संध्याकाळी सात वाजता पाटणा स्टेशन आले. आम्ही पाय मोकळे करायला स्टेशनवर उतरलो. खूप मोठे स्टेशन. सुंदर प्रशस्त आणि स्वच्छ. बिहारची जी प्रतिमा उभी असते तिच्याशी विसंगत. अर्थात रेल्वे मंत्र्याच्या गावचे स्टेशन म्हणूनही असेल. पण स्टेशन मला खरेच आवडले.
गुड्डी म्हणजे गुडिया. बाहुली. दहावीत शिकणारी कुसुम अशी बाहुलीसारखीच आहे. निरागस, निष्पाप - काहीशी भोळीही - जे बघेल, ऐकेल त्यावर विश्वास ठेवणारी. वास्तवाशी जाण नसलेली, किंबहुना स्वप्ने सोडून जगात काहीतरी इतर वास्तव असते हेही माहिती नसणारी. हे वयच असे स्वप्नप्रधान असते. या वयात मन असे स्वप्नांत रमते. गुलाबाची अर्धवट उमललेली कळी, मावळत्या सूर्याचे रंग, एखाद्या लहान बालकाचे हास्य असे काही पाहिले की मनाचे फुलपाखरू होते. अशा वयात कवितांच्या पुस्तकात गुलाबाचे फूल वगैरे ठेवले जाते. मग या स्वप्नांत एखाद्या अबलख वगैरे घोड्यावरून स्वार होऊन कुठलासा राजकुमार येतो...
गुड्डीच्या स्वप्नात असाच एक उमदा राजकुमार आहे. धर्मेंद्र. तोच तो रुपेरी पडद्यावरचा हीरो धर्मेंद्र. आता तो आपल्याला अप्राप्य आहे, इतके गुड्डीला कळते आहे, त्याचे लग्न झालेले आहे, हेही तिला ठाऊक आहे. पण त्याने काय बिघडते? गुड्डीचे प्रेम हे मीरेच्या प्रेमासारखे पवित्र आहे. तिच्या हिंदीच्या पुस्तकात मीरेचा धडाच आहे 'प्रेम सच्चे असले की जगाची सगळी बंधने आपोआप गळून पडतात...' धर्मेंद्रच्या प्रेमात असाच सर्वस्वाचा त्याग करून संन्यासिनीचे आयुष्य जगणे ही गुड्डीची महत्त्वाकांक्षा आहे. पण हे सगळे तिच्या मनात, अगदी आतल्या आत आहे. तिच्या घरातल्या इतर लोकांना - तिचे वडील, मोठा भाऊ व वहिनी यांना याची अजिबात कल्पना नाही. गुड्डीवर आईसारखी माया करणाऱ्या तिच्या वहिनीच्या मनात गुड्डीसाठी आपला भाऊ नवीन आहे. नवीन हा इंजिनिअर - नोकरी शोधतो आहे -स्वभावाने जरासा गंभीर - वाचन, लेखन यांच्यात रमलेला -त्यालाही गुड्डी आवडते आहे. हे सगळं जमून आलं तर बरंच आहे, पण या सगळ्यात मध्येच घुसलेला तो धर्मेंद्र - त्याचं काय?
मग कधी ना कधी तरी फुटणारे हे बिंग फुटतेच. नवीन गुड्डीला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न करतो. स्वप्न आणि वास्तव यातला फरक. पण गुड्डीला हे काही कळतच नाही. तिचे वयच तसे आडनिडे आहे...
मग नवीनच्या मदतीला धावून येतात त्याचे मामा आणि मित्र प्रोफेसर गुप्ता. हे मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत, पण माणूस प्रोफेसर म्हणून शोभणार नाही इतका हसतमुख आणि गमत्या. त्यांना गुड्डीच्या मनातली ही उलाघाल बरोबर समजते. या मुग्ध बालिकेला वास्तव म्हणजे काय हे समजून तर सांगायचे, पण ते करत असताना तिला त्यात कुठेही मानसिक धक्का बसू द्यायचा नाही यासाठीची योजना ते आखतात. आणि त्यात त्यांना साथ मिळते ती खुद्द धर्मेंद्रची! अपेक्षेप्रमाणे ही योजना यशस्वी होते, गुड्डीच्या मनातले सिनेमाचे खूळ निघून जाते, तिला वास्तव आणि त्यातला तिचा हीरो नवीन दिसू लागतो, आणि त्या दोघांचे गोड वगैरे मीलन होते..
अशी ही गुड्डीची कथा.
"कल्पना मजेदार आहे खरी." मी म्हणालो.
"मजा? अहो आपण जगावर राज्य करू शकू, जगावर. आहात कुठे?", सुश्रुत थोडा उत्तेजित झाला.
"पण तू तर आताच सांगितलं की गंधसंवेदनेचा मानवी वासनेवर काहीही परिणाम होत नाही म्हणून!"
"खरे
आहे ते. सध्या असा परिणाम होत नाही. पण मनुष्य हा प्राणी असताना तो नक्कीच
व्हायचा. उत्क्रांतीमधील हिमकालखंडोत्तर मनुष्यामध्ये स्त्रीकडून विशिष्ट
गंधनिर्मिती झाली की पुरुषामध्ये संग करण्याच्या प्रेरणांचा उद्भव होत
होता याचे पुरावे मला मिळालेले आहेत. अश्मयुगानंतरच्या कालखंडांमध्ये
त्याची गंधाधारित लैंगिक प्रेरणा ही कमी होऊ लागली. इजिप्त आणि चीनमध्ये
समूहजीवनाच्या प्राथमिक खुणा दिसू लागल्यानंतरच्या उत्क्रांतीच्या
टप्प्यामध्ये ही प्रेरणा संपूर्णत: नष्ट झाली.
टीप: मनोगत दिवाळी अंकासाठी पाठवलेली ही कथा परत आल्यामुळे येथेच वाचकांसाठी देत आहे.
मी सुश्रुतला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा एखाद्या केसाळ अस्वलाला पाहतो आहोत असं मला वाटलं होतं.
तीन
वर्षापूर्वी एका बाईबरोबर सुट्टी घालवायला मी पॅरिसला गेलो होतो. तिथं
हॉटेलबाहेरच्या हिरवळीवर निवांत बसलो असताना एक सावळा दिसणारा माणूस
माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला,
सुजितचे घर म्हणजे एक सदनिका होती.आपल्याकडे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ घरे बांधून भाड्याने देत होते आणि त्यांचा देखभाल खर्च त्या भाड्यातून निघत नाही असे दिसल्यावर काहीतरी एकमुष्टी रक्कम घेऊन त्या भाडेकरूंच्या नावावर करण्याचा आंतबट्ट्याचा व्यवहार करत होते त्याचप्रमाणे येथे काही खाजगी संस्था अशा प्रकारच्या सदनिका बांधून भाड्याने देतात,मात्र भाडे आकारताना त्या उत्पन्नातून देखभाल व्यवस्थित होईल याची काळजी करतात आणि खरोखरच देखभालही करतात. न्यू जर्सीत मिडलसेक्स मॅनेजमेंटने अशा अनेक सदनिकांची संकुले निर्माण केली आहेत.त्यापैकी हिडनव्हॅली ड्राइव्ह या संकुलामध्ये सुजितची सदनिका होती.स्वयंपाकखोली,दिवाणखाना आणि एकच शयनखोली (थोडक्यात वन बी एच के )अशी रचना होती पण क्षेत्रफळ त्यामानाने बरेच मोठे म्हणजे जवळजवळ ११०० चौरस फूट होते. शिवाय घरात गृहमंडळाकडूनच ए सी. फ़्रीज. वॉशिंग मशीन स्वयंपाकाचा गॅस,या सर्व सोयी दिलेल्या होत्या.त्या संकुलामध्ये चारच इमारती होत्या आणि सर्व तीन मजली म्हणजे तळमजला आणि वर दोन मजले अशा होत्या̱. त्याची सदनिका पहिल्या मजल्यावर होती. आपल्यासारखे जिन्याचे ९-९ पायऱ्यांचे अथवा ४-६-८ असे भाग पाडलेले नव्हते. जिना सरळ खालून सुरू होऊन अठरा पायऱ्यांवरच संपे आणि तो संपला की सुजितचा गाळा. असे जिने आता आपल्याकडील खेड्यापाड्यात किंवा पुण्यातील जुन्या वाड्यातच ( आता किती उरलेत पुणे म.न.पा.च जाणे) पहायला मिळतात सर्व इमारतीच्या बांधकामात लाकडाचा सढळ वापर.म्हणजे छत,जमीन आणि भिंती सगळे लाकडी म्हणजे जिना लाकडीच हे ओघानेच आले.त्यामुळे आजूबाजूला शांतता असल्याने कोणीही बाहेरून येत किंवा बाहेर जात असल्याची वर्दी सगळ्या भाडेकरूंना मिळत असे. जमीन लाकडी असल्याने आपल्या चालण्याचा आवाज नारायण धारपांच्या गूढ कथांतील सत्रार किंवा अशाच पात्राच्या पावलांचा आवाज असल्याचा भास होई.इतके दिवस बरेच वेळा बायको जवळ येऊन उभी राहिली तरी मला पत्ता लागत नसे पण आता मात्र ती घरात कोठेही चालू लागली की भूकंप होऊ लागल्याचा भास होऊ लागला अर्थात ही केवळ तिचीच मक्तेदारी होती अशातला भाग नव्हता.तळमजल्याच्या सदनिकांच्या जमिनी कारपेटने आच्छादित होत्या मात्र वरच्या दोन्ही मजल्यावर जमिनी गुळगुळीत लाकडी पट्ट्यांच्या बनवलेल्या असल्यामुळे आणि त्यावर कारपेट नसल्यामुळे आमच्या चालण्याचे पडसाद आमच्यापेक्षा खालच्या मजल्यावरील भाडेकरूना अधिक जाणवायचे आणि त्याची कल्पना आम्हाला येऊ शकत नसे त्यामुळे आमच्या नादात आणि आमच्या दृष्टीने अगदी हलक्या पावलांनी चाललो तरी आमची चाल त्यांची झोप उडवण्यास पुरेशी होत असे.त्याचा पुढे आम्हास अनुभव येणारच होता.
घराची एकूण रचना केवळ लाकडाच्या वापरामुळे इतकी भूकंपप्रवण होती की जवळच्या स्टेशनवरून गाडी जाऊ लागली की भिंती हादरत. घराच्या खिडक्या पाहून तर मी चकितच झालो कारण जवळ जवळ भिंतीचा अर्धा भाग व्यापणाऱ्या खिडक्यांना फक्त काचेचे तावदान आणि कीटक येऊ नयेत म्हणून बाहेरून बारीक जाळी. आमच्या सुरक्षेच्या कल्पनेला पार सुरुंग लावणारी योजना. मी घर बांधताना काटकसर म्हणून प्रत्येक भिंत एक वीट जाडीची घेतल्याबद्दल मला सर्वानी वेड्यात काढले होते त्यांच्या मते बाहेरील भिंत भक्कम दीड विटेची हवी(त्यावेळी घरे लोडबेअरिंग पद्धतीचीच असत).भक्कम लोखंडी जाळी असणाऱ्या खिडक्या बसवल्या होत्या तरी त्या उचकटून चोरी करण्याचा चोरानी प्रयत्न केला होताच आणि नंतर ते मी ज्या डॉक्टरना विकले त्यानी त्या घराचा इतिहास जाणून घेतल्यावर त्या जाळ्यांवर आणखी एक त्याहून अधिक जाडीच्या जाळीचे आवरण बसवले एवढेच नव्हे तर आतल्या प्रत्येक दाराला त्यानी आणखी एक लोखंडी सरकद्वार (रोलिंग शटर) बसवून घेतले आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हां सगळी शटर्स खालीवर करून दाखवून अभिमानाने मला म्हणाले," तुमच्या घरात ( अजून ते त्या घराला याच नावाने संबोधतात)चोर अगदी आलेच तरी सगळी दारे उघडेपर्यंत सकाळ निश्चित होणार." त्यावेळी मला त्या चोरांची दया आली होती.पण आता मात्र मला माझी काळजी वाटू लागली. अमेरिकेत अगोदरच लहानलहान मुलेही हातात पिस्तूल घेऊन धडाधड दिसेल त्याच्यावर गोळी चालवतात असे ऐकलेले आणि आता या अशा घरात रहायचे ! अमेरिकेतल्या लोकांच्या धाडसाचे मला कौतुक वाटू लागले. मी भीत भीत माझी शंका मुलाकडे व्यक्त केल्यावर तो म्हणाला "काही काळजी करू नका येथे पोलिस लगेच येतात.आणि घरात कोणी रोख रक्कम दागिने अगर सोनेनाणे ठेवत नाही हे चोरानाही माहीत असते." मी मनात म्हटले की त्यामुळेच चोर सरळ बँकाच लुटत असावेत. आपल्याकडे चोर फारसा भेदभाव न ठेवता सगळ्यांचीच सारख्याच ममत्वाने विचारपूस करत असतात अगदी आमदार,खासदार आणि मंत्र्यांचीसुद्धा ! उलट त्यांच्या घरात चोरी म्हणजे तर आपलाच माल आपण परत घेण्यासारखे आहे असे चोराना वाटत असावे.अशाप्रकारे चोरांना मुक्तद्वार असले तरी येथील नागरिक मात्र येथील पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पूर्णपणे विसंबून आरामात राहत होते तरी मला मात्र त्या रात्री झोप लागली नाही. खरे तर आमचे सगळे सामान चोरानी पळवले असते तरी त्याची किंमत फार फार तर पाचशे डॉलर झाली असती आणि एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी चोर खिडक्या तोडण्याचे आणि १२८ किलो वजनाच्या आमच्या बॅगा पळवण्याचे श्रम करेल अशी मुळीच शक्यता नव्हती. शिवाय येथील पोलिस आपल्याकडल्यासारखे चोरी होईपर्यंत तेथे गैरहजर राहून चोरांना हातभार लावणारे आणि नंतर आपल्यालाच दटावणारे नसून खरोखरच नागरिकांचे संरक्षण करणे आणि त्याना कायदे पाळायला लावणे हे आपले कर्तव्य आहे असे मानतात याचा अनुभव पुढे आलाच. घरात असताना देखील बाहेरून पोलिसांच्या गाड्या धावत आहेत हे मधूनमधून ऐकू येणाऱ्या सायरनवरून जाणवत असे.
पोलिसांच्या दक्षतेचा आम्हासही अनुभव आलाच.एक दिवस संयुक्ता बाहेरून घरात शिरताना तिला शेजारच्या घरात किंचाळण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा दक्ष नागरिकाप्रमाणे तिने ९११ या क्रमांकावर(पोलिसांना बोलावण्यासाठी) फोन केला तर दोनच मिनिटात पोलिस आले आणि त्यानी तिला कशासाठी फोन केला हे विचारले तेव्हा तिने त्यांना हा प्रकार सांगितला आणि ते शेजारच्या इमारतीत गेले.थोड्या वेळाने परत आमच्या दाराची घंटी वाजली आणि पोलिस "आम्ही चौकशी केली त्या घरातली लहान मुलेच गम्मत म्हणून किंचाळली होती" असे सांगूब तिने फोन केल्याबद्दल तिचे आभार मानून निघून गेले.मला खात्री आहे आपल्याकडे शेजारच्या इमारतीतच काय शेजारच्या घरातून असा आवाज आला असता तरी प्रथम पोलिसाना फोन करण्याच्या भानगडीत सुबुद्ध नागरिक पडलाच नसता पण चुकून अमेरिकेतून नुक्ताच आल्याने त्याने केलाच असता तर प्रथम फोन उचललाच गेला नसता आणि समजा दैवयोगाने उचलला गेलाच असता तर होणाऱे संभाषण असे झाले असते
सु. ना.पोलिसांचा फोन नंबर लावतो.त्यावर
पोलिस स्टेशनमधून
"पर्वती पोलिस ठाणे कोण बोलतय ?काय काम आहे?
सु. ना . - मी अमुक अमुक बोलतोय
"ते समजल हो पण काय काम आहे?"(च्यायला काय कटकट आहे साली! अलिकडे पब्लिक काही स्वस्थ बसू देत नाही )
सु,ना. अहो शेजारच्या इमारतीतून किंचाळण्याचे आवाज येत आहेत.
"मग आम्ही काय कराव अस वाटतय तुम्हाला? थोडा वेळ वाट पाहा होईल शांत आपोआप. नाहीतर आम्हाला इतक्या लांब चक्कर मारायला लावण्यापेक्षा तुम्हीच का जाऊन बघत नाही काय झाले ते? अगदी खून वगैरे झालाच तर बोलवा आन्हाला"
सु.ना . कपाळावर हात मारून घेतो.
अमेरिकेतून भारतात फोन करताना ९१ क्रमांक प्रथम लावावा लागतो त्यात थोडे चूक होऊन जर ९११ लागला तर थेट तो इथल्या पोलिसानाच लागतो आणि मग त्यांच्या तपासणीस तोंड द्यावे लागते. एकदा आमच्या मित्रांच्या मातवंडाने चुकून असाच नंबर लावला आणि दोन मिनिटात पोलिस हजर ! लहान मुलाने चुकून लावला सांगून त्यांचा विश्वास बसला नाही. कारण इथली पोरे पण शहाणी असतात, आईनाप मारू लागले तर लगेच पोलिसाना फोन करतात.म्हण्जे पूर्वी मूल रडू लागले तर आईबाप त्याला पोलिसाला बोलावण्याचा धाक दाखवत तर येथे उलट पोरेच आईबापाना तसा धाक दाखवू लागली आहेत. पोलिसानी घरात येऊन सगळीकडे पाहणी केली आणि खरोखरच काही नाही आईबाप पोराला मारत वगैरे नाहीत याची खात्री झाल्यावरही थोडा वेळ घराबाहेर बसून परत जाताना घरातील व्यक्तींना सांगून निघून गेले.
आणखी एका वेळी मी माझ्या मुलाबरोबर गाडीत बसून स्वाध्याय ला चाललो होतो,दर रविवारी स्वाध्यायसाठी तो मला घेऊन जात असे,पण त्यादिवशी जरा जास्त वेळ लागल्यासारखे वाटले म्हणून मी म्हटले ,"आज फारच वेळ लागतोय!"यावर मुलगा म्हणाला "मामाची गाडी मागून येतेय" मला समजेना आमच्या पोराचा मामा इथे कुठून आला.पाहतो तर पोलिस व्हॅन मागून येत होती. म्हणजे लोकही पोलिसाना एवढे घाबरतात कारण आपण वेगमर्यादा ओलांडली किंवा आणखी काही वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केले की ते ताबडतोब आपल्याला पकडणार आणि आपल्याला जबरदस्त दंड तर होणारच शिवाय आपल्या वाहन चालन परवान्यावर एक लाल खूण होणार आणि अशा तीन खुणा पडल्या तर परवानाच जप्त होणार याविषयी सगळ्या नागरिकांना खात्री असतें. तेच आपल्याकडे पाहा बरे खुशाल एकदोघाना गाडीखाली लोळवा कोणी विचारणार नाही आणि तुम्ही चित्रपटतारा वा तारका असाल तर मग काही विचारायलाच नको,तुमच्या गाडीखाली येण्याचे भाग्य ज्यांच्या नशिबी आले असेल आणि चुकून माकून ते जिवंत राहिले असतील तर त्यांनाच जाब विचारला जातो की असे ताऱ्याच्या गाडीखाली येण्याचे धाडसच कसे झाले त्यांचे. जरी कायदा गाढव असतो असे म्हटले जाते तरी आपल्या देशात मात्र कायदा पाळणारा गाढव असतो असे म्हटले जाते किंवा अनुभवास येते .
सगळ्या सुविधा असून या सदनिकेत आमच्या दृष्टीने एक फार मोठी त्रुटी आम्हाला सकाळी उठल्याउठल्या जाणवली ती म्हणजे उठल्यावर बाथरूम आत कोणी गेल्यामुळे बंद असली तर बाकीच्यानी तो/ती बाहेर येईपर्यंत हातावर हात धरून गप्प बसायचे (किंवा तोपर्यंत झोपायचेच)कारण बाथरूम (ज्याला ते रेस्ट रूम म्हणतात) मध्येच वॉशबेसिन, शॉवर आणि कमोड सगळे एकत्र ! याबाबतीत आपली घरे लहान असली तरी किती सोयिस्कर असतात सगळ्या गोष्टी एकत्र नसल्यामुळे एकाच वेळी दात घासणारा,शौचाला जाणारा आणि अंघोळ करणारा अशा तिघांची सोय होते अगदी तशीच वेळ आली तर आणखी एक जण तांब्या घेऊन बाहेरही जाऊन शुद्धी करून घेऊ शकतो अशा बऱ्याच बाबतीत आपण अमेरिकनांपेक्षा कितीतरी पुढारलेले आहोत याचा प्रत्यय आला आणि अभिमान वाटला.
रस्त्यावरही एकदा माझी अशीच पंचाईत झाली होती.मुलाबरोबर गाडीतून जाताना मध्येच मला लघुशंकेची भावना झाली आणि मी मुलाला तसे सांगितल्यावर तो म्हणाला आता रेस्ट एरिया येईपर्यंत थांबावे लागेल आणि ती रेस्ट एरिया बरीच दूर होती तेथपर्यंत मी कसाबसा तग धरू शकलो.आपल्याकडे असे कधीच झाले नसते.कोठेही मनात आले की गाडी रस्त्याच्या कडेला थांबवा आणि कोठेही जा "होल वावर इज युवर्स"(संदर्भः वऱ्हाड चाललेय लंडनला)अर्थात हे विश्वचि माझे विश्रांतिगृह (रेस्टरूम) या आपल्या वृत्तीमुळे आवश्यक असेल तेथेही अशा सोयी करण्याचा विचार आपण करत नाही ही मात्र दुर्दैवाची गोष्ट !
लाकडाच्या सढळ वापरामुळे आगीचा धोका खूपच असतो त्यामुळे प्रत्येक सदनिकेच्या प्रत्येक खोलीत आगसूचक गजर बसवलेला असतो आणि त्याच्या आवाजाने लगेच आगीचे बंब धाव घेतात हे विशेष ! याचा नंतरच्या आमच्या वास्तव्यात अनुभव आलाच.आमच्याच वर राहणाऱ्या एका स्वच्छताप्रेमी भारतीय गृहिणीने रेस्टरूमम्धील बेसिन आणि अंघोळीचा टब यामधील जागा स्वच्छ करण्याचा घाट घातला.त्या भागात पाणी निघून जाण्याची सोय नसल्याने ते पाणी जमिनीत जिरून भिंतीमधील विद्युत्जोडणीच्या तारांवरून ओघळून शॉर्ट सर्किट होऊन आग लागून धूर निघू लागला आणि ताबडतोब सगळ्या इमारतीतील गजर वाजू लागून आगीच्या दोनतीन गाड्या तेथे जमा झाल्या.त्यानुळे पुढच्या वेळी नवरात्र अमेरिकेत साजरे करण्याची आवश्यकता भासली तेव्हा घरात नऊ दिवस लावायचा दिवासुद्धा आम्ही भीतभीतच वापरला.
भिंती खिडक्या याविषयी येवढे बेपर्वाई असणारे लोक दारांच्या कुलुपाविषयी मात्र फारच आग्रही असल्याचे दिसले.त्यामुळे आमच्या सदनिकेच्या दाराचे कुलूप लावणे आणि उघडणे आम्हाला कित्येक दिवस कठीण्च जात होते.त्यामुळे मुलगा बाहेर कामावर गेल्यावर आम्ही दोघेच घरात असलो तर बरेच दिवस आम्ही फिरायला दोघे एकदम बाहेर पदत नसू कारण दोघे बाहेर पडलो आणि कुलूप उघडता नाही आले तर काय करता.
प्रत्येक इमारतीसमोर मोकळी जागा होती आणि तेथे गाड्या पार्क करण्यासाठी व्यवस्थित आखीव जागा असत आणि तेथे वास्तव्य करणारालाच तेथे गाडी लावता येई.आमच्या इमारतीतून बाहेर पडल्याव्र उजवीकादे वळून थोडे अंतर गेल्यावर एक मोकळे मैदान होते तेथे पूर्वी रोलर स्केटिंगची सोय असावी हे अमेरिकन स्केटस अशा तेथल्या पाटीवरून समजत होते.त्याच्या थोडे पुढे गेल्यावर लगेचच एका मोठ्या इमारतीत ड्रग फेअर या नावाचे औषधाचे नाव असलेले तरी बऱ्याच वस्तू मिळणारे मॉल,त्याच्याच शेजारी मार्शल्स या साखळी दुकानातील एक मोठे मॉल थोए पुढे त्याच इमारतीस लागून लाँड्री आणखी लागून असलेल्या बर्याच इमारतीत बरेच मॉल्स,ज्वेलरी शॉप्स असा मोठा दुकानांचाच भरणा असलेल्या इमारती होत्या. आणि गाड्या पार्क करण्यासाठी असलेली जागाच आपल्याकडील डेक्कन जिमखाना बसस्टँडपासून गरवारे पुलापर्यंतचे क्षेत्र व्यापेल इतकी होती.
बाहेर उन्हाचा चटका म्हणावा तेवढा नव्हता. पण एसी बंद करावा तर चटचटू लागे, आणि चालू करावा तर त्या गारशीळ वार्याचे हबके बसून अंग जडावे. तो गारवा सोसतही नव्हता आणि संपूर्णपणे सोडवतही नव्हता.
अस्वस्थपणे तिने हातातले पुस्तक उशीशेजारी ठेवले आणि डोळे मिटायचा प्रयत्न केला. हा सतरावा. पण डोळे मिटल्यावर परत तेच भुंगे मन पोखरायला आले. आणि उघडल्यावर परत पुस्तक उघडायची रटाळ कृती करायचाही कंटाळा आला.
माझ्या कार्यालयात वर्कस्टेशन सजावट स्पर्धा आहे. फक्त वर्कस्टेशन सजवायचे आहे... कृपया काही कल्पना सुचवा ना ??
वर्कस्टेशनसाठी शब्द नाही सापडला.
सुमारे अडीच महिने आधी तिकिटे काढली होती. तरी सुद्धा आमचे २ बर्थ डब्याच्या या टोकाला आणि २ डब्याच्या त्या टोकाला होते. टीसी ने सांगितले की डब्यात जागा नसल्याने चौघे एकत्र देता येणार नाहीत. शेवटी प्रवाशांना विनंती करून बघायचं ठरवलं. एक जण पलिकडे जायला तयार झाला. पण दुसरा एकटा असूनही मक्खपणे नकार देता झाला. शेवटी अनुपम त्या टोकाला आणि आम्ही तिघे या टोकाला राहिलो. आमचे सहप्रवासी होते सुरभी ही मेडिकलची विद्यार्थिनी. ( ही बिहारची. धुळ्याच्या मेडिकल कॉलेजात दुस-या वर्षाला शिकते. सुटी लागल्याने महिनाभरासाठी जमालपूर या आपल्या गावी निघाली होती.) आसामचा एक माणूस, जो मुंबईला कोणत्या तरी सिक्युरिटी सिस्टीम बनवणा-या कंपनीत मार्केटिंगचं काम करतो. तो त्याच्या कंपनीच्या सेमिनार्ससाठी गुवाहातीला निघाला होता. त्यानेही इंटरनेटवरून गाडीचा रूट डाउनलोड करून आणला होता आणि वारंवार त्यात डोकं घालून गाडी किती लेट चालते आहे हे सर्वांना सांगत होता. ती मुलगी आणि हा आसामी दोघेही या गाडीने ब-याचदा प्रवास केलेले होते आणि ही गाडी सदैव लेट असते, तिला सर्वत्र सायडिंगला टाकून आणखी लेट करतात हे जाणून होते. आणि तरीही पुन्हा याच गाडीने प्रवासाला निघाले होते. आम्ही तर धास्तावलेलेच होतो. कारण गाडी आधीच साडे तीन तास लेट आलेली, त्यात आणखी किती लेट होते कोण जाणे !
गाडीचा पहिलाच स्टॉप होता बुरहानपूर. तिथे उतरणार होते एक दाढीवाले बोहरी आजोबा आणि त्यांची तरूण सून. सूनबाई डॉक्टर - दुबईला असते. आजच विमानाने मुंबईला उतरली आणि या गाडीने सासरी निघाली होती. ती बरीच बोलकी असल्याने आणि सुरभी मेडिकलची विद्यार्थीनी असल्याने त्यांच्या गप्पा ब-याच रंगल्या होत्या. बोहरी कंपनी बुरहानपूरला उतरल्यावर त्याच्या जागा आम्ही घेतल्या. अनुपम त्याच्या जागेवर निघून गेला. गाडी आता चार तास लेट चालत होती. सकाळ होई पर्यन्त ती सहा तास लेट झाली. रात्री १२ वाजता येणारे जबलपूर सकाळी सहाला आले. आम्ही मस्त झोपलो होतो. आम्ही भुसावळला जशी दिवसभर वाट पाहिली, तशी रात्रभर जबलपूरला गाडीची वाट पाहणारे एक बंगाली कुटुम्ब समोरच्या बर्थवर आले आणि आल्या आल्या झोपी गेले.
गाडीतल्या बेडिंग रोलमधे मिळालेली उशी अगदीच लेची पेची असल्याने आम्हा सर्वांचीच पंचाईत झाली. पुढे एका स्टेशनवर जुलेखासाठी एक हवेची उशी घ्यावी लागली तेव्हा ती व्यवस्थित झोपू शकली.
खाण्यापिण्यासाठी गाडीतल्या व्यवस्थेवर पूर्णपणे विसंबून राहणे चुकीचे ठरते. त्यांची एकच भाजी असते (बटाट्याची) आणि जेवणाची चवही एकच असते. त्यामुळे सोबत भरपूर खाद्यसामुग्री आणायला हवी. जसं की आमच्या डब्यातल्या एका गुजराती परिवाराने केलं होतं. जाम, जेली, बटर, ब्रेड, चटण्या, लोणची, मुरांबे असा भरपूर जामनिमा सोबत घेऊन ते आले होते आणि सतत त्याचा फडशा पाडत होते.
एव्हाना आसामी आणि सुरभी शी चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे आम्ही अंताक्षरी, पत्ते असा टाइमपास करत होतो. सुरभीला भरपूर गाणी येत होती. तिचे वाचन आणि सामान्य ज्ञान बरेच चांगले होते. त्यामुळे कंपनीसाठी चांगली होती. जुलेखाने पत्ते खेळण्याची टूम काढून सर्वांना त्यात सामील करून घेतले. एव्हाना समोरचे बंगाली कुटुम्ब जागे झाले होते. त्यांचा छोटा मुलगा शान फारच गोड आणि बडबड्या होता. त्याची आई सुद्धा आमच्याबरोबर पत्ते खेळू लागली. ते सुद्धा गुवाहातीला जात होते.
मधे मुगलसराय स्टेशनवर मिळालेली संत्री आणि आंबे खूपच छान निघाले. त्यामुळे जुलेखा, अनीका, अनुपमचा खूप फायदा झाला. कारण त्यांना गाडीतले जेवण मुळीच आवडत नव्हते. मी आपला आलिया भोगासी असावे सादर म्हणत ते गोड मानून घेत होतो.
गाडी आता सात तास लेट चालत होती. एव्हाना तिने मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश मागे टाकून बिहारमधे प्रवेश केला होता. बिहार मधे कुणीच कायदा पाळत नाही, चालत्या गाडीत लुटालूट होते अशा भयानक कहाण्या सांगून आसामी आम्हाला घाबरवत होता.
१. दोघे भांडत आहेत..तिसरा येतो.. चौथा येतो... आणि मग सगळे भांडू लागतात.. समजावे तुम्ही कलकत्त्यांत आहात.
२. दोघे भांडत आहेत..तिसरा येतो आणि बघून निघून जातो...आहो आमची मुंबई...
३. दोघे भांडत आहेत..तिसरा येतो.. आधीचे दोघे एकत्र येऊन तिसऱ्याला मारतात..... दिल्ली हमखास (पाहिले आहे)
गरम कपडे काय घ्यावे यावरही बराच खल झाला. अनुपम नेहमी प्रमाणे सर्वात शेवटी तयारीला लागला आणि चुकीचे कपडे घेऊन त्याची तयारी एकदाची कशीबशी पूर्ण झाली.
११च्या सकाळी महाराष्ट्र एक्स्प्रेसने आम्ही भुसावळला जाण्यासाठी निघालो. चार जण आणि सहा डाग म्हणजे बरेच आटोपशीर सामान होते. एसी मधे उशा गरम पांघरूण मिळते त्यामुळे ते ओझे घेण्याची गरज नव्हती. जेवण सुद्धा चांगले मिळते असे नरेश कडून समजले होते. तरी सुद्धा रात्री साठी जबीन कडे असताना खिचडी बनवून सोबत नेण्याचे ठरले होते.
९ वाजता जबीनच्या गावाला पोचलो. तिच्याकडे कूलर आणि तिची मुलगी असल्यामुळे दुपार कशी गेली ते कळलंच नाही. आमची गाडी (गुवाहाती एक्स्प्रेस) दुपारी ३.३० ला असल्याने अडीच वाजता रणरणत्या उन्हात आम्ही स्टेशनवर पोचलो आणि पहिला धक्का बसला. गाडी साडे तीन तास लेट ! मग आमची वरात पुन्हा जबीनच्या घरी. तिथे पोचलो तर वीज गायब. तास दोन तास घाम गाळत टाइमपास केल्यावर सहा वाजता पुन्हा स्टेशनवर. पण गाडीचा अद्याप पत्ता नाही. सगळ्या गाड्या येताहेत आणि जाताहेत. कर्नाटक गेली, सचखंड गेली. सात वाजून गेले. आम्ही आपले सहा नंबरच्या फलाटावर प्रत्येक घोषणा कानात तेल घालून ऐकतोय. आणि अचानक घोषणा झाली की गुवाहाती सात नंबरपर कुछही पलोंमें आ रही है....! दुसरा धक्का ! आम्ही सामान उचलून सहा नंबरचा जिना चढून सात नंबरवर पळायला लागलो. त्याच वेळी मुंबई पॅसेंजर आलेली. तिची प्रचण्ड गर्दी सात नंबरचा जिना चढू लागली आणि त्याच वेळी गुवाहातीचे आगमन झाले. आम्ही अद्याप जिन्यावरच ! कारण त्या महाभयानक गर्दीतून खाली उतरणे आणि तेही दोन्ही हातात - गळ्यात सामान घेऊन ! शेवटी अक्षरश: रेटारेटी - धक्काबुक्की करून, शिव्याशाप देत आणि घेत आम्ही कसेबसे सात नंबरवर पोचलो. आता एसी थ्री चा डबा कुठे शोधायचा ? कुणी म्हणतो पुढे आहे, कुणी म्हणतो मागे ! असे मागे पुढे पळापळ करत एकदाचे कसेबसे डब्यात घुसलो आणि हुश्श म्हणत जागेवर टेकलो.