अड्मीट कीडा ...किसका घर

मध्ये ऐका रविवार पुण्यात घरी असताना खूप आरडा ओरडा ऐकू आला म्हणून बाहेर नजर टाकली..तर ऐक 10 12 वर्षाच्या  मुलांचा ग्रुप दंगा करत पळापळी करताना दिसला. आधी मला वाटला ते नेहमीसारखा क्रिकेट खेळात असावेत...पण नंतर बघितला तर ते लोक चक्क बेसबॉल खेळत होते ...आता या खेळच नियम वगैरे मला माहीत नाहीत.. आणि खरंतर मला हा खेळ अजिबात आवडत नाही...पण एकुणात जे दिसला त्यावरून एवढा नक्की की त्या मुलांना हा खेळ चांगलाच माहीत होता आणि ते अगदी मनसोक्त खेळत होते ...हा प्रसंग मला ऐक सौम्य धक्का देऊन गेला ...कारण पुण्याच्या गल्लीबोळात एवढी छोटी मुला बेसबॉल खेळत होती हेच मला विशेष वाटला.....
आणि उगाच आठवत राहिलो की या  वयाचे असताना आपण काय खेळायचो......
माझ्या लहानपणी आम्ही  ऐका मोठ्या वाड्यात राहायचो आणि तिकडेच हे सगळे "मैदानी" खेळ चालायचे .... आता आमच्या वाड्यातल्या जागेला मैदान म्हणणं म्हणजे बॅडमिंटन कोर्ट ला फुटबॉल ग्राउंड म्हणण्यासारखा आहे ....पण तो भाग अलाहिदा ..!

शांताबाई शेळके यांच्या जयंतीनिमित्त रेडिओ कार्यक्रम

मंडळी,
थोडी स्वस्तुती करते आहे. इथे अमेरिकेत एक इंटरनेट रेडिओ आहे. तिथे मी निवेदिकेचं काम करते. माझे २-३ कार्यक्रम झाले आतापर्यंत. आता येत्या गुरूवारी दि. १८ ऑक्टो. ला माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे.
पॅसिफिक टाईम सकाळी ७.०० , ११.००
http://www.eprasaran.com/
इथे मराठी चॅनेल.

अमेरिकायण! (भाग १०: द्युतक्षेत्री)

जसजस वसंताचं आगमन झालं, बाहेरचं वातावरण पूर्ण बदलू लागलं. झाडांना कोवळी पालवी, त्यावर काही पक्षी  असं चित्र पुन्हा दिसू लागलं. हे सगळं फार आल्हाददायक होतं. मग आम्हीही जवळपासची ठाणी काबीज करायचा चंग बांधला. पहिलं ठाणं होतं 'अटलांटिक सिटी'. समुद्रकिनाऱ्यालगतचं वसवलेलं शहर. हे शहर म्हणजे पूर्व अमेरिकेतील द्यूतक्षेत्रापैकी एक अग्रणी! (अहो खरंच! आपल्याकडे तीर्थक्षेत्री भाविक जितक्या भक्तिभावाने दरवर्षी जातात ना, तितक्याच भक्तिभावाने ही मंडळी 'कसिनो' असं आधुनिक नाव असलेल्या द्यूतक्षेत्री जातात). ह्याला काहीजण पूर्वेचं वेगास म्हणतात (पण बहुतेक असं म्हणणारे वेगासला गेले नसावेत असं वेगास पहिल्यावर वाटलं). 

शर्यत

मला आलेल्या forwarded mail चा भावानुवाद:

Ready Steady Bang च्या आवाजा बरोबर सगळ्या मुली धावायला लागल्या.फक्त १५ पाउले धावल्या असतील तेवढ्यात त्यांच्यापैकी एक लहान मुलगी पडली. तिला बरेच खरचटलं आणि ती रडायला लागली. बाकीच्या सात जणींनी तिचा रडका आवाज ऐकला. सगळ्या धावायच्या थांबल्या फक्त क्षणभरच. परत सगळ्या धावल्या पण त्या शर्यत जिंकायला नव्हे तर त्यांच्या छोट्या मैत्रिणी कडे. त्यातील एकीने तिला जवळ घेतलं थोडं थोपटलं आणि म्हणाली, आता तुझा बाऊ पळून जाईल. सातही मुलींनी त्यांच्या छोट्या मैत्रिणीला उभं केलं. दोघींनी तिला नीट धरून ठेवलं. सगळ्या जणी हातात हात घालून चालायला लागल्या. आणि सगळ्यांनी ती शर्यत जिंकली.

शूटिंग - 'अर्धसत्य'ची चित्रणकथा

श्री दा पानवलकरांच्या 'सूर्य' कथेवर विजय तेंडुलकरांनी 'अर्धसत्य'ची पटकथा बेतली. कॅमेरामन-दिग्दर्शक गोविंद निहलानींनी ती आकारास आणली. ओम पुरी, अमरीश पुरी, स्मिता पाटील, शफी इनामदार, अच्युत पोतदार, आणि सदाशिव अमरापूरकर या सर्वांनी इतर कलाकारांच्या समर्थ साथीने ती पडद्यावर जिवंत केली.

अमेरिकायण! (भाग ९ : जागीच अडकवणारा हिवाळा)

डी.सी. हून परत आलो आणि माझ्या पायाला भिंगरीच लागली म्हणा ना, पुढच्या ३-४ महिन्यात आणि ५-६ महत्त्वाची ठिकाणं पाहून घेतली. एक खरं की न्यूयॉर्कमधलं जलद आयुष्य मला वैयक्तिकदृष्ट्या आवडत असलं तरी हे वेगळं अमेरिकेतलं जग वाटत नसे. डी.सी.ला पहिल्यांदा मला 'बाहेरची' अमेरिका बघायला मिळाली आणि न्यूयॉर्कच्या गर्दीत आल्यावर 'त्या' अमेरिकेची सारखी आठवण व्हायला लागली. पण या फिरण्याआधी अख्खा हिवाळा जायचा होता.

एका लग्नाची गोष्ट

दुपारचे ऊन चांगलेच चटकत होते. मी सायकल हाणत फिल्म इन्स्टिट्यूटमधून विद्यापीठाच्या वसतिगृहात पोचलो तेव्हा सुरेश संतापाने फणफणत खोलीच्या बाहेर येराझार्‍या घालत होता. त्याच्या हातात एक तार होती. मला पाहताच त्याच्या कुकरची शिट्टी वाजली. "ही खोली कुणाच्या नावावर आहे? तुझ्या की माझ्या?"

राक्षस

ते राक्षसाचे पिलू दिसायला खूपच गोंडस होते.

सावळा वर्ण, बघताक्षणी गालगुच्चा घ्यावासा वाटणारे गोबरे गाल, डोक्यावर झुळझुळणारे कुरळे केस, हनुवटीला मध्येच थेंबभर खळगा, तपकिरी डोळे, चेहर्‍यावर कायम एक प्रश्नात्मक खो़ड्याळपणा.....

पण साध्या डोळ्यांना न दिसणारी अजून एक गोष्ट होती त्याच्याकडे, तिसरा डोळा! त्याच्या कपाळावर मधोमध तो तिसरा डोळा आहे-नाही ची लपाछपी खेळत असे. म्हणजे तो कायम असे असे काही नव्हते. पण चमकणार्‍या विजेप्रमाणे तो मधूनच उमटून सगळे लख्ख करून जाई.

आझाद हिंद सेना १२ - "चलो दिल्ली" आणि राणी लक्ष्मी पलटण

senapatiराशबाबूंनी आझाद हिंद संघटनेची सूत्रे नेताजींच्या हाती सोपवली व आपण केवळ सल्लागार म्हणून काम पाहण्याची इच्छा व्यक्त केली. एखाद्या महान तपस्व्याने लाजावे इतक्या सहजतेने राशबाबूंनी दोन तपे रक्ताचे पाणी करून उभी केलेली स्वातंत्र्य चळवळ आणि आपले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते नेताजींच्या हाती स्वाधीन केले. कसलाही अहंकार न बाळगता, कसलीही आसक्ती न धरता आणि मोह न बाळगता केवळ आपले वय, आयुष्यभर खस्ता खाऊन ढासळणारी प्रकृती हे आता आपल्याला नेता म्हणून योग्य ठरवीत नाहीत तेव्हा नेताजींच्या रूपाने आज योग्य नेतृत्व उभे राहत आहे त्याच्या हाती आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची सूत्रे सोपविण्यातच आपले व देशाचे हित आहे हे ओळखून व मान्य करून त्या क्रांतिकारकांच्या भीष्माचार्याने एक नवा आदर्श निर्माण केला, विशेषतः: शरीर व बुद्धी साथ देत नसतानाही बांडगुळाप्रमाणे सत्तेला चिकटून राहणाऱ्या नेत्यांना जे भावी काळात बोकाळणार होते.

एका दिवसाची गोष्ट!

सफाईदार वळण घेऊन कार खंबाटकीच्या माथ्यावर आली तेव्हा आठ वाजले होते. पंकजाने सभोवार पाहिले. चंद्रोदय झाला होता. खोल दरीतले दृष्य विलोभनीय दिसत होते. वाईला पोहोचण्याची घाई नसती तर तिने नक्की त्या रूपेरी झळाळी ल्यालेल्या आसमंताचा आनंद घेतला असता. दुपारी अचानक मामांचा खुशाली विचारायला फोन येतो काय, ते सहज येण्याचे आमंत्रण देतात काय आणि आपण ताबडतोब ते स्वीकारतो काय! पंकजाला राहून राहून मौज वाटत होती.गेला आठवडा फारसा चांगला गेला नव्हता. आठवड्याची सुरूवातच मक्याशी कडाक्याच्या भांडणाने झाली होती. कारण नेहमीप्रमाणेच क्षुल्लक होते, पण ते त्या क्षणी मोठे वाटले होते. शब्दाने शब्द वाढत गेला आणि अबोला यावेळेस चांगला दोन दिवस टिकला. सोमवारीच बाजारही वधारला. "आता डिसेंबरपर्यंत फारसे आशादायक चित्र नाही" असे गुंतवणूक विषयक चॅनेलवर ऐकून तिने काही शेअर्स काढून टाकले होते आणि त्यांना अचानक सोन्याचा भाव आला होता. त्यामुळे ती पश्चात्तापदग्ध अवस्थेत असतानाच तिने कार्यालयात फिरवलेली काही चक्रे उलटी फिरली होती आणि तिला सावरून घेता घेता नाकी नऊ आले होते. या सगळ्यातून मोकळी होते तो बुधवारी काकूंना ताप आला होता! त्यामुळे तिला गृहकृत्यदक्षही व्हावे लागले होते. इतके दिवस 'घर आपोआप चालते' या तिच्या गैरसमजाला तडा गेला होता आणि दोन दिवस कसेबसे रेटून काकू बर्‍या झाल्यावर तिने सुटकेचा निश्वास टाकला होता. आजचा शुक्रवार ती येणार्‍या आठवडाअखेरीकडे नजर ठेवून ओढत असतानाच मामांचा दुपारी फोन आला होता. त्यांनी बहिणीच्या तब्येतीची चौकशी करायला फोन केला होता, पण बहीण खुटखुटीत होऊन नाटकाला गेली असल्याने त्यांचा संपर्क झाला नव्हता. मक्या टप्प्याबाहेर होता, त्यामुळे त्यांनी पंकजाच्या भ्रमणध्वनीवर फोन करून काकूंच्या तब्येतीची चौकशी केली होती.