३ कप कॉफी तरी पितातच, ती ही कडक,काळी,कडसर कॉफी! त्यामुळे आपल्याला कोणता केक हवा आहे ते सांगून तो यायच्या आतच  कॉफीचे कपच्या कप रिचवणे चालू झाले.तिथेच मुद्दाम तयार केलेली ती अप्रतिम चीज पेस्ट्री, अम्म!! आजही माझ्या जिभेवर ती चव घोळते आहे.
                                                   
कॉफीपान झाल्यावर आता गावात फेरफटका मारायचा होता.सुझन,आमची गाईड घाईघाईने कॉफी संपवून उठलीच.थोमास,सुझन,मी आणि आमच्या आजीसारखे स्वतःची काळजी घेऊ शकणारे आजीआजोबा यांनी वॉकर वाल्या आज्यांना मदत करायची आणि त्यांना मागे पडू द्यायचे नाही असे ठरले. अमाथोफ ही अतिभव्य इमारत,तिच्यावरील लाकडी कोरीव काम अत्यंत पाहण्यासारखे आहे.आता तिथे सरकारी कचेऱ्या आहेत.१४ व्या शतकातील ओबरटुर्म म्हणजे अप्पर गेट टॉवर आणि त्याच्या आतील लहानसे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.अनेक पुरातन वस्तू तिथे जतन करून ठेवल्या आहेत.बाड
कांबेर्गचा लोअर गेट टॉवर हा झुकलेला मनोरा म्हणून  प्रसिद्ध आहे.आपल्याला पिसाचा झुकता मनोराच माहिती! त्यामुळे थोडी शंकाच मनात होती.म्हणजे मी तरी आधी कधी या बद्दल वाचले,ऐकले नव्हते.१३३५ मध्ये सुरुवात करून १३८० मध्ये पूर्ण झालेला हा टॉवर १.४४ मीटर झुकला आहे.(inclination 1.44 m) पण आता तिथे आत प्रवेश बंद आहे. 

एक हवाहवासा 'बावर्ची'

शिवनाथ शर्मांचा संसार मोठा आहे. स्वतः ते, थोरला मुलगा रामनाथ, मधला काशिनाथ आणि आणि धाकटा विश्वनाथ. रामनाथबाबू एका कंपनीत हेडक्लार्क आहेत. काशिनाथसर प्राध्यापक आहेत आणि विश्वनाथराव सिनेमात संगीत दिग्दर्शक होण्याची स्वप्ने बाळगून आहेत. रामनाथबाबूंच्या पत्नी सीतादेवी आणि त्यांची लाडकी, लाडावलेलीच म्हणा ना, कन्या मीता. सीतादेवींचे सारखे सांधे धरलेले असतात, त्यामुळे त्यांना फारसे काम होत नाही.मीता नृत्य शिकते आहे. त्या नृत्याची तालीम आणि नटणेमुरडणे यातच ती मश्गुल आहे. त्यातून रामनाथबाबूंना जरा..अं.. घ्यायची सवय आहे. संध्याकाळ झाली की त्यांची बाटली उघडते. काशिनाथसर तत्त्ववादी प्राध्यापक आहेत. त्यांच्या पत्नी शोभाताई जरा सुखवस्तू आहेत. त्यांचा मुलगा पिंटू शाळकरी आहे. विश्वनाथरावांचे अजून लग्न झालेले नाही. त्यांची संगीतातली कुवत बेताचीच, पण एकंदरीत थाट कलंदर आहे.
आता इतकी सगळी आत्ममग्न माणसे एका घरात असताना घरातले काम कुणी करायचे हा जटील प्रश्न आहे. शिवनाथजी आपल्या सुनांवर वैतागतात, पण बिचाऱ्यांचे वय झाले आहे, त्यांचे कोण ऐकणार? त्यातून दोन्ही मुले आपापल्या बायकांच्या ताटाखालची मांजरे आहेत. येऊनजाऊन घरातल्या कामाला जुंपली जाते ती कृष्णा. ही पण शिवनाथजींची नातच. बिचारीचे आईवडील नाहीत, मग काय? काहीही पाहिजे असले की 'कृष्णा, कृष्णा...' अशा झाल्या हाका सुरु. पण पोरगी सालस, अगदी गुणी आहे हो. सगळ्यांच्या सेवेला सारखी हजर असते. मीता तिच्याच बरोबरीची, पण कृष्णाने मीतासाठी ओव्हलटीन करुन आणले तरी मीताबाईंचे डोळेसुद्धा उघडलेले नाहीत. एवढं सगळं करुन कृष्णा कॉलेजला जाते आहे. तिथल्या एका प्राध्यापकाबरोबर तिचे काही हळुवार बंध गुंफले जाताहेत...

स्वयंपाकघरातील विज्ञान - एक माहितीपूर्ण संदर्भग्रंथ

पाककृतींची पुस्तके ही आता अजिबात नाविन्याची गोष्ट उरलेली नाही. 'रुचिरा' पासून तो प्रवाह चांगलाच फोफावला आहे.

पण प्रत्यक्ष स्वयंपाक करत असताना त्यामागे विज्ञान कसे सक्रिय असते, त्यात कोणकोणत्या प्रक्रिया घडतात, पदार्थ शिजतो म्हणजे काय होते, तळणीचे तेल जास्त तापवले किंवा कमी तापवले तर त्याचा तळणावरती काय परिणाम होतो, पाव भाजल्यावर सोनेरी का होतो, उग्र वासाचे पदार्थ शिजवल्यानंतर त्यांचा वास कमी का होतो, कणकेची पोळी लाटता येते तशी ज्वारीची भाकरी का लाटायला जमत नाही, चिकनचे तुकडे शिजवताना वेगवेगळ्या प्रकारच्या तुकड्यांना (ब्रेस्ट, लेगपीस इ) वेगवेगळा वेळ का लागतो, स्वयंपाकघरात वापरली जाणारी आधुनिक उपकरणे नक्की काय आणि कसे काम करतात, या आणि अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वर्षा जोशी या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिकेने हा ग्रंथ लिहिला आहे.

झळा

झोपेत चुळबुळणाऱ्या बाळाच्या अंगावरून हळूहळू दुपटे सरकत जावे तसे पाऊसभरले ढग हळूहळू सरकत नाहीसे झाले होते. पाणी ओतप्रोत पिऊन घेतलेली धरती तृप्तीचे उष्ण आणि दमट हुंकार देत होती. तीनचार महिने आपण कामात जरा हयगयच केली, कधी आलो तर कधी नाही, असा ओशाळवाणा अपराधी भाव मनात घेऊन सूर्य आता दुप्पट तडफेने कामाला लागला होता. दुपारचे ऊन सणाणून तापे.

दोन प्रसंग

एकदा एक गरिब मुलगा एका पुस्तकाच्या दुकानापाशी उभा होता. बराच वेळ तो फक्त पुस्तके चाळत होता.हे पुस्तक कसले? ह्या पुस्तकाचा लेखक कोण? असे नाना प्रश्न तो दुकानदाराला विचारत होता.त्याच्या एकन्दर परिस्थीतीवरुन तो फार गरिब वाटत होता.पुस्तके विकत घेण्याइतके त्याच्याकडे पैसे नसावेत, म्हंणून तो पुस्तके चाळ्ण्याचा बहाण्याने पुस्तक वाचुन सम्पवण्याच्या प्रयत्नात होता.त्याच्या ह्या वागण्याने दुकानदार वैतागला; आणि दोन शिव्या हासडून त्याने त्या मुलाला तिथून पळवून लावले.हिरमुसून तो मुलगा तिथुन नीघुन गेला;जाता जाता त्याच्या मनात आले, ''किती बरे झाले असते जर मला वाचताच आले नसते!''.